अंधश्रध्दा सोडा विज्ञानाला जोडा ‘ संदेश देत सत्तरी गाठत असलेल्या दोन तरुणांचे बाईकवरून भारत भ्रमण

‘अंधश्रध्दा सोडा विज्ञानाला जोडा ‘ संदेश देत सत्तरी गाठत असलेल्या दोन तरुणांचे बाईकवरून भारत भ्रमण
सत्तरी गाठत वयाला न जुमानता दोन वेगवेगळ्या बाईक सोबत स्वयंपाकाच्या वस्तु, अंथरून पांघरून, अंधश्रध्दा निमृलनाची काही पुस्तके बाईकला तिरंगा ध्वज, अंगावरील कपडे तर संपूर्ण सुरक्षा कवच असलेले जणू योद्धाच.
नागपूर/प्रतिनिधी
फेडरेशन ऑफ इंडियन रेशनलिस्ट असोसिएशनचे 13 वे राष्ट्रीय अधिवेशन तमिलनाडु येथे त्रिचनापल्ली ला 28-29 डिसेम्बर 2024 ला होत आहे. यासाठी ‘विज्ञान दृष्टिकोण’ हा विषय घेवून मोटरसाइकिल राइडर्स पंजाब चे ऍड. हरिंदर लाली, (पंजाब तर्कशील सोसाइटी चे महामंत्री) आणि हरियाणाचे तर्कशास्त्री डाॅ. राजा राम हंडिआया नागपुरला पोहचले. सत्तरी गाठत असलेले ह्या दोन तरूणांचे स्वागत अखिल भारतीय अंधश्रध्दा निर्मूलन चे राष्ट्रीय महासचिव हरीश देशमुख, शहर अध्यक्ष सुनील वंजारी, राज्य संघटक हरिभाऊ पाथोडे, श्रीगुरूदेव युवामंच प्रवर्तक ज्ञानेश्वर रक्षक, श्रीगुरूदेव सेवा मंडळाचे डॉ. शांतीदास लुंगे, देहदान-अवयदान चळवळीचे डाॅ. चंद्रकांत मेहर यांनी केले.
सत्तरी गाठत वयाला न जुमानता दोन वेगवेगळ्या बाईक सोबत स्वयंपाकाच्या वस्तु, अंथरून पांघरून, अंधश्रध्दा निमृलनाची काही पुस्तके बाईकला तिरंगा ध्वज, अंगावरील कपडे तर संपूर्ण सुरक्षा कवच जनू योद्धाच.
या आमच्या सत्यशोधकी मित्रांचे विचार, अनुभव समाज जागृतीच ध्येय ऐकून या देशात अशी मानस विविध संस्कृतींना जोडत, भारतीय माणूस सुखी व्हावा म्हणून प्रयत्न करतांना स्वतःच्या जीवनाचा आनंद शोधतात. ही दोन्ही उच्चविद्या विभूषित व्यक्ती व़ृध्दत्वाला न जुमानता बाईकने प्रवास करीत जनजागरण करतात.
त्यांचे स्वागत हरीश देशमुख यांचा अंधश्रध्दा निमृलनावर लिहलेला ग्रंथ तसेच ज्ञानेश्वर रक्षक लिखीत राष्ट्रसंतांची जनचेतना ग्रंथ देऊन करण्यात आले.
——————-