चांदूरबाजार तालुक्यातील ब्राम्हणवाडा थडी मंडळात ढगफुटी
चांदूरबाजार तालुक्यातील ब्राम्हणवाडा थडी मंडळात ढगफुटी
चांदूरबाजार तालुक्यातील ब्राम्हणवाडा थडी मंडळात ढगफुटी
नाल्यांना पूर. घरांची पडझड. शेतीसह पीकांनाही फटका.
चांदूरबाजार/E T News
चांदूरबाजार तालुक्यात १९ जुलैच्या सायंकाळी पाच वाजता जोरदार पाऊस बरसला.हा पाऊस तालुक्यात सर्वदूर सारखा नसून विखुरलेल्या स्वरुपात पडला आहे.काही महसूल मंडळात अत्यल्प तर काही मंडळात मध्यम स्वरूपाचा पाऊस झाला.मात्र तालुक्यातील ब्राम्हणवाडा थडी या महसूल मंडळात
ढगफुटी सदृष्य पाऊस झाला आहे.प्राथमिक माहिती नुसार ब्राम्हणवाडा थडी मंडळात या पावसामुळे घरांना,शेतीला व पीकांनाही मोठा फटका बसला आहे.या दिवशी तालुक्यात सरासरी २४ मी.मी. इतक्या पावसाची नोंद झाली आहे.२० तारखेच्या सकाळी आठ वाजे पर्यंत, तालुक्यात सरासरी एकुण
१५० मी.मी.इतक्या पावसाची नोंद झाली आहे.तर या दिवशी ब्राम्हणवाडा थडी मंडळात ८२.३ मी.मी.इतका पाऊस झाला आहे.
तालुक्यातील ब्राम्हणवाडा थडी महसूल मंडळात, १९ जुलैच्या सायंकाळी पाच वाजता पावसालाला सुरवात झाली.हा झालेला पाऊस अतिशय मुसळधार स्वरूपाचा होता.
काही क्षणातच या पावसाने रौद्र रूप धारण केले.अवघ्या अर्धा तासात नाल्यांना पूर सुरू आला.अनेक गावांत पाणी शिरले.या महसूल मंडळातील संपूर्ण शेती परिसर पाण्याखाली बुडाला.शेतात असलेल्या शेतकऱ्यांच्याच नव्हे तर,गावात असलेल्या नागरिकांच्या मनात अक्षरशः दहशत निर्माण झाली होती.कारण या महसूल मंडळात फक्त एका तासात ८२ . ३ मी.मी.इतका पाऊस झाला.या अतिवृष्टीचा फटका गणोजा,
सोनोरी,ब्राम्हणवाडा पाठक,सुरळी,माधान,ब्राम्हणांना थडी, वणी या गावातील शेतीला,पीकांना व घरांना बसला आहे.
ब्राम्हणवाडा थडी मंडळातील गावांमध्यील सखल भागात दिड ते दोन फुटांपर्यंत पाणी जमा झाले होते.त्यामुळे अनेक घरांमध्ये पाणी शिरले.ग्रामीण भागात सायंकाळची वेळ स्वयंपाकाची असल्यामुळे घरातील महिलांची एकच तारांबळ उडाली.काहींच्या घरात चुली पर्यंत पाणी पोहोचले.तर मुसळधार पावसामुळे अनेक घरांची पडझड झाली
आहे.शेतांमध्ये सर्वदूर पाणी साचल्याने पीकांना फटका बसला आहे.तर अनेक शेते अती पावसामुळे मोठ्या प्रमाणात खरडून गेली आहेत.प्रशासनिक पातळीवर अद्याप नुकसानाबाबत माहिती उपलब्ध नाही.तालुक्यात २० जुलैला सकाळ पासून मध्यम संततधार पावसाची रिपरिप सुरूच होती.
तालुक्यात १९ जुलै ते २० जुलै सकाळी आठ वाजेपर्यंत २४ मी.मी.इतका पाऊस झाला आहे.महसूल मंडळ निहाय झालेला पाऊस या प्रमाणे आहे.ब्राम्हणवाडा थडी मंडळा
८२.३ मीमी., चांदूरबाजार मंडळ ३२.०० मी.मी.,बेलोरा २८,०० मी.मी., तळेगांव मोहना १.३ मी.मी.,करजगाव ०.३ मी.मी.,आसेगाव ०० मी.मी.,तर शिरजगांव कसबा मंडळात झालेल्या पावसाची नोंद उपलब्ध नाही.
___________________________________________
तालुक्यातील ब्राम्हणवाडा थडी मंडळात अतिवृष्टी झाल्याची माहिती प्राप्त झाली.या अतिवृष्टीत घरांचे व शेतीचे नुकसान झाल्याचे ही कळते.या मंडळातील मंडळ अधिकारी व तलाठ्यांना प्रत्यक्ष पाहणी करून प्राथमिक अहवाल सादर करण्याचे निर्देश दिले आहेत.अहवाल प्राप्त होताच पंचनामे करून,शासनाकडे मदतीची मागणी करण्यात येईल.तसेच घरात पाणी गेल्याने नुकसान झालेल्यांना साठी सानुग्रह मदतीची मागणी करण्यात येईल.
रूणय जक्कूलवार, तहसीलदार चांदूरबाजार.
__________________________________________
_मी आज पर्यंत माझ्या आयुष्यात एका तासात एवढा पाऊस पडलेला पाहिला नाही.आठ-आठ दिवसाच्या झड्या पाहिल्या. एका तासात असा भुतासारखा पाऊस पडताना पहिल्यांदाच पाहिला. जिवनात पहिल्यांदा पावसाची भिती निर्माण झाली होती.
उध्दव राव आत्मारामजी उल्हे,वय ८५ ,सुरळी, चांदूरबाजार
____________________________________________