Breaking
ब्रेकिंग

ऑटोत विसरलेले ७ लाखांचे दागिने पोलिसांनी मिळवून दिले – ऑटोचालक ताब्यात

0 1 8 5 2 1

ऑटोत विसरलेले ७ लाखांचे दागिने पोलिसांनी मिळवून दिले – ऑटोचालक ताब्यात

  • * चौथ्या माळ्यावरून पडल्याने सात वर्षीय मुलाचा मृत्यू
  • * मुलाचे घर बघायला गेलेल्या वडिलांचा अपघातात मृत्यू
  • * अट्टन घरफोड्यांना अटक : सहा गुन्हे उघडकीस

नागपूर/E T News

बंगरूळ येथील दांम्पत्य लग्नासाठी नागपूरला आले. येथे आॅटोतून जाताना त्यांची दागिन्यांची बॅग ते विसरले. त्यात ७ लाखांचे दागिने होते. हुडकेश्वर पोलिसांनी आॅटोचालकाचा शोध घेत त्यांना दागिने मिळवून दिले.

बंगरूळ येथील साई गार्डन, विद्यारन्यपूरा येथे राहणारे सिद्धार्थ दाभाडे हे त्यांच्या पत्नीसह नागपूरला आले होते. ५ आॅगस्टला ते दोघे शहरातील प्रतापनगर येथे राहणा-या त्यांच्या नातेवाईकाडे कार्यकमाला ते गेले. कार्यक्रम आटोपल्यानंतर अन्य दुस-या नातेवाईकाच्या घरी त्यांना जायचे असल्याने ते आॅटोने जुना सुभेदार ले-आउट येथे आले होते. येथे त्यांना त्यांची दागिन्याची बॅग ही आॅटोतच विरसल्याचे लक्षात आले. या बॅगमध्ये १११ ग्रॅम सोन्याचे व ५३ ग्रॅम चांदीचे दागिने असा एकूण ७ लाख ८ हजारांचा मुद्देमाल होता. यासंदर्भात दाभाडे यांनी हुडकेश्वर पोलिस ठाण्यात तक्रार अर्ज दिला होता. त्यानंतर हुडकेश्वर येथील तपास पथकाचे अधिकारी व अंमलदार यांनी दाभाडे यांनी सांगितल्याप्रमाणे रस्त्यावरील सीसीटीव्ही फुटेजची पाहणी केली. त्यानंतर ते बसलेल्या आॅटोचा क्रमांक मिळवला. त्यावरून कैलास गौतमराव खराते (३३, रा. जयताळा, आखरी बस स्टॉप, एमआयडीसी) आॅटोचालकाचे नाव कळले. त्याला ताब्यात घेत पोलिसांनी दागिन्याच्या बॅगची विचारपूस केली असता त्याने घरातून दागिन्यांची बॅग काढून दिली. हे दागिने दाभाडे यांना सुपूर्द करण्यात आले.

——————————————–

अट्टन घरफोड्यांना अटक : सहा गुन्हे उघडकीस

मानकापूर पोलिसांनी दोन अट्टल घरफोड्यांना अटक केली आहे. आरोपींकडून सहा घरफोडीच्या घटनांचा उलगडा करण्यात पोलिसांना यश आले. मोहम्मद सलमान मोहम्मद समीम (२४, रा. राजीवगांधीनगर, यशोधरानगर) आणि सोहेल नसरूद्यीन शाह (२०, रा. कळमणा वस्ती, अन्नपुर्णानगर) अशी या आरोपींची नावे आहे. एका घरफोडीच्या घटनेत दोघांना अटक केल्यानंतर घरफोडीची ही प्रकरणे उघडकीस आली.

गोधनी रोड येथील महाजन पॅलेस प्लॉट नंबर ३, इंगोले ले-आऊट येथे राहणारे अशोक गोविंदराव पाटील (६१) हे बंगरूळला गेले असता त्यांच्या घरात चोरी झाली. घराच्या दाराचे कुलूप तोडून चोरट्याने आत प्रवेश केला. घरातील आलमारीत ठेवलेली २५ हजारांची रोकड तसेच सोन्याचे दागिने असा एकूण ४५ हजारांचा मुद्देमाल चोरून नेला होता. २३ जून ते ५ जुलै दरम्यान त्यांच्या घरात चोरी झाली होती. या प्रकरणी पोलिसांनी आरोपींविरूद्ध गुन्हा दाखल केला होता. तपासात पोलिसांनी मिळालेल्या माहितीवरून आरोपी मोहम्मद सलमान मोहम्मद समीम व सोहेल नसरूद्यीन शाह याला ताब्यात घेतले. त्यांची विचारपूस केली असता त्यांनी उपरोक्त चोरी केल्याची कबुली दिली. त्यांची सखोल विचारपूस केली असता त्यांनी या व्यतिरिक्त आणखी पाच घरफोडी केल्याची कबुली दिली. त्यांच्या ताब्यातून पोलिसांनी सोन्या-चांदीचे दागिने, गुन्ह्यात वापरलेली दुचाकी असा एकूण २ लाख ३४ हजारांचा मुद्देमाल जप्त केला.

———————————-

मुलाचे घर बघायला गेलेल्या वडिलांचा अपघातात मृत्यू

मुलाच्या घराचे बांधकाम बघण्याकरिता गेलेल्या वडिलांचा अपघातात मृत्यू झाला. घराचे बांधकाम बघितल्यानंतर ते त्यांच्या दुचाकीने परतत असताना रस्त्यावरील ट्रक त्यांना दिसला नसल्याने त्यांची दुचाकी ट्रकला धडकली. हिंगणा पोलिस ठाण्यांतर्गत मंगळवारी संध्याकाळी ६.३० वाजताच्या सुमारास हा अपघात झाला. युवराज उदभान कोकोडे (५३, रा. क्वॉर्टर नंबर ४९१, टाईप २, सीआरपीएफ कॅम्प) असे मृतकाचे नाव आहे.

क ाटोल येथील पंचवटी राधाकृष्ण डेव्हलपर्स, प्लॉट नंबर ७९ वर अश्वीन युवराज कोकोडे (२६) याच्या घराचे बांधकाम सुरू आहे. बांधकाम बघण्याकरिता वडील युवराज कोकोडे हे त्यांच्या दुचाकी (एमएच ४० एएस ०९९२) ने दुपारी २.३० वाजताच्या सुमारास आले होते. मुलाची भेट आणि बांधकाम बघितल्यानंतर ते ६.३० वाजताच्या सुमारास परत घराकडे निघाले. ते नागपूरला येत असताना हिंगणा ठाण्यांतर्गत मोहगाव झिल्पी ते मांगली रोडवर एक ट्रक रस्त्यावर उभा होता. संध्याकाळच्या सुमारास युवराज कोकोडे यांना हा ट्रक दिसला नसल्याने त्यांची दुचाकी थेट ट्रकला धडकली. या अपघातात ते गंभीर जखमी झाले. त्यांना उपचाराकरिता एम्स हॉस्पिटल येथे नेले असता डॉक्टरांनी तपासून मृत घोषित केले. याप्रकरणी अश्विन कोकोडे याने दिलेल्या तक्रारीवरून हिंगणा पोलिसांनी आरोपी ट्रक चालकाविरूद्ध गुन्हा दाखल केला आहे.

——————————————-

चौथ्या माळ्यावरून पडल्याने सात वर्षीय मुलाचा मृत्यू

चौथ्या माळ्यावरून पडल्याने एका सात वर्षीय मुलाचा मृत्यू झाला. ही दुर्दैवी घटना गिट्टीखदान पोलिस ठाण्यांतर्गत घडली. मोहम्मद निजाम वल्द अब्दुल हफीज अंसारी असे या मृतक मुलाचे नाव आहे.

निजाम अंसारी हा जाफरनगर येथील जामिया हुसैनिया मदरसा येथे शिक्षण घेत होता. ६ आॅगस्ट रोजी, दुपारी १.२५ वाजताच्या सुमारास तो मदरस्याच्या चौथ्या माळयावरून खाली पडला. यात तो गंभीर जखमी झाला. त्याला उपचाराकरिता तातडीने खासगी रुग्णालयात दाखल केले असता डॉक्टरांनी त्याला तपासून मृत घोषित केले. याप्रकरणी प्राप्त वैद्यकीय सूचनेवरून गिट्टीखदान पोलिसांनी अकस्मात मृत्यूची नोंद घेतलेली आहे.

——————————

5/5 - (2 votes)

EVERY TIME NEWS Live

Santosh Singh Lanjewar/ Chief Editor/ B.A; B. J. (Bachlor of Journalism) MSW (Master of Social work), E T News Channel & " Every Time News Live " News Website Portal/ Facebook Page : ET News Network/ Email : shan.lanjewar@gmail.com/ Cell : +91 738 738 00 22/Experience in Print Media Past 40 years Served : नागपूर पत्रिका # लोकसत्ता # सामना # नवराष्ट्र # निर्मल महाराष्ट्र # लोकमत # लोकमत समाचार # तरुण भारत # देशोन्नती # महासागर # लोकशाही वार्ता & Continue Every Time News Network/ Office : Vidarbha Sahitya Sangh Commercial Complex Jhanshi Rani Square, Sitabuldi, Nagpur

बातमी शेअर करण्यासाठी येथे क्लिक करा
0 1 8 5 2 1

EVERY TIME NEWS Live

Santosh Singh Lanjewar/ Chief Editor/ B.A; B. J. (Bachlor of Journalism) MSW (Master of Social work), E T News Channel & " Every Time News Live " News Website Portal/ Facebook Page : ET News Network/ Email : shan.lanjewar@gmail.com/ Cell : +91 738 738 00 22/Experience in Print Media Past 40 years Served : नागपूर पत्रिका # लोकसत्ता # सामना # नवराष्ट्र # निर्मल महाराष्ट्र # लोकमत # लोकमत समाचार # तरुण भारत # देशोन्नती # महासागर # लोकशाही वार्ता & Continue Every Time News Network/ Office : Vidarbha Sahitya Sangh Commercial Complex Jhanshi Rani Square, Sitabuldi, Nagpur

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
Translate »
बातमी कॉपी करणे हा कायद्याने गुन्हा आहे