अल्पसंख्याक समुदायाची नागपुरी गेट पोलिस स्टेशनवर दगडफेक : पोलिसांचा लाठीचार्ज : २७ जणांना अटक : १२०० जणांवर गुन्हा दाखल
*अल्पसंख्याक समुदायाची नागपुरी गेट पोलिस स्टेशनवर दगडफेक *पोलिसांचा लाठीचार्ज, वाहनांची तोडफोड *२७ जणांना अटक *१२०० जणांवर गुन्हा दाखल*
*हजारो लोकांचा पोलिस स्टेशनला घेराव *परिस्थिती नियंत्रणात
अमरावती/E T News
स्वामी नरसिहानंद यांनी एका कार्यक्रमात मुस्लीमा विरोधातील केलेल्या वक्तव्याचा निषेध तसेच नरसिहानंद यांच्यावर गुन्हा दाखल करा या मागणीसाठी शुक्रवार दिनांक ४ आॅक्टोंबर रोजी रात्रीच्या सुमारास नागपुरी गेट पोलिस स्टेशन परिसरात हजारोंच्या संख्येने अल्पसंख्याक नागरिक जमा झाले होते. मात्र काही वेळातच उपस्थित जमावाने पोलिसा स्टेशच्या दिशेने दगडफेक सुरु केल्यामुळे पोलिसांना लाठीचार्ज
करून जमाव पांगवावा लागला. या प्रकारामुळे नागपूरीगेट पोलिस स्टेशन परिसरात तणावाची स्थिती निर्माण झाली असून जमावबंदी लागू करण्यात आली असून १ हजार २०० लोकांवर गुन्हे दाखल करण्यात आले असून २७ लोकांना ताब्यात घेण्यात आले.
सर्वत्र नवरात्रोत्सवाची धुम असतांना अचानक नागपूरीगेट पोलिस स्टेशन परिसरात झालेल्या गोंधळामुळे शहरात काही प्रमाणात तणाव दिसुन येत आहे. मात्र पोलिसानी सर्व प्रकारावर नियंत्रण मिळविले असुन परिस्थिती आटोक्यात असल्याचे दिसून येत आहे.
अल्पसंख्याक यांच्या विरोधात आक्षेपार्ह वक्तव्य केल्याच्या निषेधार्थ तहरिक उल्मा-ए-हिंद या संघटनेच्यावतीने पोलिस स्टेशन परिसरात जमाव निर्माण केला होता. रात्री ८ वाजताच्या सुमारास सोशल डेमोक्रेटीक पार्टी आॅफ इंडियाच्या हजारो पदाधिकारी व कार्यकर्ते नागपूरी गेट पोलिस स्टेशन परिसरात पोहोचले. सतत वाढत असलेला जमाव पाहता पोलिसानी आधिक पोलिस बंदोबस्त मागविला होता. दरम्यान संघटनानी केलेल्या मागणी नुसार संबधित व्यक्तीवर पोलिस स्टेशनमध्ये गुन्हा दाखल करण्यात आला. मात्र उपस्थित जमाव ऐकण्याच्या मानसिकतेत दिसून आला नाही. पाहता पाहता अचानक जमावाकडून पोलिसावर दगडफेक सुरू झाली. पोलिसांच्या गाड्यांची तोडफोड करण्यात आली. प्रकरणाचे गांभीर्य लक्षात घेता नागपुरी गेट पोलिसांनी तांडव माजविणाऱ्या जमावावर लाठीचार्ज सुरू करून जमाव पांगविला. सध्यास्थितीत नागपुरी गेट पोलिस स्टेशन परिसरात जमावबदी आदेश लागू करण्यात आला आहे.