Breaking
ब्रेकिंग

व्हाॅईस ऑफ मीडियाच्या चंद्रपूर जिल्हाध्यक्षपदी अनिल बाळसराफ यांची निवड

0 1 8 5 2 1

व्हाॅईस ऑफ मीडियाच्या चंद्रपूर जिल्हाध्यक्षपदी अनिल बाळसराफ यांची निवड

राजुरा/जिल्हा प्रतिनिधी

          व्हाॅईस ऑफ मीडिया या आंतरराष्ट्रीय व राष्ट्रीय स्तरावरील पत्रकारांच्या संघटनेच्या चंद्रपूर जिल्हा अध्यक्षपदी राजुरा येथील पत्रकार अनिल बाळसराफ हे विजयी झाले. लोकशाही पद्धतीने झालेल्या निवडणुकीत दोन उमेदवार उभे होते, मतदानानंतर झालेल्या निवडणुकीत राजुरा येथील पत्रकार अनिल बाळसराफ यांना विजयी घोषित करण्यात आले. डिजीटल मिडीया विंग च्या अध्यक्षपदी आशिष रैच व साप्ताहिक विंग च्या अध्यक्षपदी जितेंद्र जोगड यांची एकमताने निवड झाली.

                    दिनांक 25 डिसेंबरला चंद्रपूर येथील चंद्रपूर जिल्हा सहकारी बँकेच्या मा.सा.कन्नमवार सभागृहात झालेल्या आमसभेत ही निवडणूक झाली. यावेळी व्हाईस ऑफ मीडियाचे राज्य कार्याध्यक्ष मंगेश खाटीक, विदर्भ अध्यक्ष किशोर कारंजेकर, वर्धा जिल्हाध्यक्ष नरेंद्र देशमुख, राज्य उपाध्यक्ष संजय पडोळे, ज्येष्ठ पत्रकार शाम ठेंगडी व चंद्रकांत मणियार आदी मान्यवर व्यासपीठावर उपस्थित होते.

                  या आमसभेत अनिल बाळसराफ व अनिल पाटील यांचे अध्यक्षपदासाठी दोन अर्ज आल्याने निवडणूक घेण्यात आली. त्यात अनिल बाळसराफ हे विजयी झाले. अनिल बाळसराफ हे राजुरा येथील पत्रकार असून गेल्या 34 वर्षापासून पत्रकारिता क्षेत्रात आहेत. त्यांनी अन्यायाविरुद्ध व जनसामान्यांसाठी आपल्या लेखनीद्वारे नेहमी आवाज उठवला आहे. त्यांच्या कार्याला मतदार पत्रकारांनी संमती देत त्यांना विजयी केले. यावेळी राजुरा तालुकाध्यक्ष पदावर गणेश बेले, कोरपना तालुकाध्यक्ष प्रमोद वाघाडे, मूल तालुकाध्यक्ष शशीकांत गणवीर, वरोरा तालुकाध्यक्ष चेतन लुथडे, चिमुर तालुकाध्यक्ष प्रा. राजु रामटेके, सावली तालुकाध्यक्ष प्रा.विजय गायकवाड, गोंडपिंपरी तालुकाध्यक्ष राजेश झाडे, भद्रावती तालुकाध्यक्ष राजेश रेवते, बल्लारपूर तालुकाध्यक्ष शंकर महाकाली, जीवती तालुकाध्यक्ष प्रा.सुग्रीव गोतावळे यांची निवड करण्यात आली. या सर्वांचा सत्कार करण्यात आला. चंद्रपूर जिल्हा कार्यकारिणी सर्वसमावेशक आणि सर्व तालुक्यांना सामावून घेऊन करणार असल्याचे नवनिर्वाचित जिल्हाध्यक्ष अनिल बाळसराफ यांनी यावेळी सांगितले. त्यांचे व्हाॅईस ऑफ इंडियाच्या सर्व पदाधिकाऱ्यांनी अभिनंदन केले आहे.

—————–

बातमी बद्दल आपला अभिप्राय नोंदवा

EVERY TIME NEWS Live

Santosh Singh Lanjewar/ Chief Editor/ B.A; B. J. (Bachlor of Journalism) MSW (Master of Social work), E T News Channel & " Every Time News Live " News Website Portal/ Facebook Page : ET News Network/ Email : shan.lanjewar@gmail.com/ Cell : +91 738 738 00 22/Experience in Print Media Past 40 years Served : नागपूर पत्रिका # लोकसत्ता # सामना # नवराष्ट्र # निर्मल महाराष्ट्र # लोकमत # लोकमत समाचार # तरुण भारत # देशोन्नती # महासागर # लोकशाही वार्ता & Continue Every Time News Network/ Office : Vidarbha Sahitya Sangh Commercial Complex Jhanshi Rani Square, Sitabuldi, Nagpur

बातमी शेअर करण्यासाठी येथे क्लिक करा

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
Translate »
बातमी कॉपी करणे हा कायद्याने गुन्हा आहे