मालवाहक गाडी उलटून नऊ महिला मजूर जखमी
कोळोना (चोरे) शिवारातील घटना
देवळी(वर्धा)/E T News
अंदोरी येथील 22 महिला मजूर कोडोना चोरे येथील मसराम यांच्या शेतामध्ये येथे निंदन करण्याकरिता मालवाहक गाडीने गेले होते. सकाळी आठ वाजता पासून दुपारी एक वाजेपर्यंत निंदणाचे काम केल्यावर आणि परत येताना कोडोना शिवारामध्ये मालवाहक गाडी उलटल्याने सर्व मजूर जखमी झाले. जखमी महिलांना मजुरांना वर्धा येथे शासकीय रुग्णालयात उपचाराकरिता भरती करण्यात आले.
मालवाहक क्रमांक एम एच 49 ए टी 2666 महिंद्रा विप्रो गाडी चालक सागर मनोहर अंदूसकर दारू पिऊन वाहन चालवीत असल्याने त्याचा वाहनावरील ताबा सुटल्यामुळे हा अपघात झाल्याचे त्याच्याजवळ बसलेल्या सौरभ चंद्रभान जांभुळे यांनी पोलिसात दिलेल्या तक्रारी आहे म्हटले आहे.
जखमी झालेल्या मजुरांमध्ये देवांशू मडावी, कौशल्या तपाक, नंदा नेवारे, निर्मला मडावी, वनिता नांदने ,प्रीती चौधरी, बेबी नांदने, बिंदू चौधरी, या महिला मजूर जखमी झाल्या तर संगीता लेंडे जास्त मार लागल्यामुळे त्यांना सेवाग्राम रुग्णालयात उपचाराकरिता हलविण्यात आले व दोन मुलं व नऊ महिल उपचाराकरिता शासकीय रुग्णालय वर्धा येथे भरती करण्यात आले असून त्यांच्यावर उपचार सुरू आहे. या अपघातास गाडी चालक जबाबदार आहे. असे तक्रार करता सौरव जांभुडे यांनी पोलीस तक्रारीत म्हटले आहे. देवळी पोलिसांनी गुन्ह्याची नोंद करून पुढील तपास ठाणेदार सार्थक नेहाते करीत आहे.