Breaking
ब्रेकिंग

*११.७ लाखांच्या ड्रग्जसह विकेत्याला अटक.          *मार्केट ट्रेडिंगमध्ये ९.९८ लाख गमावले     *विधीसंघर्षग्रस्त बालकाने चोरली दुचाकी.           *३,०७८ वाहन चालकांवर कारवाई.                *अपघातात पादचाऱ्याचा मृत्यू

0 1 8 5 2 1

*११.७ लाखांच्या ड्रग्जसह विकेत्याला अटक.        *मार्केट ट्रेडिंगमध्ये ९.९८ लाख गमावले     *विधीसंघर्षग्रस्त बालकाने चोरली दुचाकी.           *३,०७८ वाहन चालकांवर कारवाई.                *अपघातात पादचाऱ्याचा मृत्यू

नागपूर/E T News

शहर ड्रग्जच्या विळख्यात ढकलले जात आहे. छुप्या मार्गाने होणा-या नशेच्या विक्रीने तरुणाई भरडली जात आहे. गुरूवारी एका विक्रेता ११ लाख ७ हजार २०० रुपयांच्या ड्रग्जसह गुन्हे शाखेच्या अंमली पदार्थ विरोधी पथकाच्या हाती लागल्याने ड्रग्ज विक्रीचा सुळसुळाट वाढला की काय? असा प्रश्न निर्माण झाला आहे. सूरज प्रमोद गजभिये (३४, रा. अर्चना रेसीडन्सी, प्लॉट नंबर ६, गोपालकृष्णनगर, नंदनवन) असे अटकेतील आरोपीचे नाव आहे.

गुन्हे शाखेच्या पथकाला ड्रग्ज विक्री संदर्भात माहिती मिळाली होती. त्यानुसार पोलिसांनी मध्यरात्रीनंतर १.४५ ते पहाटे ४.२५ वाजतापर्यंत सापळा रचला होता. पोलिस पाळत ठेऊन असताना गोपालकृष्णनगर मार्गावर त्यांनी सूरजची दुचाकी थांबविली. त्याची अंगझडती घेतली. त्याच्याजवळ ११ लाख ७ हजार २०० रुपयांचे ११० ग्रॅम ७२ मिली गॅ्रम एम.डी. पावडर मिळाले. त्याच्या ताब्यातून पोलिसांनी ड्रग्ज पावडर तसेच एक मोबाईल, मोपेड, व ईलेक्ट्रॉनिक वजनकाटा असा असा एकूण १२ लाख ४० हजार रुपयांचा मुद्देमाल जप्त केला. तो एकटाच या व्यवसायत असने शक्य नसल्याने पोलिसांनी त्यांची अधिक विचारपूस केली. त्याने पंकज साठवणे (रा. सोमवारी क्वॉर्टर, सक्करदरा) याच्या मदतीतून अंमली पदार्थांची खरेदी व विक्री करत असल्याचे सांगितले. सूरज गजभिये विरूद्ध पोलिसांनी कलम ८ (क), २२ (ब) २९ एन. डी.पी.एस. अ‍ॅक्ट अन्वये गुनहा दाखल करत अटक केली. जप्त मुद्देमालासह त्याला नंदनवन पोलिसांच्या ताब्यात देण्यात आले आहे. पोलिस आरोपी पंकज साठवणेचा शोध घेत आहेत. ही कारवाई पोलिस आयुक्त, अपर पोलिस आयुक्त (गुन्हे) पोलिस उप आयुक्त (डिटेक्शन) सहा. पोलिस आयुक्त (गुन्हे) यांच्या मार्गदर्शनाखाली गुन्हे शाखेच्या अंमली विरोधी पथकाचे पोलिस निरीक्षक गजानन गुल्हाने, सफौ. सिध्दार्थ पाटील, पोलिस हवालदार विवेक अढाऊ, मनोज नेवारे, नितीन साळुंके, पोलिस अंमलदार रोहीत काळे, सुभाष गजभिये व अनूप यादव यांनी केली.

—————————————–

विधीसंघर्षग्रस्त बालकाने चोरली दुचाकी

मानकापूर ठाण्यांतर्गत पोस्ट आॅफिस पुढून दुचाकी चोरी करणा-या विधीसंघर्षग्रस्त बालकाला ताब्यात घेतले आहे. गुन्हे शाखेच्या युनिट क्रमांक ४ च्या पथकाने ही कारवाई केली. त्याच्या ताब्यातून चोरीचे वाहन जप्त करण्यात आले आहे.

प्लॉट नंबर २६, नर्मदा हाऊसिंग सोसायटी येथे राहणारे फिर्यादी ऐहसान ईकबाल अहमद (२७) यांनी त्यांची दुचाकी (एमएच ४० बीआर ०६८५) ही पोस्ट आॅफिसजवळ पार्क केली होती. ती दुचाकी अज्ञात चोरट्याने चोरून नेली. १२ ते १३ जुलै दरम्यान, ही घटना घडली होती. प्राप्त तक्रारीवरून मानकापूर पोलिसांनी आरोपी विरूद्ध गुन्हा दाखल केला होत. तपासात गुन्हे शाखेच्या युनिट क्रमंक ४ च्या पथकातील अधिकारी व अंमलदार यांना मिळालेल्या माहितीनुसार त्यांनी सापळा रचून चोरीतील एका विधीसंघषग्रस्त बालकाला ताब्यात घेतले. त्याच्या पालकांपुढेच पोलिसांनी त्याची विचारपूस केली. वाहन चोरीबाबत माहिती घेतली असता त्याने उपरोक्त वाहन चोरी केल्याची कबुली दिली. त्याच्या ताब्यातून चोरीचे वाहन जप्त करण्यात आले आहे. विधीसंघर्षग्रस्त बालकाला जप्त मुद्देमालासह मानकापूर पोलिसांच्या ताब्यात देण्यात आले आहे.

————————————

मार्केट ट्रेडिंगमध्ये ९.९८ लाख गमावले

सायबर गुन्हेगाराने अडकविले आमिषाच्या जाळ्यात : गुन्हा दाखल

शेअर मार्केट ट्रेडिंगमध्ये आमिषाला बळी पडून शहरातील एका व्यक्तीने ९ लाख ९८ हजार गमावले. सायबर गुन्हेगाराने फेकलेल्या नफ्याच्या जाळ्यात अडक ल्याने हातची रक्कम निसटली. आधी आरोपीने गुंतवणुकीवर चारपट नफा दर्शविला. मग, मोठी रक्कम हाती लागताच पोबारा केला. तहसील पोलिस ठाण्यांतर्गत ही घटना घडली. मोहम्मद जाबीर मोहम्मद साबीर असे फसवणूक झालेल्या व्यक्तीचे नाव आहे.

मोमीनपुरा येथील अंसारनगर आंबेडकर भवनजवळ राहणारे मोहम्मद जाबीर मोहम्मद साबीर (३४) हे स्वत: शेअर मार्केटमध्ये ट्रेडिंग करतात. १ ते ७ एप्रिल दरम्यान, त्यांना आरोपी दिल्ली येथे राहणारी आरोपी निशा पटेल हिने त्यांच्या मोबाईलवर एक लिंक पाठविली. त्यानंतर शेअर्स खरेदी विक्रीकरिता केकेआर इंन्वेस्टमेंट स्ट्रॅटेजी अ‍ॅनॉलिस्ट या व्हॉस्टअ‍ॅप ग्रुपशी जोडले. त्यानंतर तिने मो. जाबीर यांना स्टॉक मार्केटमध्ये गुंतवणुकीचा सल्ला दिला. निशाच्या सांगण्याप्रमाणे गुंतवणूक केल्यानंतर मो. जाबीर यांना चारपट नफा मिळाला. निशाच्या सांगण्यावरून केलेल्या गुंतवणुकीत मिळालेला मोठा नफा बघता त्यांचा तिच्यावर चांगलाच विश्वास बसला. ही बाब हेरत निशाने मो. जाबीर यांच्यावर मोठ्या नफ्याचे जाळे फेकले. यात फिर्यादी अडकल्याचे बघता निशाने त्यांना वेगवेगळ्या कंपनीचे शेअर्स खरेदी व विक्री करायला लावले. या व्यवहारासाठी मो. जाबीर यांनी आरोपीच्या वेगवेगळ्या खात्यावर एकूण ९ लाख ९८ हजारांची रक्कम पाठविली. मोठी रक्कम हाती लागताच आरोपीने पोबारा केला. मो. जाबरी यांनी रक्कम परत मागितली असता ती परत न करात त्यांची फसवणूक केली. या प्रकरणी प्राप्त तक्रारीवरून तहसील पोलिसांनी आरोपी विरूध्द कलम ४०६,४१९,४२० भादंवि अन्वये गुन्हा दाखल केला आहे.



३,०७८ वाहन चालकांवर कारवाई

महाराष्ट्र दारूबंदी कायद्यान्वये एका प्रकरणात एका जणाकडून ६६५ रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला. जुगार कायद्यान्वये एका जणाकडून १ हजार ७९० रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला.

वाहतुक शाखा पोलिसांनी मोटार वाहन कायद्यान्वये विविध कलमांखाली ३ हजार ०७८ वाहन चालकांवर कारवाई केली. त्यांच्याकडून ३ लाख ५७ हजार ४०० रुपये तडजोड शुल्क वसूल करण्यात आले. नागपूर शहर पोलिसांनी वरील सर्व मोहीम एकत्रितरित्या राबविली. या पुढे देखील ही कारवाई प्रभावीपणे राबविण्यात येणार आहे. परिणामी, वाहन चालकांनी वाहन चालवितांना वाहतुकीचे नियम पाळून वाहनासंबंधी सर्व कागदपत्रे जवळ बाळगावित, असे आवाहन करण्यात आले आहे.

——————————-

 

4/5 - (1 vote)

EVERY TIME NEWS Live

Santosh Singh Lanjewar/ Chief Editor/ B.A; B. J. (Bachlor of Journalism) MSW (Master of Social work), E T News Channel & " Every Time News Live " News Website Portal/ Facebook Page : ET News Network/ Email : shan.lanjewar@gmail.com/ Cell : +91 738 738 00 22/Experience in Print Media Past 40 years Served : नागपूर पत्रिका # लोकसत्ता # सामना # नवराष्ट्र # निर्मल महाराष्ट्र # लोकमत # लोकमत समाचार # तरुण भारत # देशोन्नती # महासागर # लोकशाही वार्ता & Continue Every Time News Network/ Office : Vidarbha Sahitya Sangh Commercial Complex Jhanshi Rani Square, Sitabuldi, Nagpur

बातमी शेअर करण्यासाठी येथे क्लिक करा
0 1 8 5 2 1

EVERY TIME NEWS Live

Santosh Singh Lanjewar/ Chief Editor/ B.A; B. J. (Bachlor of Journalism) MSW (Master of Social work), E T News Channel & " Every Time News Live " News Website Portal/ Facebook Page : ET News Network/ Email : shan.lanjewar@gmail.com/ Cell : +91 738 738 00 22/Experience in Print Media Past 40 years Served : नागपूर पत्रिका # लोकसत्ता # सामना # नवराष्ट्र # निर्मल महाराष्ट्र # लोकमत # लोकमत समाचार # तरुण भारत # देशोन्नती # महासागर # लोकशाही वार्ता & Continue Every Time News Network/ Office : Vidarbha Sahitya Sangh Commercial Complex Jhanshi Rani Square, Sitabuldi, Nagpur

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
Translate »
बातमी कॉपी करणे हा कायद्याने गुन्हा आहे