पणनमंत्री अब्दुल सत्तार यांच्या निषेधार्थ क़ृषी उत्पन्न बाजार समिती बंद
पणनमंत्री अब्दुल सत्तार यांच्या निषेधार्थ क़ृषी उत्पन्न बाजार समिती बंद
शेतकऱ्यांचे मात्र हाल
अमरावती
महाराष्ट राज्य बाजार समिती सहकारी संस्था मुंबई यांच्या आदेशानुसार पणनमंत्री अब्दुल सत्तार यांचा निषेध करून दि.७ रोजी राज्यातील सर्व कृषी उत्पन्न बाजार समित्यांनी एक दिवसीय संप पुकारल्याने बाजार समिती बंद होती. त्यामुळे बाजार समितीमध्ये शेतमाल घेवून येणाºया शेतकºयांचे मोठे हाल झाल्याचे दिसुन आले.
महाराष्ट राज्य बाजार समिती पुणे यांनी राज्यातील सर्व बाजार समितीच्या सभापती व सचिवाची बैठक आयोजित केली होती. मुख्यमंत्री ,उपमुख्यमंत्री,सभेला उपस्थित राहणार होते. मात्र ते आले नाही पणनमंत्री अब्दुल सत्तार हे उपस्थित झाले. व मंत्री मंडळाची सभा आहे असे सांगुन निघुन गेले. त्यांनी सभेचे काहीही एैकून घेतले नाही. व एकाही प्रश्नाचे उत्तार दिले नाही म्हणुन राज्यातील सर्व बाजार समित्यांनी सभेतच काळया फिती लावुन त्यांचा निषेध केला. व एक दिवस बाजार समिती बंद ठेवण्याचा निर्णय घेतला. त्यामुळे दि.७आॅक्टोबर रोजी बाजार समित्या बंद ठेवण्यात आल्या. विशेष म्हणजे याचा सर्व मनस्ताप हा शेतकºयांना सहन करावा लागला
————