विश्वरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या 68 व्या महापरिनिर्वाण दिनानिमित्त आदरांजली

विश्वरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या 68 व्या महापरिनिर्वाण दिनानिमित्त आदरांजली
नागपूर/प्रतिनिधी
झिंगाबाई टाकळीतील गणपतीनगर टी पॉईंटजवळ, नशेमन सोसायटी परिसरातील एन.आय.टी. गार्डन मध्ये विश्वरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या 68 व्या महापरिनिर्वाण दिनानिमित्त आदरांजलीचा कार्यक्रम घेण्यात आला.
डॉ. बाबासाहेब आंबेडकर जयंती समारोह समिती आणि रमाई ग्रुपच्या सर्व सभासद, बौध्द उपासक, उपासिका सहपरीवार उपस्थित होते. या कार्यक्रमाला प्रमुख पाहुणे म्हणून तारा गजभिये, केवलदास जामगड़े तसेच कार्यक्रमाचे अध्यक्ष किशोर बी. गवई होते. सर्वप्रथम विश्वरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या प्रतिमेला धम्मपीठाच्या मंचावर आसनस्थ मान्यवर यांनी पुष्पहार अर्पण करून सामुहिक बौद्ध वंदना घेण्यात आली. कार्यक्रमाचे संचालन संगीता चंद्रहास नारनवरे यांनी केले. तसेच उपस्थित सर्व बौद्ध उपासक किशोर लाड़े, यांनी अभिवादनपर कविता सादर केली, तर गौतम चक्रपाणी, रणजीत बागडे, प्रगती कांबळे यांनी आपले विचार व्यक्त केले.आम्रवृक्षा यांनी आभार प्रदर्शन केले.
————