मोठ्या हॉटेलमधील देहव्यवसाय अड्डयावर धाड – तरुणीची सुटका : दलाल दांम्पत्यावर गुन्हा दखल

मोठ्या हॉटेलमधील देहव्यवसाय अड्डयावर धाड – तरुणीची सुटका : दलाल दाम्पत्याला अटक
नागपूर/E T News
कामठी येथील हॉटेल दुआ कॉन्टीनेंन्टल येथे देहव्यवसाय सुरू होता. या अड्ड्यावर टाकलेल्या धाडीत पोलिसांनी एका तरुणीची सुटका केली. तर, दोन दलाल दांम्पत्याला अटक केली आहे. अल्का इंद्रजीत हेडाऊ (२८) व इंद्रजीत जगदीश हेडाऊ (३६, दोन्ही रा. घर नंबर ४६, खडकाडी मोहल्ला, तहसील) अशी आरोपींची नावे आहेत. गुन्हे शाखेच्या सामाजिक सुरक्षा विभागाने ही कारवाई केली.
आरोपी अल्का ही पैशांचे आमिष दाखवत तरुणींना जाळ्यात ओढत होती. ग्राहक व जागा उपलब्धकरून देत त्यांच्याकडून देहव्यवसाय करून घेत होती. तिच्याबाबत पोलिसांना माहिती मिळाल्यानंतर पोलिसांनी ५ आॅगस्ट रोजी रात्री ११.४५ वाजताच्या सुमारास कामठी रोड येथील हॉटेल दुआ कॉन्टीनेंन्टल येथे धाड टाकली. येथे अल्का आणि तिचा नवरा इंद्रजीत दोघेही तरुणीकडून देहव्यवसाय करून घेताना मिळून आले. कारवाईत पोलिसांनी एका पीडित तरुणीची सुटका केली. आरोपींच्या ताब्यातून २ मोबाईल, १० हजारांची रोकड तसेच व ईतर साहित्य असा २८ हजार ४३० रुपयांचा मुद्देमाल जप्त केला. आरोपींविरूध्द सदर पोलिस ठाण्यात कलम १४३, ३(५) भादंवि सहकलम ४, ५, ७ पिटा अॅक्ट अन्वये गुन्हा दाखल करण्यात आला. तसेच आरोपींना मुद्देमालासह पुढील कारवाईस्तव सदर पोलिसांच्या ताब्यात देण्यात आले आहे.
सायकलला धडक, दुचाकीस्वाराचा मृत्यू
भरधाव वेगाने दुचाकी चालवत असताना चालकाने सायकलस्वाराला धडक दिली. अपघातात सायकस्वार किरकोळ जखमी झाला तर दुचाकीस्वाराचा मात्र मृत्यू झाला. अभिजीत भोलाजी पंधराम, (२४, रा. परसोडी, मंगलमूर्ती फ्लॅट स्कीम, बेलतरोडी) असे मृतकाचे नाव आहे.
अभिजीत पंधरामने ४ आॅगस्टला त्याच्या वस्तीत राहणा-या वसंत डोंगरे यांची दुचाकी (एमएच ४० सीयू ४२६९) ही घेतली. त्यानंतर तो परसोडी रियार डेअरी जवळून भरधाव वेगाने जात होता. या मार्गावरून खेम बाहादुर खरकी (रा. मोठा हिंगणा) या सायकलने जात होते. त्यांना अभिजीतची दुचाकी धडकली. रात्री ८ वाजताच्या सुमारास हा अपघात झाला. अपघातात सायकलस्वार आणि अभिजीत दोघेही खाली पडले. सायकलस्वाराला किरकोळ मार लागला. परंतु, अभिजीत भरधाव वेगाने असल्यामुळे त्याला जबर मार बसला. त्याच्या डोक्याला गंभीर दुखापत झाली. जखमी अवस्थेत त्याला उपचाराकरिता एम्स हॉस्पिटल येथे नेले दाखल केले असता डॉक्टरांनी तपासून मृत घोषित केले. या प्रकरणी अभिजीतचा लहान भाऊ अनिकेत भोलाजी पंधराम (२२) याने मंगळवारी ५ आॅगस्ट रोजी, दिलेल्या तक्रारीवरून बेलतरोडी पोलिसांनी गुन्हा दाखल केला आहे.
२,८१० वाहन चालकांवर कारवाई
महाराष्ट्र दारूबंदी कायद्यान्वये ७ तसेच एनडीपीएस कायद्यान्वये एका अशा एकूण ८ प्रकरणांत १८ जणांवर कारवाई करण्यात आली. या कारवाईत १९ हजार १८० रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला. जुगार कायद्यान्वये एका प्रकरणात एका जणाकडून ८१५ रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला. वाहतुक शाखा पोलिसांनी मोटार वाहन कायद्यान्वये विविध कलमांखाली २ हजार ८१० वाहन चालकांवर कारवाई केली. त्यांच्याकडून २ लाख ७५ हजार ४०० रुपये तडजोड शुल्क वसूल करण्यात आले. नागपूर पोलिसांनी वरील सर्व मोहीम एकत्रितरित्या राबविली. या पुढे देखील ही कारवाई प्रभावीपणे राबविण्यात येणार आहे. परिणामी वाहन चालकांनी वाहन चालवितांना वाहतुकीचे नियम पाळून वाहनासंबंधी सर्व कागदपत्रे जवळ बाळगावित, असे आवाहन करण्यात आले आहे.
——————————————
—-