नवनित विद्यालयात शिक्षण सप्ताह साजरा
नवनित विद्यालयात शिक्षण सप्ताह साजरा
भंडारा/E T News
दि. २२ ते २८ जूलै २०२४ पर्यंत मोतीस्मृती ज्ञानजागृत बहुउद्देशीय शिक्षण संस्था पेट्रोलपंप (ठाणा) ता. जि. भंडारा द्वारा संचालित नवनित माध्यमिक व उच्च माध्यमिक विद्यालय खमारी (बुज.) ता. मोहाडी जि. भंडारा या शाळेत शिक्षण सप्ताह साजरा करण्यात आला. पायाभूत साक्षरता व संख्याज्ञान दिवसा निमित्त शालेय परिपाठात निपुण प्रतिज्ञा घेण्यात आली. विद्यार्थ्यांसाठी भाषिक खेळ, कथाकथन, वाचन तासिका, विविध पुस्तकांचे वाचन उपक्रम घेण्यात आले. क्रीडा दिवसा निमित्त विद्यार्थ्यांकडून क्रीडा शपथ घेतली. बुद्धिबळ, खो-खो, कबड्डी, धावणे शर्यत, लंगडी असे स्वदेशी खेळ घेण्यात आले. सांस्कृतिक दिवस या मध्ये विविध भाषा, वेशभूषा, चित्रकला, नृत्य, गाणी, नाटय, कथा कथन उपक्रम घेण्यात आले. कौशल्य व डिजिटल उपक्रम दिवसामध्ये विद्यार्थ्यांना संवाद कौशल्य, विक्री कौशल्य व विपणन कौशल्य यांची ओळख व्हावी यासाठी बूट विक्रेता तसेच किराणा, कृषी, सलून दुकानाला भेट दिली. भात शेतीतून अध्ययन, विविध मातीच्या वस्तू तयार करून मातीकाम कौशल्याची विद्यार्थ्यांना जाणीव झाली. यासाठी विद्यार्थ्यांनी व्यावसायिक भेट घेतली. शिक्षणात तंत्रज्ञान यात विद्यार्थ्यांना डिजिटल शिक्षणाचे फायदे सांगण्यात आले. इको क्लब व वृक्षारोपण उपक्रमात शाळेत इको क्लबची स्थापना करून क्लबव्दारे वृक्षारोपण करण्यात आले. एक पेड़ माँ के नाम या उपक्रमात विद्यार्थ्यांनी घरी, शेतात आई सोबत वृक्षारोपण केले. समूदाय सहभाग दिवसा निमित्त शाळेत स्नेह भोजनाचे आयोजन करण्यात आले. विविध उपक्रमात विद्यार्थी, शिक्षक, पालक यांनी सहभाग घेतला. शिक्षण सप्ताह अंतर्गत विविध उपक्रमात संस्था सचिव हिरालाल गजभिये, मुख्याध्यापक नरेंद्र गणविर, सुनिल नागदिवे, सुमिता गजभिये, निर्मला रंगारी, प्रा. दिनदयाल दमाहे, प्रा. अरूण कांबळे, प्रा. नानाजी गजभिये तसेच शाळेतील विद्यार्थी सहभागी झाले. यावेळी कार्यक्रमाचे सुत्रसंचालन सुमिता गजभिये व आभारप्रदर्शन नानाजी गजभिये यांनी केले.