Breaking
गुन्हेगारीब्रेकिंग

बसमध्ये चढताना २.५६ लाखांचे दागिने लंपास – बाहेर गेल्याची संधी साधून २ लाखांच्या मुद्देमालावर हात साफ दुचाकी चोरट्याला अटक, वाहन जप्त –

0 1 8 5 2 0

बसमध्ये चढताना २.५६ लाखांचे दागिने लंपास

नागपूर : प्रतापनगर पोलिस ठाण्यांतर्गत असलेल्या स्रेहनगर बसस्टॉपवरून बसमध्ये चढतानाच अज्ञात आरोपींनी महिलेच्या पर्समधून २ लाख ५६ हजारांचे दागिने लांबविले. या प्रकरणी प्राप्त तक्रारीवरून पोलिसांनी आरोपी विरूद्ध गुन्हा दाखल केला आहे.

२४ जुलै रोजी, सकाळी ११.३० ते दुपारी १२ वाजताच्या दरम्यान, फिर्यादी मंगला अनिल मनतिनवार (५०,रा. एल.आय.जी. कॉलोनी, त्रिमुर्तीनगर) या त्यांच्या भाचीच्या लग्नाला जायचे होते. त्यामुळे त्यांनी लग्नात घालण्यासाठी काही दागिने सोबत घेतले होते. त्या छत्रपती चौकातील स्नेहनगर बस स्टॉप येथे आल्या. येथे त्या बसची वाट बघत उभ्या होत्या. यावेळी, त्याच्या जवळच दोन महीला व पुरूष तसेच अन्य लोकही होते. काही वेळानंतर यवतमाळला जाणारी बस स्थानकावर आली. बस येताच दोन्ही महिल व पुरूषाने चला-चला म्हणत गर्दी केली. मंगला मनतिनवार या बसमध्ये चढल्या परंतु, त्यांच्यासोबत उभ्या असलेल्या दोन्ही महिला व पुरूष बसमध्ये न चढता निघून गेले. काही वेळानंतर मंगला मनतिनवार यांनी बॅग तपासली असता त्यांना बॅगची चेन उघडी दिसली. त्यांनी दागिने तपासले सोन्याचे मंगळसुत्र, टॉप्स, कानातील वेल असलेली डबी दिसून आली नाही. २ लाख ५६ हजारांचे हे दागिने होते. या प्रकरणी त्यांनी दिलेल्या तक्रारीवरून पोलिसांनी आरोपींविरूद्ध गुन्हा दाखल केला आहे.

—————————————-

२,३९० वाहनचालकांवर कारवाई

नागपूर : महाराष्ट्र दारूबंदी कायद्यान्वये ३ तसेच एनडीपीएस कायद्यान्वये एका अशा एकूण ४ प्रकरणांत ४ जणांवर कारवाई करण्यात आली. या कारवाईत ९० हजार ७५० रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला. वाहतुक शाखा पोलिसांनी मोटार वाहन कायद्यान्वये विविध कलमांखाली २ हजार ३९० वाहन चालकांवर कारवाई केली. त्यांच्याकउून ८ लाख ५५ हजार ८०० रुपये तडजोड शुल्क वसूल करण्यात आले. नागपूर शहर पोलिसांनी वरील सर्व मोहीम एकत्रितरित्या राबविली. या पुढे देखील ही कारवाई प्रभावीपणे राबविण्यात येणार आहे. परिणामी, वाहन चालकांनी वाहन चालविताना वाहतुकीचे नियम पाळून वाहनासंबंधी सर्व कागदपत्रे जवळ बाळगावित, असे आवाहन करण्यात आले आहे.

———————————

दुचाकी चोरट्याला अटक, वाहन जप्त

नागपूर : बँकेसामोर ठेवलेली दुचाकी चोरून नेणा-याला पोलिसांनी अटक केली. त्याच्या ताब्यातून चोरी केलेले वाहन जप्त करण्यात आले आहे. विनोद भिमराव बडोदेकर, (३०, रा. थुगाव निपानी, तिनखेडा, नरखेड, जि. नागपूर) असे या आरोपीचे नाव आहे.

फिर्यादी चेतन अर्जुन डोंगरे, (३६, रा. इंदिरानगर, जरिपटका) हे २७ सप्टेंबर २०२३ रोजी, एमआयडीसी ठाण्यांतर्गत बालाजीनगर येथील कॅनरा बँकेत कामाला आले होते. यावेळी त्यांनी त्यांची दुचाकी (एम.एच. ४९ बी.व्ही० ५९३५) ही बँकेपुढे लॉक लाऊन ठेवली होती. ही दुचाकी अज्ञात चोरट्याने चोरून नेली. तक्रारीवरून पोलिसांनी आरोपीविरूद्ध गुन्हा दाखल केला होता. सदर गुन्ह्याच्या तपासात गुन्हे शाखेच्या घरफोडी विरोधी पथकाचे अंमलदार आणि अधिकारी यांना मिळालेल्या माहितीवरून त्यांनी सापळा रचून आरोपी विनोद बडोदेकर याला ताब्यात घेतले. त्याची विचारपूस केली असता त्याने उपरोक्त वाहन चोरी केल्याची कबुली दिली. त्याच्या ताब्यातून ही दुचाकी जप्त करण्यात आली. या प्रकरणी आरोपी विरूद्ध पोलिसांनी गुन्हा दाखल करत त्याला अटक केली आहे.

——————————-

भरधाव कारचालकाची पादचा-याला धडक

नागपूर : जरीपटका पोलिस ठाण्यांतर्गत भरधाव कारचालकाने पादचा-याला धडक दिली. या अपघातात पादचारा-याचा मृत्यू झाला. संजय पदम नितनवरे (४३, रा. प्लॉट नंबर २१२, संत लहानुजीनगर, जरीपटका) असे मृतकाचे नाव आहे. या प्रकरणी पोलिसांनी आरोपी विरूद्ध गुन्हा दाखल केला आहे.

संजय नितनवरे हे १२ जुलै रोजी, रिंग रोड येथील हुक्का बार, विवेक पान पॅलेस समोरून पायदळ घरी जात होते. यावेळी, भरधाव येणा-या कारचालकाने त्यांना धडक दिली. अपघातात ते गंभीर जखमी झाले. जखमी अवस्थेत त्यांना उपचाराकरिता खासगी रुग्णालयात दाखल करण्यात आले होते. येथे उपचारादरम्यान २४ जुलै रोजी, रात्री ११.१५ वाजता डॉक्टरांनी तपासून मृत घोषित केले. याप्रकरणी संजय नितनवरे यांची पत्नी सारिका संजय नितनवरे (३५) यांनी दिलेल्या तक्रारीवरून जरीपटका पोलिसांनी आरोपी कारचालका विरूद्ध कलम १०६(१), २८१, १२५ (ब) भादंवि सहकलम १८४, १३४, १७७ मो.वा.का. अन्वये गुन्हा दाखल केला आहे.

————————————

बाहेर गेल्याची संधी साधून २ लाखांच्या मुद्देमालावर हात साफ

नागपूर : घरातील सर्व बाहेरगावी गेल्यानंतर चोरट्याने घरात संधी साधली. चोरट्याने घराच्या दाराचे कुलूप तोडले आणि आलमारीत ठेवलेले दागिने चोरून नेले. यशोधरानगर पोलिस ठाण्यांतर्गत ही घटना घडली. या प्रकरणी प्राप्त तक्रारीवरून पोलिसांनी आरोपी विरूद्ध गुन्हा दाखल केला आहे.

माहितीनुसार, प्लॉट नंबर ३९, पाहुणे ले-आऊट, पिवळी नदी येथे राहणारे फिर्यादी रंजीत अभिमन पांगोळे (३७) हे घराला कुलूप लावून कुटुंबीयांसह बाहेरगावी गेले होते. या दरम्यान, अज्ञात चोरट्याने त्यांच्या घराच्या मुख्य दाराचे कुलूप तोडले आणि आत प्रवेश केला. घरातील बेडरूमधील आलमारीतील ठेवलेले सोन्या-चांदीचे दागिने असा २ लाख १० हजार रुपयांचा मुद्देमाल चोरून नेला. याप्रकरणी फिर्यादी यांनी दिलेल्या तक्रारीवरून यशोधरानगर पोलिसांनी आरोपीविरूध्द कलम ३०५(अ), ३३१(३), ३३१ (४) भादंवि अन्वये गुन्हा दाखल केला आहे.

————————————–

नाल्यात पडून महिलेचा मृत्यू

नागपूर : शिवारातून गावात ये-जा करताना येथील नाल्याच्या पाण्यात पाय घसरून पडल्याने एका महिलेचा मृत्यू झाला. हिंगणा पोलिस ठाण्यांतर्गत ही घटना घडली. प्रमीला शालीकराम मडावी (५७, रा. करिया, किरणापूर, बालाघाट, मध्यप्रदेश) असे मृत महिलेचे नाव आहे. प्रमीला मडावी या सुधीर विठ्ठलराव डाफ (२५) यांच्या शेतात मागील ४ वर्षांपासून कामावर आहेत. त्या येथेच राहतात. दरम्यान, २४ जुलै रोजी, दुपारी ३ वाजताच्या सुमारास कगरोला शिवारातील शेताच्या बाजुच्या नाल्याच्या पाण्यात त्यांचा मृतदेह पाण्यावर तरंगताना मिळून आला. गावात येणे-जाणे करताना नाल्याच्यापाण्यात पाय घसरून पडल्याने त्यांचा मृत्यू झाला. अशा सूचनेवरून पोलिसांनी अकस्मात मृत्यूची नोंद घेतली आहे.


———-

 

बातमी बद्दल आपला अभिप्राय नोंदवा

EVERY TIME NEWS Live

Santosh Singh Lanjewar/ Chief Editor/ B.A; B. J. (Bachlor of Journalism) MSW (Master of Social work), E T News Channel & " Every Time News Live " News Website Portal/ Facebook Page : ET News Network/ Email : shan.lanjewar@gmail.com/ Cell : +91 738 738 00 22/Experience in Print Media Past 40 years Served : नागपूर पत्रिका # लोकसत्ता # सामना # नवराष्ट्र # निर्मल महाराष्ट्र # लोकमत # लोकमत समाचार # तरुण भारत # देशोन्नती # महासागर # लोकशाही वार्ता & Continue Every Time News Network/ Office : Vidarbha Sahitya Sangh Commercial Complex Jhanshi Rani Square, Sitabuldi, Nagpur

बातमी शेअर करण्यासाठी येथे क्लिक करा
0 1 8 5 2 0

EVERY TIME NEWS Live

Santosh Singh Lanjewar/ Chief Editor/ B.A; B. J. (Bachlor of Journalism) MSW (Master of Social work), E T News Channel & " Every Time News Live " News Website Portal/ Facebook Page : ET News Network/ Email : shan.lanjewar@gmail.com/ Cell : +91 738 738 00 22/Experience in Print Media Past 40 years Served : नागपूर पत्रिका # लोकसत्ता # सामना # नवराष्ट्र # निर्मल महाराष्ट्र # लोकमत # लोकमत समाचार # तरुण भारत # देशोन्नती # महासागर # लोकशाही वार्ता & Continue Every Time News Network/ Office : Vidarbha Sahitya Sangh Commercial Complex Jhanshi Rani Square, Sitabuldi, Nagpur

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
Translate »
बातमी कॉपी करणे हा कायद्याने गुन्हा आहे