Breaking
ब्रेकिंग

लाडक्या बहिणींना ‘रिटर्न गिफ्ट’

0 1 8 5 2 1

लाडक्या बहिणींना ‘रिटर्न गिफ्ट’

 

महाराष्ट्र विधानसभा निवडणुकीत लाडक्या बहिणींनी भरभरून मतदान केले त्यामुळे महाराष्ट्रात पुन्हा एकदा महायुतीचे सरकार सत्तारूढ झाले. निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर महायुतीच्या सरकारने लाडकी बहीण योजना आणली. पंधराशे रुपये प्रति महिना लाडकी बहिणींना सरकारने दिले.

लाडक्या बहिण योजनेमुळे महाराष्ट्रातील विधानसभा निवडणुकीत महायुतीला बंपर विजय मिळाला आहे. या विजयात लाडक्या बहिणींचा मोठा वाटा आहे. त्यामुळे या लाडक्या बहिणींना रिटर्न गिफ्ट देण्याची सरकारची तयारी सुरु झाली आहे. राज्यभरातील १३ लाख महिलांना हे रिटर्न गिफ्ट मिळणार आहे. या महिलांचे अर्ज बँक खाते आधारशी लिंक नसल्यामुळे प्रलंबित होते. परंतु आता त्यांचे अर्ज मंजूर करण्यात येणार आहे. राज्यातील २.३४ कोटी महिला या योजनेचा लाभ घेत आहे. त्यांना दर महिन्याला १५०० रुपये सरकारतर्फे दिले जात आहे. ही रक्कम वाढवून २,१०० रुपये करण्याचे आश्वासन महायुतीने निवडणूक जाहीरनाम्यात दिले होते.

भाजपच्या विजयाचा थेट फायदा राज्यातील महिलांना झाला असून आता लाडली बहन योजनेत जास्त पैसे मिळतील. महाराष्ट्रात विधानसभा निवडणुका झाल्या ज्यामध्ये महायुतीने घवघवीत यश मिळवले आणि सरकारला पुन्हा एकदा सरकार स्थापन करण्याचे जनमत मिळाला. यावेळी निवडणुकीत भाजप सर्वात मोठा पक्ष म्हणून समोर आला तर महाराष्ट्र निवडणुकीतील या निकालानंतर महाराष्ट्रातील महिलांमध्ये आनंदाची लाट उसळली असून आता विजयात मोलाचा वाटा उचललेल्या राज्यातील लाडक्या बहिणींना महायुतीच्या विजयाचा अधिक आर्थिक लाभ देण्यासाठी सरकारने नागपूर अधिवेशनाच्या दुसऱ्या दिवशी चौदाशे कोटींचा निधी दिला.

लाडकी बहीण योजना राज्य सरकारद्वारे राबविली जात असून महाराष्ट्र सरकारने निवडणुकीपूर्वी जाहीरनाम्यात या योजनेतील पैसा वाढवणार असल्याचे आश्वासन दिले होते. तर आता सरकार सत्तेवर आले असून या योजनेतील पैसे वाढवण्याचे आश्वासन सरकार पूर्ण करेल.

माहितीनुसार राज्यातील २.३४ कोटी सदस्य महिलांना लाडक्या बहीण योजनेचा लाभ मिळत असून या योजनेसाठी आलेल्या १३ लाख बहिणींचे अर्ज अद्याप प्रलंबित आहेत जे नवीन सरकार स्थापन होताच निकाली काढण्यात येतील आणि डिसेंबर महिन्यांपासून लाडक्या बहिणींना योजनेतील पुढील हप्त्याची रक्कम मिळण्याची अपेक्षा आहे.

सध्या महाराष्ट्र शासनाच्या माझी लाडकी बहीण योजनेंतर्गत महिलांना दरमहा १५०० रुपये आर्थिक मदत दिली जात आहे तर जाहीरनाम्यात १५०० रुपयांची रक्कम ६०० रुपयांनी वाढवून २,१०० रुपये करण्यात येणार असल्याचे आश्वासन देण्यात आले होते. अशा स्थितीत, आता पुन्हा महायुती आघाडीचे सरकार स्थापन झाल्याने लाडकी बहीण योजनेतील लाभही वाढणार आहेत.

महायुतीला लोकसभा निवडणुकीत राज्यात अपयश आले होते. त्यानंतर मुख्यमंत्री लाडकी बहीण योजना सुरु करण्यात आली. त्यामुळेच विधानसभा निवडणुकीत महायुतीला प्रचंड यश मिळाले.

 

लाडकी बहीण योजनेसाठी १४०० कोटींची तरतूद झाल्याने आता डिसेंबरचा हप्ता लवकरच खात्यात जमा होण्याची शक्यता आहे. जुलैपासून नोव्हेंबर पर्यंत, ५ महिन्यांचे एकूण ७५०० रुपये आत्तापर्यंत लाभार्थी महिलांच्या खात्यात जमा झाले आहेत. राज्यात विधानसभा निवडणुकीमुळे आचारसंहिता लागली होती. त्यामुळे सरकारने महिलांना नोव्हेंबरचा हप्ता आधीच दिला होता.लाडकी बहीण योजना महाराष्ट्र सरकारने सुरु केलेली एक महत्त्वाकांक्षी योजना आहे. राज्यातील महिलांना आर्थिकदृष्ट्या सक्षम करणं, हाच या योजनेचा उद्देश आहे.

प्रा डॉ सुधीर अग्रवाल वर्धा 

९५६१५९४३०६

5/5 - (1 vote)

EVERY TIME NEWS Live

Santosh Singh Lanjewar/ Chief Editor/ B.A; B. J. (Bachlor of Journalism) MSW (Master of Social work), E T News Channel & " Every Time News Live " News Website Portal/ Facebook Page : ET News Network/ Email : shan.lanjewar@gmail.com/ Cell : +91 738 738 00 22/Experience in Print Media Past 40 years Served : नागपूर पत्रिका # लोकसत्ता # सामना # नवराष्ट्र # निर्मल महाराष्ट्र # लोकमत # लोकमत समाचार # तरुण भारत # देशोन्नती # महासागर # लोकशाही वार्ता & Continue Every Time News Network/ Office : Vidarbha Sahitya Sangh Commercial Complex Jhanshi Rani Square, Sitabuldi, Nagpur

बातमी शेअर करण्यासाठी येथे क्लिक करा
0 1 8 5 2 1

EVERY TIME NEWS Live

Santosh Singh Lanjewar/ Chief Editor/ B.A; B. J. (Bachlor of Journalism) MSW (Master of Social work), E T News Channel & " Every Time News Live " News Website Portal/ Facebook Page : ET News Network/ Email : shan.lanjewar@gmail.com/ Cell : +91 738 738 00 22/Experience in Print Media Past 40 years Served : नागपूर पत्रिका # लोकसत्ता # सामना # नवराष्ट्र # निर्मल महाराष्ट्र # लोकमत # लोकमत समाचार # तरुण भारत # देशोन्नती # महासागर # लोकशाही वार्ता & Continue Every Time News Network/ Office : Vidarbha Sahitya Sangh Commercial Complex Jhanshi Rani Square, Sitabuldi, Nagpur

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
Translate »
बातमी कॉपी करणे हा कायद्याने गुन्हा आहे