Breaking
ब्रेकिंग

हजारोंच्या रॅलीद्वारे ॲड. वामनराव चटप यांनी दाखल केला उमेदवारी अर्ज

0 1 8 5 2 1

( चंद्रपूर जिल्हा प्रतिनिधी रंगराव कुळसंगे )

हजारोंच्या रॅलीद्वारे ॲड. वामनराव चटप यांनी दाखल केला उमेदवारी अर्ज

* राजुरा विधानसभा मतदारसंघाच्या सर्वांगीण विकासासाठी सर्वस्व अर्पण – ॲड. वामनराव चटप

राजुरा/E T News

            राजुरा विधानसभा क्षेत्र गेल्या १५ वर्षांपासून विकासकामांच्या बाबतीत माघारले असून आता अधिक जलद गतीने विकास कामे करण्याची गरज आहे. विविध माध्यमातून निधी मिळवून आपला मतदारसंघ अधिकाधिक प्रगत आणि विकसित करण्याचा माझा निर्धार आहे. यासोबतच शेतमालाला रास्त भाव आणि शेतकरी विरोधी धोरणे राबविणा-या व्यवस्थेविरूध्द लढा अधिक जोमाने करणार आहे. आपली ही शेवटची लढाई असून नागरिकांच्या हक्कासाठी आणि सर्वांगिन विकासासाठी सर्वस्व अर्पण करण्याचा दृढ संकल्प केला असून मतदारांनी आपल्याला साथ द्यावी, असे आवाहन शेतकरी संघटनेचे नेते आणि परिवर्तन महाशक्ती आघाडीचे उमेदवार ॲड. वामनराव चटप यांनी साईराम मंगल कार्यालय, राजुरा येथे आयोजित रॅली नंतर हजारो नागरिकांच्या साक्षीने झालेल्या सभेत व्यक्त केले. 

             राजुरा शहरातील भवानी मंदिर ते गांधी चौक, आंबेडकर चौक मार्गे ही रॅली उपविभागीय अधिकारी कार्यालय परिसरात आली. तिथे उमेदवारी अर्ज भरल्यानंतर ॲड. वामनराव चटप रॅली द्वारे साईराम मंगल कार्यालयात गेले. तेथे जाहीर सभा झाली. आज शेतकरी संघटनेच्या भव्य रॅली ने विरोधकांपुढे मोठे आव्हान उभे ठाकले असल्याची प्रचिती आली.

             या रॅलीत अरूण नवले, निळकंठ कोरांगे, शालिक माऊलीकर, रामकृष्ण सांगोडे, अंकुर मल्लेलवार, शब्बीर जहागिरदार, नरर्सिंग हामणे, उध्दव गोतावळे, सुदामा राठोड, अशोक नामोल्लेख, विनोद पवार, इस्माईल भाई, साईनाथ बुचे, दत्ता राठोड, रमाकांत मालेकर, सुनिल बावणे,श्रीनिवास मुसळे,विलास धांडे, मदन सातपुते, वंदनाताई चटप, तेजस्विनी कावळे, पोर्णिमा निरंजने, सिंधु बारसिंगे, रूखमा राठोड, सुषमा मडावी यांचेसह शेतकरी संघटना, महिला आघाडी, युवा आघाडी, परिवर्तन महाशक्ती आघाडीचे पदाधिकारी, कार्यकर्ते, महिला यांचेसह दहा हजारापेक्षा अधिक नागरिक उपस्थित होते.

बातमी बद्दल आपला अभिप्राय नोंदवा

EVERY TIME NEWS Live

Santosh Singh Lanjewar/ Chief Editor/ B.A; B. J. (Bachlor of Journalism) MSW (Master of Social work), E T News Channel & " Every Time News Live " News Website Portal/ Facebook Page : ET News Network/ Email : shan.lanjewar@gmail.com/ Cell : +91 738 738 00 22/Experience in Print Media Past 40 years Served : नागपूर पत्रिका # लोकसत्ता # सामना # नवराष्ट्र # निर्मल महाराष्ट्र # लोकमत # लोकमत समाचार # तरुण भारत # देशोन्नती # महासागर # लोकशाही वार्ता & Continue Every Time News Network/ Office : Vidarbha Sahitya Sangh Commercial Complex Jhanshi Rani Square, Sitabuldi, Nagpur

बातमी शेअर करण्यासाठी येथे क्लिक करा

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
Translate »
बातमी कॉपी करणे हा कायद्याने गुन्हा आहे