नेहरू नगर भोजापूर येथे क्रांतिज्योती सावित्रीबाई फुले जयंती कार्यक्रम

नेहरू नगर भोजापूर येथे क्रांतिज्योती सावित्रीबाई फुले जयंती कार्यक्रम
भंडारा/प्रतिनिधी
लोकायत बहुउद्देशीय संस्था, भोजापूर, ता. जि. भंडारा च्या वतीने नेहरू नगर भोजापूर येथे दि. ३ जानेवारी २०२५ ला क्रांतिज्योती सावित्रीबाई फुले यांच्या १९४ व्या जयंती दिनानिमित्त अभिवादन कार्यक्रम आयोजित करण्यात आला. सर्वप्रथम क्रांतिज्योती सावित्रीबाई फुले यांच्या प्रतिमेस संस्थेचे अध्यक्ष योगेश मेश्राम यांच्या हस्ते पुष्पहार अर्पण करून मेणबत्ती प्रज्वलित करण्यात आली. त्यानंतर सर्व उपस्थितांनी पुष्प अर्पण करून व मेणबत्ती प्रज्वलीत करुन विनम्र अभिवादन केले.
याप्रसंगी कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी योगेश मेश्राम तर प्रमुख उपस्थितीत मा. नरेंद्र गणविर, प्राचार्य नवनित माध्यमिक व उच्च माध्यमिक विद्यालय खमारी (बुज.), प्रा. डॉ. विजय गणविर, आर्ट अँड काॅमर्स कॉलेज पेट्रोलपंप (ठाणा), सुरेंद्र मेश्राम, सहा. शिक्षक ग्रामविकास हायस्कूल व ज्युनिअर कॉलेज कोंढी (जवाहरनगर), धम्मानंद रंगारी यांच्या प्रमुख उपस्थितीत कार्यक्रम घेण्यात आला. यावेळी परिसरातील नागरिक उपस्थित होते. कार्यक्रमाचे संचालन व आभार प्रदर्शन नरेंद्र गणविर यांनी केले.