“जिव्हाळा संयुक्त कुटुंब सन्मान समारंभ” उत्साहात

“जिव्हाळा संयुक्त कुटुंब सन्मान समारंभ” उत्साहात
नागपूर/सांस्कृतिक प्रतिनिधी
श्री दिगंबर जैन युवक मंडळ (सैतवाळ) व महिला शाखा यांच्या संयुक्त विद्यमाने आयोजित “जिव्हाळा संयुक्त कुटुंब सन्मान समारंभ” रविवार, दिनांक २७ एप्रिल २०२५ रोजी श्री सैतवाळ जैन संघटन मंडळ, ग्रेट नाग रोड, महावीर नगर, नागपूर येथे मोठ्या उत्साहात आणि भव्यतेने संपन्न झाला.
कार्यक्रमाचे उद्घाटन सुमन किराणा चे संचालक आनंद नखाते यांच्या हस्ते झाले आणि अध्यक्षस्थानी सुप्रसिद्ध आर्किटेक्ट संजय नखाते होते. कार्यक्रमाचे प्रमुख अतिथी डॉ. शुभांगी कुकेकर व विशेष अतिथी म्हणून सौ. श्यामलाताई जय मानेकर, अरविंद हनुवंते आणि प्रकाश मारवडकर (सचिव, श्री सैतवाळ जैन संघटन मंडळ) उपस्थित होते. मंडळाचे अध्यक्ष प्रशांत भुसारी यांनी देखील कार्यक्रमात आपली प्रमुख उपस्थिती नोंदवली.
प्रमुख वक्ते म्हणून डॉ. शरद निंबालकर (माजी कुलगुरू, पंजाबराव कृषि विद्यापीठ) यांनी संयुक्त कुटुंब व्यवस्थेचे महत्त्व अधोरेखित केले. त्यांनी आपल्या प्रेरणादायी भाषणात सांगितले,
“आजच्या काळात संयुक्त कुटुंबांची नितांत गरज आहे. अशा कुटुंबांमध्ये सद्गुणांची वाढ होते व प्रत्येक सदस्याचा आदर व सन्मान जपला जातो. पाश्चात्त्य संस्कृतीकडे आकर्षित होणाऱ्या आजच्या तरुण पिढीसाठी संयुक्त कुटुंब म्हणजे सशक्त संस्कारभूमी आहे.”
या प्रसंगी “जिव्हाळा संयुक्त कुटुंब तृतीय सन्मान” म्हणून प्रतिष्ठित समाजसेवक, जैन सेवा मंडळाचे माजी महामंत्री रमेश तुपकर व त्यांच्या आदर्श कुटुंबाचा विशेष सन्मान करण्यात आला. तुपकर कुटुंब आजही प्रेम, आदर, एकोप्याने सण साजरे करण्याची परंपरा जपून आहे. रमेश तुपकर यांनी संयुक्त कुटुंबाच्या भूमिकेवर विचार व्यक्त केले व मंडळाला यशस्वी आयोजनाबद्दल शुभेच्छा दिल्या.
कार्यक्रमाचा दीपप्रज्वलन उपस्थित मान्यवरांच्या हस्ते करण्यात आला. महिला शाखेने सादर केलेल्या स्वागत गीताने वातावरण अधिकच मधुर झाले. सर्व अतिथींचे स्वागत व सत्कार मंडळाच्या पदाधिकाऱ्यांनी केले.
मंडळाचे अध्यक्ष प्रशांत भुसारी यांनी रमेश तुपकर कुटुंबाची स्तुती करत सर्व समाजबांधवांचे आभार मानले. कार्यक्रमाची प्रस्तावना राजेश जैन यांनी केली. संचालन प्रमोद भागवतकर व मायाताई सावलकर यांनी तर आभार प्रदर्शन भारती उबाळे यांनी केले.
या कार्यक्रमाला जैन समाजातील विविध संस्थांचे पदाधिकारी व अनेक मान्यवर मोठ्या संख्येने उपस्थित होते व संयुक्त कुटुंबाच्या भावनेला प्रोत्साहन दिले.
कार्यक्रमाच्या यशस्वीतेसाठी श्रीकांत धोपाडे, किशोर महात्मे, किरण मसाळकर, उमेश फुलांबरकर, मनोज मानेकर, धनराज गडेकर, संतोष दादा सावलकर, वीणा झवेरी, संध्या काळे, स्मिता महात्मे, जयश्री भुसारी, माधुरी भुसारी, प्रतिभा नखाते, मृदुला जैन, वर्षा महात्मे, स्मिता सावलकर, मनीषा रोहणे आदी सदस्यांनी महत्त्वपूर्ण प्रयत्न केले.