ब्रेकिंग
विहंगम योगावरील प्रवचन बुधवारी
0
1
8
5
2
1
विहंगम योगावरील प्रवचन बुधवारी
नागपूर/E T News
अखिल भारतीय विहंगम योग संत समाज विदर्भ नागपूर च्यावतीने संकल्प यात्रेचा एक भाग म्हणून विहंगम योगाचे उत्तराधिकारी सतगुरु संत विज्ञान देव महाराज यांचे १७ जुलै रोजी, शहरात आगमन होत आहे.
17 व 18 जुलै रोजी ते शहरात येणार असून, त्यानिमित्ताने अखिल भारतीय विहंगम योग संत समाज विदर्भ नागपूर च्यावतीने बुधवार, 17 जुलै रोजी, जांगिड ब्राह्मण समाज भवन लाडेकर ले -आऊट मानेवाडा रोड येथे सायंकाळी 5:00 वाजेपासून प्रवचन होणार आहे. यात भाविक विहंगम योगाबद्दल माहिती दिली जाईल. कार्यात्मक साधनांची माहिती दिली जाईल. त्याच दिवशी भव्य महाप्रसादाचेही आयोजन करण्यात आले आहे. तर दुसऱ्या दिवशी गुरुवारी रामटेक येथील सदनी गावात असलेल्या गोठ्याचे उद्घाटन करण्यात येणार असल्याची माहिती डॉ.निर्मलकुमार सिन्हा यांनी दिली.
0
1
8
5
2
1