ब्रेकिंग
महापरिनिर्वाण दिनानिमित्त भव्य रक्तदान शिबिर

0
1
8
5
2
1
महापरिनिर्वाण दिनानिमित्त भव्य रक्तदान शिबिर
पे
राजुरा
विश्वरत्न डॉ.बाबासाहेब आंबेडकर यांच्या ६८ व्या महापरिनिर्वाण दिनाचे औचित्य साधून राजुरा येथील नवीन बस स्टँड समोरील बुद्ध भूमी येथे दिनांक 6 डिसेंबर ला भव्य रक्तदान शिबिराचे आयोजन करण्यात आले आहे. नागवंश युथ फोर्स बहुउद्देशीय संस्थेने या शिबीराचे आयोजन केले असून गेल्या सात वर्षांपासून हा उपक्रम राबविण्यात येत आहे.
या उपक्रमात सर्व नागरिकांनी सहभागी व्हावे, असे आवाहन संस्थाध्यक्ष अमोल राऊत, उपाध्यक्ष रविकिरण बावणे, धनराज उमरे, नूतन ब्राम्हणे, सुरेंद्र फुसाटे, जय खोब्रागडे, रवी झाडे इत्यादींनी केले आहे.
0
1
8
5
2
1