सहयोगी प्राध्यापक डॉ. उल्हास मोगलेवार यांना शैक्षणिक, साहित्यिक व सामाजिक कार्याबद्दल “राष्ट्रीय शिक्षक पुरस्कार” घोषित
सहयोगी प्राध्यापक डॉ. उल्हास मोगलेवार यांना शैक्षणिक, साहित्यिक व सामाजिक कार्याबद्दल “राष्ट्रीय शिक्षक पुरस्कार” घोषित
नागपूर/E T News
सक्षम सोसायटी आणि पोद्दार इंटरनॅशनल कॉलेजच्या वतीने देण्यात येणारा अत्यंत प्रतिष्ठेचा समजला जाणारा “राष्ट्रीय शिक्षक पुरस्कार” यंदा संत गाडगे महाराज महाविद्यालय, हिंगणा येथील मराठी विभाग प्रमुख व सहयोगी प्राध्यापक डॉ. उल्हास मोगलेवार यांना त्यांच्या शैक्षणिक, साहित्यिक व सामाजिक कार्याबद्दल घोषित करण्यात आलेला आहे. हा पुरस्कार रविवार १ सप्टेंबर २०२४ रोजी पोद्दार बिझनेस स्कूल, सितापुरा, जयपुर येथे मान्यवरांच्या प्रमुख उपस्थितीत प्रदान करण्यात येणार आहे.
प्रा. डॉ. उल्हास मोगलेवार यांनी राष्ट्रीय सेवा योजनेच्या माध्यमातून आजपर्यंत अनेक सामाजिक कार्यात भाग घेतला असून विविध शैक्षणिक व सामाजिक उपक्रम त्यांनी राबविले आहेत तसेच शैक्षणिक व साहित्यिक क्षेत्रात त्यांची ७ पुस्तके प्रकाशित झाली असून अनेक विशेषकांचे त्यांनी संपादन केलेले आहे. हा पुरस्कार मिळाल्याबद्दल मित्रवर्गाने त्यांचे अभिनंदन केले आहे.
—————–