नागपूर/E T News
कोराडी : आषाढी पौर्णिमेच्या पूर्वसंध्येला नशाबंदी मंडळ, तेजस्विनी विद्यालय व महाराष्ट्र अंधश्रद्धा निर्मूलन समितीच्या संयुक्त विद्यमाने ” व्यसनमुक्तीची वारी, विठ्ठलाच्या दारी..” अशा घोषणा देत विद्यार्थ्यांमार्फत व्यसनमुक्त फेरी काढून परिसरातील नागरिकांना व्यसनमुक्तीचा संदेश देण्यात आला. यावेळी शेकडो विद्यार्थ्यांनी व्यसनाच्या दुष्परिणामाचे फलक हातामध्ये घेऊन विठ्ठल रुक्मिणी मंदिरापर्यंत फेरी काढून विठ्ठलाच्या दारी व्यसनमुक्तीची मागणी केली.
कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी तेजस्विनी विद्यालयाचे संचालक लेखाराम पटेल होते तर अतिथी म्हणून महादुला नगरपंचायतचे मुख्याधिकारी अमर हंडा, प्रशासकीय अधिकारी सुशांत आमटे, शहर समन्वयक शुभम मोहिते नशाबंदी मंडळाचे जिल्हा संघटक गौरव आणि महाराष्ट्र अंनिस कोराडी शाखा अध्यक्ष ताराचंद पखिडे, कार्याध्यक्ष बबन गायकवाड, राजू शेवतकर आदी मान्यवर उपस्थित होते.
कार्यक्रमाच्या यशस्वीतेकरिता तेजस्विनी विद्यालयाचे मुख्याध्यापक संदीप लोहकरे, शिक्षक वृंद दिनकर ठवळे, ए.जी. लोधी, आयुष राऊत यांनी सहकार्य केले. पोलीस सुरक्षेची व्यवस्था राजन मेश्राम यांनी सांभाळली.
व्यसनमुक्त वारीचा समारोप विठ्ठल रुक्मिणी मंदिराच्या दारी करण्यात आला. यावेळी मंदिराचे विश्वस्त मोरेश्वर बिरखेडे यांनी व्यसनमुक्तीचा संकल्प दिला. कार्यक्रमाला उपस्थितांचे आभार बबनराव गायकवाड यांनी मानले.