Exclusive शिक्षकांना ट्रेनिंगच्या नावावर बोलाविले अन् मतदान करून घेतले
——–मुख्य संपादक संतोष सिंग——-
Exclusive शिक्षकांना ट्रेनिंगच्या नावावर बोलविले अन् मतदान करून घेतले
मतदान केंद्रावर गोंधळात गोंधळ
नागपूर/ E T News
५१ -उमरेड विधानसभा मतदार संघ उमरेड येथे दिनांक ०९ व १०/११/२४ रोजी केंद्राध्यक्ष व इतर मतदान अधिकारी यांचे ट्रेनिंग आयोजित करण्यात आले होते.मात्र जे मतदान अधिकारी मतदान कार्यात आहेत व जे नागपूर व्यतिरिक्त इतर जिल्हयातील मतदार आहेत त्यांच्यासाठी टपाली मतदानाची व्यवस्था दिनांक ११/११/२४ रोजी करण्यात आली.या सर्व मतदान कर्मचाऱ्यांनी मतदान करावे म्हणून सर्व कर्मचाऱ्यांना ट्रेनिंग असल्याचा ऑर्डर देण्यात आला.११/११/२४ रोजी कोणतेही ट्रेनिग न देता सर्व कर्मचाऱ्यांकडून मतदान करून घेण्यात आले.सर्व मतदान अधिकाऱ्यांना दुपारी २.०० वाजता बोलाविण्यात आले.. दिवाळी सुट्ट्या असल्याने सर्व कर्मचारी आप आपल्या गावी गेले असताना दुसऱ्याच दिवशी दुपारी २.०० वाजता ट्रेनिंगच्या नावावर बोलवून मतदान करून घेतले..उमरेड येथील नूतन आदर्श महाविद्यालयात प्रशिक्षण व ट्रेनिंगची व्यवस्था करण्यात आली.मात्र मतदान करताना कुठलेही नियोजन न केल्याने मोठा गोंधळ निर्माण झाला. महाराष्ट्रातील इतर जिल्ह्यातील सर्व विभागातील मतदान अधिकारी या केंद्रावर आल्याने एकच गोंधळ निर्माण झाला.नागपूर व अमरावती विभागातील सर्व मतदान कर्मचाऱ्यांसाठी एका रूम मध्ये व्यवस्था करण्यात आल्याने .मतदान कर्मचाऱ्यांना नाहक त्रास सहन करावा लागला. मतदानापासून कोणीही वंचित राहू नये,प्रत्येक मतदान अधिकाऱ्यांनी मतदान करावे,हा उदात्त हेतू असला तरी व्यवस्था करणे हे निवडणूक प्रशासनाचे काम आहे.मात्र योग्य नियोजना अभावी मतदारांच्या मोठ मोठ्या रांगा लागल्याने मतदान कर्मचाऱ्यांना नाहक त्रास सहन करावा लागला..