आरोपींकडून पिस्टल, रिव्हॉल्वर, १३ जिवंत काडतूस जप्त
आरोपींकडून पिस्टल, रिव्हॉल्वर, १३ जिवंत काडतूस जप्त
नागपूर/E T News
अंमली पदार्थाच्या गुन्ह्यात फरार असलेल्या आरोपीला पोलिसांनी अटक केली. त्याच्याजवळ पिस्टल आणि १३ जिवंत काडतूस मिळून आले. गुन्हे शाखेच्या अंमली पदार्थविरोधी पथकाने ही कारवाई केली. शेख आतीक शेख लतीफ, (३१, रा. शांतीनगर घाट चौक) असे या आरोपीचे नाव आहे.
गुन्हे शाखेच्या पथकाला २५ जुलै रोजी, रात्री ७.३० वाजताच्या सुमारास शेख आतीक शेख लतीफ हा वाठोडा पोलिस ठाण्यांतर्गत गरीब नवाज चौक, बडी मस्जीदजवळ राहत असल्याची माहिती मिळाली. माहितीवरून पोलिसांनी पाहणी केली असता आरोपी दिसून आला. त्याच्या बॅगची झडती घेतली असता त्यात एक लोखंडी बनावटीची पिस्टल, एक देशी बनावटीची रिव्हॉल्व्हर व १३ जिवंत काडतूस मिळून आले. यासंदर्भात आरोपीला विचारणा केी असता त्याने पिस्टल, रिव्हॉल्वर आणि काडतूस हे आरोपी राहील खान उर्फ सलमान (२८, रा. बहराईच, उत्तरप्रदेश) याच्याकडून आणल्याचे सांगीतले. आरोपीचे हे कृत्य कलम ३, ५ भा.ह.का., सहकलम १३५ मपोका. अन्वये होत असल्याने त्याच्या विरूद्ध वाठोडा पोलिसांनी गुन्हा दाखल केला आहे. शेख आतीक शेख लतीफ याच्या विरूद्ध शांतीनगर येथे २, तहसिल १, पाचपावली पोलिस ठाण्यांतर्गत १ असे चार गंभीर स्वरूपाचे गुन्हे दाखल आहे. आरोपीला पुढील कारवाई करिता पाचपावली पोलिसांच्या ताब्यात देण्यात आले आहे. ही कामगिरी पोलिस उप आयुक्त (डिटेक्शन), सहा. पोलिस आयुक्त (गुन्हेशाखा) यांच्या मार्गदर्शखाली, पोलिस निरीक्षक गजानन गुल्हाने, पोलिस उप निरीक्षक अनिल इंगोले, पोलिस हवालदार अजय शुक्ला, विलास कोकाटे, विजय यादव, विवेक अढाऊ, अनुप यादव, राशिद शेख, राहुल पाटील, पंकज हेडाऊ, राहुल कुसरामे व शेषराव रेवतकर यांनी केली.
————————————-