जुन्या वादातून धारदार शस्त्राने केले वार. *जरीपटक्यात ४.३० लाखांची घरफोडी. *दोघांनी मारहाणकरून दुचाकी हिसकावली११० *गुन्ह्यातील जप्त ७३३.७८ कि.ग्रॅम गांजा नष्ट
“जुन्या वादातून धारदार शस्त्राने केले वार. *जरीपटक्यात ४.३० लाखांची घरफोडी. *दोघांनी मारहाणकरून दुचाकी हिसकावली. ११० गुन्ह्यातील जप्त ७३३.७८ कि.ग्रॅम गांजा नष्ट.
(१४ ऑगस्ट २०२४)
नागपूर/E T News
जुन्या वादातून मारहाण आणि शस्त्रासह वार केल्याची घटना नंदनवन पोलिस ठाण्यांतर्गत पुढे आली. या प्रकरणी प्राप्त तक्रारीवरून पोलिसांनी आरोपी विरूद्ध गुन्हा दाखल करत त्याला अटक केली आहे. विवेक सुखदेव जाधव (४०) असे आरोपीचे नाव आहे.
१३.०८.२०२४ चे ११.३० वा. चे सुमारास,पडोळे नगर, कुशीनारा बुध्द विहाराजवळ राहणारा निखील उर्फ डंबा मनोहर वासनिक (२४) हा त्याच्या मित्रासोबत दुचाकीने हिवरीनगर झोपडपट्टी येथील जाधव यांच्या घरा समोरून जात होता. यावेळी, या परिसरात राहणा-या विवेक जाधव याने निखीलला थांबविले. जुन्या भांडणाचा वाद उकरून काढला. यावरून दोघांमध्ये वाद झाला. शब्दाने शब्द वाढत गेले आणि प्रकारण मारहाणीपर्यंत पोहोचले. यावेळी, विवेक याने निखीलला शिवीगाळी करत धारदार शस्त्राने त्याच्या हातावर, मनगटावर व पाठीवर वार केले. यात निखील गंभीर जखमी झाला. त्याला जखमी अवस्थेत उपचाराकरिता मेडिकल रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे. याप्रकरणी निखीलने दिलेल्या तक्रारीवरून नंदनवन पोलिसांनी आरोपी विरूद्ध कलम ११८(२), ३५२, भादंवि अन्वये गुन्हा दाखल त्याला अटक केली आहे.
——————————-
जरीपटक्यात ४.३० लाखांची घरफोडी
घरातील सुन कामावर गेल्यानंतर सासू या कामानिमित्त बाहेर गेल्या असता चोरट्याने संधी साधत घरात डाव साधला. घराच्या दाराचे कुलूप तोडून आलमारीचे लॉक फोडत त्यात ठेवलेले ४ लाख ३० हजारांचे सोन्याचे दागिने चोरून नेले. जरीपटका पोलिस ठाण्यांतर्गत ही घटना घडली. जरीपटका, नारा येथील प्लॉट नंबर १५३, मंगलम् नगरी, येथे राहणा-या सोनम प्रशांत मेश्राम (३०) या नेहमीप्रमाणे त्यांच्या कामावर गेल्या होत्या. काही वेळाने त्यांच्या सासू देखील घराच्या दाराला कुलूप लाऊन घराबाहेर गेल्या होत्या. या दरम्यान, अज्ञात चोरट्याने त्यांच्या घराच्या दाराचे कुलूप तोडले आणि आत प्रवेश केला. घरातील दोन लोखंडी आलमारीचे लॉक फोडले आणि त्यात ठेवलेले ८६ ग्रॅम सोन्याचे दागिने असा एकूण ४ लाख ३० हजारांचा मुद्देमाल चोरून नेला. याप्रकरणी सोनम मेश्राम यांनी दिलेल्या तक्रारीवरून जरीपटका पोलिसांनी आरोपी विरूध्द कलम ३०५, ३३१(३), ३३१ (४) भादंवि अन्वये गुन्हा दाखल केला आहे.
—————————————
दोघांनी मारहाण करून दुचाकी हिसकावली
सोबत जेवण केल्यानंतर दोघे मित्र बहिणीसाठी डबा घेऊन जात होते. रस्त्यांना दोन गुंडानी त्यांना अडवले. मारहाण करत दुचाकी हिसकावली. दोन्ही गुंडांना ईमामवाडा पोलिसांनी अटक केली आहे. साहिल संजू डिंका (२०, रा. कापला वस्ती), आकाश भिकुरामजी डोंगरे (२३, रा. वकीलपेठ) अशी या आरोपींची नावे आहेत.१३.०८.२०२४ चे ००.३० वा. चे सुमारास, फियार्दी नामे गंगाबाईघाट, कार्पोरेशन कॉलोनी येथ राहणारा उज्वल मनोज खोटे (२६) आणि आदित्य राम खोरगडे दोघे मित्र आहेत. दोघेही १३ आॅगस्ट रोजी, तुकडोजी चौकात राहणा-या नातेवाईकांडे जेवायला गेले होते. जेवण झाल्यानंतर रात्री १२ वाजताच्या सुमारास आदित्याच्या बहिणीला जेवणाचा डबा देण्याकरिता ते आदित्यच्या दुचाकी (एमएच ४९ बीयू ६९६५) ने निघाले. उज्वल यावेळी गाडीच्या मागे बसला होता. दोघेही व्ही. आर मॉल ते बैधनाथ चौकाजवळ आले असता साहिल आणि आकाश दोघांनी त्यांना रस्त्यात थांबविले. उज्वलच्या हातातील घड्याळ हिसकाविण्याचा दोघांनी प्रयत्न केला. मात्र, उज्वलने विरोध केला असता एका आरोपीने रस्त्यावरील सिमेंटचा गट्टू उचलत फेकून मारला. अशातच, घाबरून आदित्य हा त्याची दुचाकी सोडून पळून गेला. साहिल आणि आकाशने मिळून उज्वलला हातबुक्कीने मारहाण करत दुचाकी जबरी हिसकाऊन घेतली आणि पलयान केले. काहीच वेळाने गस्तीवर असलेले पोलिस उज्वला दिसले. त्याने घडलेला सर्व प्रकार त्यांना सांगितला. पोलिसांनी उज्वललवर मेडिकल रुग्णालयात उपचार केले. प्राप्त तक्रारीवरून दोघांवर गुन्हा दाखल केला. घटनेची तत्काळ दखल घेत त्यांनी आरोपी साहिल आणि आकाशला शोधून काढले. त्यांची विचारपूस केली असता त्यांनी गुन्ह्याची कबुली दिली. दोघांनाही पोलिसांनी अटक केली. त्यांच्या ताब्यातून हिसकावलेली दुचाकी ताब्यात घेतली.
————————————–
११० गुन्ह्यातील जप्त ७३३.७८ कि.ग्रॅम गांजा नष्ट
नागपूर शहर पोलिसांनी केलेले विविध ठाण्यांतर्गत ११० कारवाईत ७३३.७८ कि.ग्र्र्रॅम गांजा जप्त करण्यात आला होता. तो सर्व पोलिसांनी नष्ट केला आहे. यासंदर्भातील सर्व कायदेशीर बाबींची पूर्तता करून महाराष्ट्र प्रदुषण नियंत्रण मंडळाच्या बुधवारी सकाळी ११.०० वाजता बुटीबोरी येथील कंपनीत ड्रग डिस्पोजल कमिटीचे अध्यश्व संजय पाटील अपर पोलिस आयुक्त, गुन्हे, सदस्य निमित गोयल पोलिस उपआयुक्त (डिटेक्शन), गुन्हेशाखा, यांच्या समक्ष गुन्ह्यातील जप्त मुद्येमाल गांजा नष्ट करण्याची कारवाई करण्यात आली. यावेळी, कारवाई दरम्यान महाराष्ट्र प्रदूषण नियंत्रण मंडळ, नागपूरचे क्षेत्र अधिकारी विनोद शुक्ला, एमईपीलए युनिट हेड प्रशांत मस्के, एन.डी.पी. एस. गुन्हेशाखा पथक प्रमुख पोलिस निरीक्षक गजानन गुल्हाने व अधिकारी अंमलदार हजर होते.
——————————————