दलित वस्त्यात मार्क्सवादी कम्युनिस्ट पक्षाचा जोरदार प्रचार
दलित वस्त्यात मार्क्सवादी कम्युनिस्ट पक्षाचा जोरदार प्रचार
दक्षिण पश्चिम विधानसभेची निवडणूक म्हणजे मतदाता विरुद्ध भाजप अशी लढत- ॲड. विजय फुलकर
नागपूर (प्रतिनिधी)
आज मंगळवार दिनांक 12 11 2024 रोजी दुपारी चार वाजता मार्क्सवादी कम्युनिस्ट पक्षाच्या वतीने इमामवाडा , रामबाग, जाटतरोडी या भागात दक्षिण-पश्चिम विधानसभेच्या निवडणुकीला माननीय प्रफुल विनोद गुडधे यांच्या निवडणुक प्रचारार्थ पाठिंबा देण्यासाठी 500 पत्रके घरोघरी जाऊन वाटण्यात आली .मार्क्सवादी कम्युनिस पक्ष हा महाविकास आघाडीचा घटक पक्ष असून कोणत्याही उमेदवाराकडून एक चहाही न पिता स्वखर्चाने पत्रके छापून काही प्रमुख व महत्त्वाच्या बाबीवर मार्क्सवादी कम्युनिस्ट पक्षाने महाविकास आघाडीच्या उमेदवारांना व प्रफुल गुडधे यांना पाठिंबा जाहीर केलेला आहे . त्याबाबत बोलतांना ॲड.
विजय फुलकर म्हणाले की , मार्क्सवादी कम्युनिस्ट पक्ष मतदारांना आव्हान करीत आहे , की ,सध्या महाराष्ट्रात सत्तासीन असलेले भाजप सरकार हे जनादेशाच्या पर्यायाने लोकशाही व संविधानाचा अपमान करून ,तसेच इडी ,सी.बी.आय, व आयकर खात्याचा दुरुपयोग करून ,विरोधी पक्षांना फोडून आलेले आहे ,त्यामुळे या सरकारचा पराभव करणे अत्यंत गरजेचे आहे., भाजप द्वारे उद्धव ठाकरे नेतृत्वातील सरकार पाडण्यात आले , अदानीला फायदा पोहोचवणाऱ्या बुलेट ट्रेन ,आरे शेड सारखे प्रकल्प मार्गी लावण्यासाठी धारावीसारख्या मुख्य जमिनी हिस्कावण्याचे तसेच स्मार्ट विद्युत मीटर योजनेद्वारे वीज क्षेत्र अदानीच्या घशात घालण्यासाठी भाजप सरकार काम करत आहे .राज्यात येणारे उपयुक्त व सर्वाधिक रोजगार देणारे उद्योग गुजरात मध्ये स्थलांतरित करायला भाजप ,महायुतीने प्राधान्य दिलेले आहे . अश्या प्रकारे संयुक्त महाराष्ट्र चळवळीचा अपमान होत. आहे .महिला, शेतकरी ,बांधकाम कामगार, यांच्यासाठी तुटपुंज्या फायदा देणाऱ्या योजना दाखवुन आकाशाला भिडणारी महागाई कडे दुर्लक्ष करीत आहे, प्रत्येक शासकीय कामासाठी आवश्यक स्टॅम्प पेपर आता 100 ऐवजी 500 रुपये च्या वर झाला. व विजेच्या सर्वाधिक आकारणी द्वारे भाजप सरकार जनतेची लूट करत आहे .भाजप सरकारच्या काळात सततची पेपर फूट ,नोकरी प्रक्रियेला विलंब व सरकार च्या खात्यांच्या कंत्राटीकरणाद्वारे बेरोजगार युवकांची घोर फसवणूक केली जात आहे .रोजगार हिरावणारा विकास , व सिमेंट रस्ते , पुलांचे दोषपूर्ण बांधकाम होत आहे. शिक्षण शुल्काल प्रचंड वाढ करून भाजप गरीब लोकांना शिक्षणापासून वंचित करण्याचे कारस्थान करीत आहे. परंतु रोजगार भिमुख शिक्षणाची वानवा ,कोणते शिक्षण जे रोजगार देऊ शकेल ?;व कोणता रोजगार उपजीविकेचा प्रश्न स्थाई रूपात सोडवु शकेल ? या जनतेला सतवणाऱ्या प्रश्नांची सरकारी उत्तर शोधावी लागेल .बदलापूर घटनेतील संस्थाचालकांना पाठीशी घालण्याचा प्रयत्न भाजप द्वारे केलाजात आहे..महाराष्ट्रात सांप्रदायिक सद्भाव व जातीय सलोख्याचे रक्षण करण्यास भाजप सरकार अपयशी ठरले आहे.
हि दक्षिण-पश्चिम विधानसभा निवडणुक मतदाता विरुद्ध भाजप कशी काय ?याबाबत विचारणा केली असता ॲड. विजय फुलकर म्हणाले, की वर्ष 2023 मध्ये 23 सप्टेंबर रोजी पूर्ण नागपूर शहरांमध्ये मुसळधार जोरदार पाऊस आला होता , पूर्ण नागपूर शहर बुडाले होते, याच दक्षिण- पश्चिम विधानसभेचे आमदार , व उप – मुख्यमंत्री माननीय देवेंद्र फडणवीस हे मागील दहा ते पंधरा वर्षापासून सत्तेत बसलेले आहे , तरीसुद्धा या दलित वस्ती भागात कधीही फिरकुनही बघितले नाही . परंतु मतदारांना लोभावण्याकरिता निवडणुकीच्या तोंडावर भांड्यांची किट वाटली जाते , मतदारांना पेट्या वाटल्या जातात , मतदारांमध्ये जाती- धर्माची भांडणे लावल्या जातात ही सगळी बाब जनतेच्या लक्षात आलेली असून दक्षिण -पश्चिम विधानसभेतील मतदारांनी दृढ निश्चय केलेला आहे की, ही लढाई आता मतदाता विरुद्ध भाजप अशीच राहील . मतदारांची हि लढत अत्यंत प्रतिष्ठित असून देवेंद्र फडणवीस यांना दक्षिण -पश्चिम मतदार विधानसभेतून हरविण्याची जबाबदारी मतदारांनी घेतली आहे. या निवडणुकीमध्ये महाविकास आघाडीचे प्रफुल विनोद गुडधे हे योग्य उमेदवार असून दलितांचे प्रश्न विधानसभेत मांडण्याकरिता त्यांना प्रचंड बहुमताने निवडून देण्यात यावे असे आवाहन आमचे मार्क्सवादी कम्युनिस्ट पक्ष शहर कमिटी तर्फे मी करीत आहे.
आजच्या या प्रचार अभियान अंतर्गत मा. प्रफुल गुडधे यांच्या समर्थनार्थ जवळपास 500 पत्रके वाटप केले असतांना यामध्ये मार्क्सवादी कम्युनिस्ट पक्ष्यांच्या कार्यकर्त्यांचा फार मोठा सहभाग असून त्यामध्ये एडवोकेट विजय फुलकर ,वैशाली केडिया, तेजस्विनी ढोबले, शीतल चौहान, श्रेया देशमुख, प्रशिक मोटघरे, ,प्रवीण हिंगवे , अशोक मेश्राम, संदेश भालेराव, दीपक शाहू, विक्की भालेराव, शुभम डांगे , कृष्णा पाटिल, शिवम गोडे, ई. चा समावेश होता