महात्मा गांधी, लालबहादूर शास्त्री जयंतीनिमित्त राजुरा काँग्रेसने केले अभिवादन
महात्मा गांधी, लालबहादूर शास्त्री जयंतीनिमित्त राजुरा काँग्रेसने केले अभिवादन
. (रंगराव कुळसंगे)
राजुरा (ता.प्र) :– सत्य आणि अहिंसेचे पुजारी राष्ट्रपिता महात्मा गांधी आणि भारताचे माजी पंतप्रधान लालबहादूर शास्त्री यांच्या जयंतीनिमित्त लोकप्रिय आमदार सुभाषभाऊ धोटे यांच्या श्रीराम मंदिर राजुरा जवळील जनसंपर्क कार्यालय येथे लोकप्रिय आमदार सुभाष धोटे यांच्या अध्यक्षतेखाली जयंती कार्यक्रम आयोजित करून राजुरा काँग्रेसने विनम्र अभिवादन केले. यावेळी राजुरा तालुका काँग्रेसचे कार्यालय गांधी भवन येथील राष्ट्रपिता महात्मा गांधी यांच्या पुतळ्याला पुष्पहार अर्पण करून आदरांजली वाहण्यात आली.
यावेळी माजी नगराध्यक्ष अरुण धोटे, काँग्रेसचे तालुकाध्यक्ष रंजन लांडे, सेवादल काँग्रेसचे अध्यक्ष दिनकर कर्नेवार, माजी उपनगराध्यक्ष सुनील देशपांडे, अँड अरूण धोटे, घुगुस काँग्रेसचे राजु रेड्डी, चंद्रपूर काँग्रेसचे तालुकाध्यक्ष अनिल नरुले, महिला अध्यक्षा निर्मलाताई कुडमेथे, शहराध्यक्ष संध्या चांदेकर, सुधाकर बानकर, जिल्हा महासचिव एजाज अहमद, अनुसूचित जाती विभागाचे तालुकाध्यक्ष कोमल फुसाटे, रुग्ण कल्याण समिती सदस्य अशोक राव, लक्ष्मण एकरे, पंढरी चन्ने, आशिफ सय्यद, भुषण बानकर, सय्यद साबिर, श्रीकांत चिट्टलवार यासह काँग्रेसच्या सर्व फ्रंटल आर्गनायझेशनचे पदाधिकारी, कार्यकर्ते आणि महिला व नागरिक मोठय़ा संख्येने उपस्थित होते.