Breaking
ब्रेकिंग

मुसळधार पावसाने कोंढा बाजार पाण्याखाली

भाजीपाला व्यवसायिकांची कोंडी

0 1 8 5 2 1

मुसळधार पावसाने कोंढा बाजार पाण्याखाली

भाजीपाला व्यवसायिकांची कोंडी

पवनी/E T News

जिल्ह्यात झालेल्या मुसळधार पावसाने पवनी तालुक्यातील कोंढा येथील बाजार पाण्याखाली गेला असून भाजीपाला पाण्यावर तरंगल्याने सावरासावरसाठी व्यावसायिकांची कोंडी झाली.

दर बुधवारला कोंढा येथे आठवडी बाजार भरतो. परिसरातील गावची जनता जीवनावश्यक वस्तू घेण्यासाठी बाजारात येते. दरम्यान विविध क्षेत्रातील व्यावसायिक आपली दुकाने घेऊन येथे येतात. पावसापासून बचावासाठी ताडपत्री व मेनकापडाने दुकाने उभी केली जातात. या वर्षात पहिल्यांदा पावसाने दमदार हजेरी लावल्याने शेतकरी सुखावला असला तरी बाजारात पाणी साचल्याने बसणाऱ्या व्यावसायिकांना नुकसानीचा सामना करावा लागला. भाजीपाला व अन्नधान्याची तुरळक स्वरूपात हानी झाल्याचे पहावयास मिळाले.

पवनी तालुक्यातील कोंढा येथील बाजार पूर्व विदर्भात बैलजोडी, गायवासरू व म्हैस या पाळीव जनावरांच्या खरेदी-विक्री साठी प्रसिध्द आहे. येथे दूरवरून व्यापारी जनता येत असते. जवळपास करोडो रुपयांची उलाढाल सदर बाजारात होत असल्याचे गावकरी सांगतात. पावसाचा फटका भाजीपाला दुकानांना बसल्यामुळे पावसाळ्यापूर्वी स्थानिक ग्रामपंचायतने बाजार ओटे व टिनाच्या शेडची व्यवस्था केल्यास भाजीपाला तथा अन्नधान्य विकणाऱ्या शेतकऱ्यांची नुकसान होणार नाही.

मोहरी फाट्याजवळ झाड कोसळले

तालुक्यात पावसाची दमदार हजेरी लागली. सतत तीन तास झालेल्या पावसाने शेतीत पाणी साचले. शेतकऱ्यांची उरलीसुरली रोवणी पूर्णत्वास येतील. पाऊस सुरू असतांना लाखांदूर मार्गावरील मोहरी फाट्याजवळ रस्त्याच्या कडेला असलेले बाभळीचे झाड रस्त्यावर आडवे पडले. परिणामी एक तास वाहतूक ठप्प होती. आपत्ती व्यवस्थापनची टीम वेळेत पोहचली नसल्याने गावकऱ्यांनी रस्त्यावरील झाड हटवून वाहतुकीसाठी रस्ता मोकळा केला.

1/5 - (1 vote)

EVERY TIME NEWS Live

Santosh Singh Lanjewar/ Chief Editor/ B.A; B. J. (Bachlor of Journalism) MSW (Master of Social work), E T News Channel & " Every Time News Live " News Website Portal/ Facebook Page : ET News Network/ Email : shan.lanjewar@gmail.com/ Cell : +91 738 738 00 22/Experience in Print Media Past 40 years Served : नागपूर पत्रिका # लोकसत्ता # सामना # नवराष्ट्र # निर्मल महाराष्ट्र # लोकमत # लोकमत समाचार # तरुण भारत # देशोन्नती # महासागर # लोकशाही वार्ता & Continue Every Time News Network/ Office : Vidarbha Sahitya Sangh Commercial Complex Jhanshi Rani Square, Sitabuldi, Nagpur

बातमी शेअर करण्यासाठी येथे क्लिक करा

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
Translate »
बातमी कॉपी करणे हा कायद्याने गुन्हा आहे