Breaking
ब्रेकिंग

वरिष्ठ जहाल महिला नक्षलवादीने केले आत्मसमर्पण – तिच्यावर होते 8 लाख रुपयांचे बक्षीस – नक्षल सप्ताहाच्या पूर्वसंध्येला झाली कारवाई

0 1 8 5 2 1

 

वरिष्ठ जहाल महिला नक्षलवादीने केले आत्मसमर्पण – तिच्यावर होते 8 लाख रूपयाचे बक्षीस – नक्षल सप्ताहाच्या पूर्वसंध्येला झाली कारवाई

गडचिरोली पोलीस आणि सीआरपीएफ दलासमोर केले आत्मसमर्पण

* माओवाद्यांच्या गडचिरोली विभागाला संपूर्ण साहित्य पुरविण्याची जबाबदारी तिच्यावर होती.

गडचिरोली/E T News

शासनाने सन 2005 पासून जाहिर केलेल्या आत्मसमर्पण योजनेमुळे तसेच हिंसाचाराच्या जीवनाला कंटाळून वरिष्ठ माओवाद्यांसह अनेक जहाल माओवाद्यांनी आजपर्यंत पोलीसांसमोर आत्मसमर्पण केलेले आहे. त्याचबरोबर आत्मसमर्पित माओवाद्यांचे पोलीस दलाने पुनर्वसन घडवून आणल्यामुळे आजपर्यंत एकुण 671 माओवाद्यांनी गडचिरोली पोलीस दलासमोर आत्मसमर्पण केले आहे. आज दिनांक 27 जूलै 2024 रोजी जहाल महिला माओवादी नामे 1) रिना बोर्रा नरोटे ऊर्फ ललीता, कमांडर, टेलर टिम, गडचिरोली डिव्हीसी, वय 36 वर्ष, रा. बोटनफंुडी, ता. भामरागड, जि. गडचिरोली हिने गडचिरोली पोलीस दलासमोर आत्मसमर्पण केले.

आत्मसमर्पित जहाल महिला माओवादी सदस्याबाबत माहिती

1) रिना बोर्रा नरोटे ऊर्फ ललीता

 दलममधील कार्यकाळ

* सन 2006 मध्ये पेरमिली दलममध्ये भरती.

” सन 2007 पासुन सप्लाय टिम सदस्य म्हणुन काम करण्यास सुरुवात.

* सन 2007-2008 मध्ये शिवणकला, कापड कटींंग व शिलाई मशिन चालविण्याचे प्रशिक्षण घेतले.

* सन 2008-14 मध्ये टेलरींग टिममध्ये सदस्य पदावर कार्यरत होती.

* सन 2014 मध्ये टेलर टिममध्ये कमांडर पदावर बढती होऊन आजपर्यत कार्यरत

 कार्यकाळात केलेले गुन्हे

 चकमक -01

* सन 2020 मध्ये मौजा पेरमिली भट्टी जंगल परिसरात झालेल्या चकमकीमध्ये तिचा प्रत्यक्ष सहभाग होता.

 खून -01

* सन 2019 मध्ये मौजा नैनवाडी जंगल परिसरात झालेल्या एका निरपराध इसमाच्या खुनात तिचा प्रत्यक्ष सहभाग होता.

 आत्मसमर्पीत होण्याची कारणे.

 दलममधील वरिष्ठ कॅडरचे माओवादी सांगतात की, चळवळीकरीता/जनतेकरीता पैसे गोळा करावे. प्रत्यक्षात गोळा केलेला पैसा ते स्वत:साठीच वापरतात. जनतेच्या विकासासाठी हा पैसा कधीच वापरल्या जात नाही.

 नक्षल दलममधील जेष्ठ माओवाद्यांकडुन स्त्रीयांना भेदभावजनक वागणूक दिली जाते.

 वरीष्ठ माओवादी नेते फक्त स्वत:च्या फायद्यासाठी गरीब आदिवासी युवक-युवतींचा वापर करून घेतात.

 दलममध्ये असतांना विवाह झाले तरीही स्वतंत्र वैवाहिक आयुष्य जगता येत नाही.

 गडचिरोली पोलीस दलाच्या सततच्या नक्षलविरोधी अभियानामुळे जंगलातील वावर धोकादायक झाला आहे.

 खबरी असल्याच्या फक्त संशयावरून आमच्याच बांधवांना ठार मारायला सांगतात.

 चकमकीदरम्यान पुरुष माओवादी पळून जाण्यात यशस्वी होतात, मात्र महिला यात ठार मारल्या जातात.

 नक्षल दलममध्ये अहोरात्र भटकंतीचे जीवन असून सुध्दा स्वत:च्या आरोग्याविषयी समस्या उद्भवल्यास त्याकडे काळजीपुर्वक लक्ष दिल्या जात नाही.

 गडचिरोली जिल्ह्रात माओवाद्यांच्या तथाकथित क्रांतीने जनसमर्थन व आधार गमावला आहे.

 शासनाने जाहिर केलेले बक्षिस.

 महाराष्ट्र शासनाने रिना बोर्रा नरोटे ऊर्फ ललीता हिचेवर 08 लाख रूपयाचे बक्षिस जाहिर केले होते.

 आत्मसमर्पणानंतर शासनाकडून मिळणारे बक्षिस.

आत्मसमर्पणानंतर पुनर्वसनाकरीता केंद्र व राज्य शासनाकडुन रिना बोर्रा नरोटे ऊर्फ ललीता हिला एकुण 5.5 लाख रुपये बक्षिस जाहिर केले आहे.

गडचिरोली पोलीस दलाने अतिशय प्रभावीपणे माओवादविरोधी अभियान राबविल्यामुळे तसेच शासनाने माओवाद्यांना आत्मसमर्पणाची सुवर्णसंधी उपलब्ध करून दिल्याने, सन्मानाने जीवन जगण्यासाठी सन 2022 ते 2024 सालामध्ये आतापर्यंत एकुण 23 जहाल माओवाद्यांनी आत्मसमर्पण केले आहे. सदर माओवाद्याचे आत्मसमर्पण घडवून मुख्यप्रवाहात आणण्याबाबतची कारवाई श्री. संदिप पाटील, विशेष पोलीस महानिरीक्षक (नक्षलविरोधी अभियान) नागपूर, श्री. अंकित गोयल, पोलीस उप-महानिरीक्षक गडचिरोली परिक्षेत्र, श्री. अजय कुमार शर्मा, पोलीस उप-महानिरीक्षक (अभियान) सीआरपीएफ, श्री. नीलोत्पल, पोलीस अधीक्षक गडचिरोली व श्री. शंभु कुमार, कमांण्डट 09 बटा. सिआरपीएफ यांच्या मार्गदर्शनाखाली पार पाडली. यावेळी पोलीस अधीक्षक गडचिरोली श्री. नीलोत्पल यांनी आवाहन केले की, विकासकामांना आडकाठी निर्माण करणा­या माओवाद्यांवर पोलीस दल सक्षमपणे कारवाई करण्यास तत्पर असुन, जे माओवादी विकासाच्या प्रवाहात सामील होण्यास ईच्छुक असतील त्यांना विकासाच्या मुख्य प्रवाहात आणण्यासाठी तसेच लोकशाहीतील सन्मानाचे जीवन जगण्यासाठी गडचिरोली पोलीस दल सर्वतोपरी मदत करेल, तसेच त्यांनी हिंसेचा त्याग करुन शांततेचा मार्ग स्विकारावा.

———

 

 

 

बातमी बद्दल आपला अभिप्राय नोंदवा

EVERY TIME NEWS Live

Santosh Singh Lanjewar/ Chief Editor/ B.A; B. J. (Bachlor of Journalism) MSW (Master of Social work), E T News Channel & " Every Time News Live " News Website Portal/ Facebook Page : ET News Network/ Email : shan.lanjewar@gmail.com/ Cell : +91 738 738 00 22/Experience in Print Media Past 40 years Served : नागपूर पत्रिका # लोकसत्ता # सामना # नवराष्ट्र # निर्मल महाराष्ट्र # लोकमत # लोकमत समाचार # तरुण भारत # देशोन्नती # महासागर # लोकशाही वार्ता & Continue Every Time News Network/ Office : Vidarbha Sahitya Sangh Commercial Complex Jhanshi Rani Square, Sitabuldi, Nagpur

बातमी शेअर करण्यासाठी येथे क्लिक करा
0 1 8 5 2 1

EVERY TIME NEWS Live

Santosh Singh Lanjewar/ Chief Editor/ B.A; B. J. (Bachlor of Journalism) MSW (Master of Social work), E T News Channel & " Every Time News Live " News Website Portal/ Facebook Page : ET News Network/ Email : shan.lanjewar@gmail.com/ Cell : +91 738 738 00 22/Experience in Print Media Past 40 years Served : नागपूर पत्रिका # लोकसत्ता # सामना # नवराष्ट्र # निर्मल महाराष्ट्र # लोकमत # लोकमत समाचार # तरुण भारत # देशोन्नती # महासागर # लोकशाही वार्ता & Continue Every Time News Network/ Office : Vidarbha Sahitya Sangh Commercial Complex Jhanshi Rani Square, Sitabuldi, Nagpur

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
Translate »
बातमी कॉपी करणे हा कायद्याने गुन्हा आहे