गॅस पंपावरून ३.६८ लाखांची रोकड लंपास @ सहा दुचाकीसह चोरट्याला अटक
गॅस पंपावरून ३.६८ लाखांची रोकड लंपास @ सहा दुचाकीसह चोरट्याला अटक
नागपूर/E T News
गॅस पंपातील हिशेबाची रक्कम कार्यालयाच्या आलमारीत ठेवली असता ती अज्ञात चोरट्याने चोरून नेली. गणेशपेठ ठाण्यांतर्गत ईमामवाडा चौकात ही घटना घडली. कर्मचारी झोपले असता चोरट्याने ही रक्कम लांबविली. प्राप्त तक्रारीवरून पोलिसांनी आरोपी विरूद्ध गुन्हा दाखल केला आहे.
गोपालनगर येथील जुगलकिशोर ले-आऊट मध्ये प्लॉट नंबर २६, येथे राहणारे नरेंद्र रामकृष्ण शेंद्रे (३६) हे ईमामवाडा चौकात असलेल्या गो गॅस पंपावर सूपरवायजर म्हणून कामावर आहेत. गुरुवारी २ आॅगस्ट रोजी, पंपावर गॅस विक्रीचा एकूण ३ लाख ६८ लाख रुपयांचा व्यवसाय झाला. नरेंद्र शेंद्रे यांनी पंपाच्या कार्यालयातील आलमारीत ठेवली. रक्कम ठेवताना ती पंचा समक्ष ठेवली गेली होती. दरम्यान, शुक्रवारी (ता. ३ आॅगस्ट) रोजी, पहाटे ३ ते ५ वाजताच्या दरम्यान, अज्ञात चोरट्याने चोरून नेली. चोरट्याने पंपाच्या कार्यालयाचे कुलूप तोडले आणि आत प्रवेश केला. येथे असलेल्या लोंखंडी आलमारीतून ३ लाख ६८ हजार या सह पंपवरील डीव्हीआर असा एकूण ३ लाख ७३ हजार रुपयांचा मुद्देमाल चोरून नेला. याप्रकरणी नरेंद्र शेंद्रे यांनी दिलेल्या तक्रारीवरून गणेशपेठ पोलिसांनी आरोपी विरूद्ध गुनहा दाखल केला आहे.
———————–
—–