ब्रेकिंग
संस्कार कथक केंद्र उत्सवाचे आयोजन रविवारी
0
1
8
5
2
1
संस्कार कथक केंद्र उत्सवाचे आयोजन रविवारी
नागपूर/E T News
शहरातील संस्कार कत्थक केंद्र या संस्थेच्या रौप्य महोत्सवी वर्षानिमित्त रविवारी 21 जुलै रोजी दुपारी 1.30 वाजता सिव्हील लाईन्स येथील डॉ. वसंतराव देशपांडे सभागृहात कार्यक्रम आयोजित करण्यात आला आहे.
या समारंभाला प्रमुख अतिथी म्हणून संस्कार भारती, नागपूरच्या अध्यक्षा व ज्येष्ठ सामाजिक कार्यकर्त्या कांचन गडकरी आणि दक्षिण मध्य सांस्कृतिक केंद्राचे माजी संचालक दीपक खिरवडकर उपस्थित राहणार आहेत. या समारंभात कत्थक नृत्याला प्रोत्साहन देण्यासाठी सादरीकरण केले जाणार असल्याची माहिती संस्थेच्या संस्थापक अध्यक्षा प्रियंका अभ्यंकर यांनी प्रसिद्धी पत्रकाद्वारे दिली आहे.
0
1
8
5
2
1