सास्ती येथे आ. सुभाष धोटेंच्या हस्ते रस्ता बांधकामाचे भूमिपूजन

(राजुरा तालुका प्रतिनिधी – रंगराव कुळसंगे)
सास्ती येथे आ. सुभाष धोटेंच्या हस्ते रस्ता बांधकामाचे भूमिपूजन
राजुरा — राजुरा तालुक्यातील मौजा सास्ती येथे लोकप्रिय आमदार सुभाष धोटे यांच्या प्रयत्नाने खनिज विकास निधी अंतर्गत १५ लक्ष रुपये निधीच्या सिमेंट काँक्रेट रस्ता बांधकामाचे भूमिपूजन पार पडले. सास्ती चे ग्रामपंचायत सदस्य मधुकर झाडे यांच्या आ. सुभाष धोटे यांच्याकडे केलेल्या पाठपुराव्यामुळे वार्ड क्रमांक २ मोठा हनुमान मंदिर ते लक्षण गोनेलवार यांच्या घरापर्यंत या रस्त्याचे बांधकाम होणार आहे.
या प्रसंगी राजुरा विधानसभा समन्वयक माजी नगराध्यक्ष अरुण धोटे, काँग्रेसचे तालुकाध्यक्ष रंजन लांडे, सरपंच सुचिता माऊलीकर, ग्रा. प. सदस्य मधुकर झाडे, राजकूमार भोगा, माजी सरपंच रमेश पेटकर, माजी उपसरपंच कुणाल कुडे, माजी जि. प. सदस्य नर्सिंग मादर, माजी सभापती संतोष चन्ने, बंडू चन्ने, तमुस अध्यक्ष श्रीनिवास दारला, महेंद्र नळे, विलास भटारकर, मारोती माऊलीकर, बाळू नळे, बाळू रोगे, प्रकाश भटारकर, मिथिलेश रामटेके, नदीम शेख, दिनेश काळे, संतोष गोनेलवार, भाष्कर चौधरी, गणेश चन्ने, बुग्गारप मुरारी, अनिकेत आसुटकर, नारायण चन्ने, अमोल मुळे, संतोष कुळे, कमलाकर तिखट, राजु नरड, सचिन पेटकर, सुरेश चन्ने, श्रीधर पुलीपाका, तिरुपती भुपाला, बापुजी इटणकर, मधुकर आत्राम, अनिल मोहितकर, रमेश कुंदलवार, धर्मा नगराळे, वसंता आसुटकर, बालाजी पवनकर, महेश लांडे यासह काँग्रेस चे पदाधिकारी व महाविकास आघाडीचे शेकडो कार्यकर्ते, स्थानिक नागरिक मोठय़ा संख्येने उपस्थित होते.