राष्ट्र सेवा विद्यालय येथे शिक्षक दिनानिमित्त “विद्यार्थी सुरक्षा” दिवस उत्साहात साजरा
राष्ट्र सेवा विद्यालय येथे शिक्षक दिनानिमीत्त “विद्यार्थी सुरक्षा” दिवस उत्साहात साजरा– ———————————+++
सौ. शीतल पाटील यांनी समाजात होत असलेल्या वाईट कृत्यापासून बचाव यावर समुपदेशन केले
नागपूर /E T News
राष्ट्र सेवा विद्यालय, लालगंज, नागपूर येथे “शिक्षक दिन’’ निमित्त “विद्यार्थी सुरक्षा” दिवस साजरा करण्यात आला. कार्यक्रम प्रसंगी सौ. शीतल पाटील (संस्थापक अध्यक्षा- महिमा बहुउद्देशीय सामाजिक संस्था, नागपूर) व सौ. राणी कळमकर (बाल कल्याण समिती, समुपदेशिका, नागपूर) उपस्थित होत्या.
शाळेत शिक्षक दिनानिमित्त “विद्यार्थी सुरक्षा” दिवसाच्या कार्यक्रमाप्रसंगी उपस्थित मान्यवरांनी डॉ. सर्वपल्ली राधाकृष्णन यांच्या प्रतिमेला माल्यार्पण व दीप प्रज्वलन करून उपस्थित सर्व विद्यार्थ्यांचे “गुड टच – बँड टच’, समाजात होत असलेले वाईट कृत्य पासून बचाव, स्वसंरक्षण यावर समुपदेशन केले.
कार्यक्रमा प्रसंगी कार्यक्रमाच्या अध्यक्षा श्रीमती शीतल पाटील यांनी, मुली असो की मुले, यांचे समाजात होत असलेले लैंगिक शोषण यावर समुपदेशन केले व यातून स्वतःचा बचाव करण्याच्या उपाययोजना विद्यार्थ्यांना अवगत करून दिल्या. तसेच कार्यक्रमाच्या अतिथी सौ. राणी कळमकर यांनी समाजात होत असलेल्या अनेक घटनांची माहिती सांगून, गुड टच व बॅड टच यावर मार्गदर्शन केले. शाळेतील मुख्याध्यापिका श्रीमती अर्चना गजभिये यांनी सर्व विद्यार्थ्यांना स्वतःची सुरक्षा करण्याबाबत सूचना देऊन पुढील भविष्याकरिता मार्गदर्शन केले. वर्ग 10 वीच्या विद्यार्थ्यांनी “स्वयंशासन” अंतर्गत शिक्षकांची भूमिका पार पाडली. कार्यक्रमाचे सूत्र संचालन घाटबांधे व आभार प्रदर्शन श्री. सी.एम. गमे (सहा. शिक्षक) यांनी केले.