Breaking
ब्रेकिंग

मायक्रोसॉफ्ट : सर्व्हर डाऊन : यंत्रणेत बिघाड : भारतासह जगभरातील बँकींग आणि विमान सेवेला फटका 

मायक्रोसॉफ्टला अब्जावधीचा फटका

0 1 8 5 2 1

मायक्रोसॉफ्ट : सर्व्हर डाऊन : यंत्रणेत बिघाड : भारतासह जगभरातील बँकींग आणि विमान सेवेला फटका

मायक्रोसॉफ्टला अब्जावधीचा फटका

मुंबई/ E T News/ वृत्तसंस्था

जगातील आयटी सेक्टरमधील मायक्रोसॉफ्ट विंडोज सर्वात मोठे सिस्टम आहे परंतु मागील एक तासापासून मायक्रोसॉफ्ट मुळे जगभरात विमानसेवा, रेल्वेसेवा, बँकसेवा, आयटीसेवा, विस्कळीत झाली आहे. भारतात सुद्धा मायक्रोसॉफ्ट सिस्टममुळे विमानसेवा पुर्णपणे विस्कळीत झाले. विमान उड्डाणसेवावर मायक्रोसॉफ्ट सिस्टमवर मोठा परिणाम झाला आहे. दिल्ली आणि मुंबई विमानतळावर प्रवाशांचा गोंधळ उडाला आहे.

जगभरात मायक्रोसॉफ्ट सेवा ठप्प झाल्याने आयटी जगावर मोठे संकट ओढावले आहे. मायक्रोसॉफ्टमुळे अनेक देशातील रुग्णालयाची सेवा, विमानसेवा, रेल्वे सेवा ठप्प झाली आहे. अशातच भारतील सुद्धा बरेच ऑफिसचे कामकाज ठप्प झाले आहे, विमानसेवा सुद्धा काही काळ ठप्प झाली आहे.

विमान प्रवाशांना आवाहन

मायक्रोसॉफ्ट च्या तांत्रिक बिघाडामुळे आमच्या सिस्टममध्ये सुद्धा बिघाड आला आहे. आम्हाला तक्रार निवारण केंद्रात अनेक तक्रारी येत आहेत, जर तुम्ही पुढील २४ तासांत प्रवास करणार असाल तरच आम्हाला संपर्क साधा असे आवाहन इंडिगोने केले आहे.

मायक्रोसॉफ्टच्या तांत्रिक बिघाडामुळे बूकिंग, चेक इन, चेक ऑउट सेवा काही काळापुरत्या विस्कळीत झाली आहे. आम्ही आणि आमची टीम सध्या सिस्टमविना चेक इन आणि बोर्डिंग प्रोसेस सुरु केली आहे. प्रवाशांना विनंती आहे की ज्याचे आज फ्लाइट असतील त्यांनी लवकर विमानतळावर पोहचून चेक इन आणि बोर्डिंगची प्रोसेस लवकर सुरु करावी ज्यामुळे विमान प्रवास करताना अडचणींचा सामना करावा लागणार नाही.

डिजीटल सेवेत काही तांत्रिक बिघाड झाल्याने आमची ऑनलाइन सेवा ठप्प झाली आहे. जगभरात हीच समस्या भासवत असल्याने आम्ही प्रवाशांना विनंती करु की त्यांनी लवकर विमानतळावर पोहचून एअरपोर्टच्या पुढील उड्डाणाच्या प्रोसेसला सुरुवात करावी. गैरसोयीबद्दल आम्ही क्षमस्व आहोत, कठीण प्रसंगात आम्हाला सहकार्य करा असे निवेदन एअर इंडियाने केले आहे.

सध्या तांत्रिक बिघाडाला सामोरे जात आहोत त्यामुळे फ्लाइट सेवेवर पूर्ण परिणाम झाला आहे. आमची संपूर्ण टीम हाच इश्यू सोडवण्याचा प्रयत्न करत आहे. आम्ही लवकरच पुन्हा तुमच्या सेवेत उपलब्ध असू, आम्हाला कठीण काळात सहकार्य करा असे स्पाइसजेटने प्रवाशांना सांगितले आहे. मायक्रोसॉफ्टमुळे भारतातील अनेक कार्यालयातील कामे सुद्धा दुपारपासून ठप्प झाले आहेत, तसेच भारतीय शेअर मार्केटवर सुद्धा मायक्रोसॉफ्टचा गंभीर परिणाम झाला आहे.

5/5 - (1 vote)

EVERY TIME NEWS Live

Santosh Singh Lanjewar/ Chief Editor/ B.A; B. J. (Bachlor of Journalism) MSW (Master of Social work), E T News Channel & " Every Time News Live " News Website Portal/ Facebook Page : ET News Network/ Email : shan.lanjewar@gmail.com/ Cell : +91 738 738 00 22/Experience in Print Media Past 40 years Served : नागपूर पत्रिका # लोकसत्ता # सामना # नवराष्ट्र # निर्मल महाराष्ट्र # लोकमत # लोकमत समाचार # तरुण भारत # देशोन्नती # महासागर # लोकशाही वार्ता & Continue Every Time News Network/ Office : Vidarbha Sahitya Sangh Commercial Complex Jhanshi Rani Square, Sitabuldi, Nagpur

बातमी शेअर करण्यासाठी येथे क्लिक करा

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
Translate »
बातमी कॉपी करणे हा कायद्याने गुन्हा आहे