Breaking
ब्रेकिंग

शहरी भागात नागरी सेवा सुविधांच्या कामांचा ५० कोटींचा निधी वितरणास दिरंगाई झाल्याने आ. सुलभाताई खोडके आक्रमक

0 1 8 5 2 1

शहरी भागात नागरी सेवा सुविधांच्या कामांचा ५० कोटींचा निधी वितरणास दिरंगाई झाल्याने आ. सुलभाताई खोडके आक्रमक

डीपीसी कोअर कमेटी सदस्य आ.सौ. सुलभाताई खोडके यांनी जिल्हा आढावा बैठकीत आक्रमक होऊन पालकमंत्री चंद्रकांतदादा पाटील यांचे वेधले लक्ष*

महापालिकेसाठी जिल्हा नियोजनातून ५० कोटी तर धर्मशाळेसाठी अजूनही निधी न मिळाल्याने आ.सौ. सुलभाताई खोडके यांची तीव्र नाराजी* 

 

अमरावती/E T News

अमरावती महापालिका क्षेत्रात नागरी सेवा व सुविधेची कामे करण्यासाठी आ.सौ. सुलभाताई खोडके यांनी सुचविलेल्या ५० कोटींच्या कामांना शासनाने मंजुरी प्रदान केली असून या संदर्भात शासनाच्या नियोजन विभागाने गेल्या १४ मार्च २०२४ रोजी शासन निर्णय जारी करून नागरी स्थानिक स्वराज्य संस्थांच्या परिक्षेत्रात अधिसूचित विशिष्ट नागरी सेवा व सुविधा पुरविण्यासाठी निधी उपलब्ध करून देण्याबाबत निर्देशित केले. असे असतांना सुद्धा पाच महिने अमरावतीच्या जिल्हा नियोजन अधिकाऱ्याने निधी रोखून धरला व दिरंगाई केल्याने अमरावती येथे शहरी भागातील अनेक विकास कामे करणे अडचणीचे झाले असून शहरात सध्याच्या पावसाचे दिवसात मोठी समस्या निर्माण झाली आहे. जिल्हा नियोजन अधिकाऱ्यांच्या मुजोरी व दिरंगाईमुळेच ५० कोटींचा निधी वितरित होण्यास पाच महिनेपर्यंत दिरंगाई झाल्याने जिल्हा नियोजन समितीच्या कोअर कमेटी सदस्य तथा अमरावतीच्या आ.सौ.सुलभाताई संजय खोडके डीपीसीच्या जिल्हा वार्षिक आढावा बैठकीत चांगल्याच आक्रमक झाल्या. या संदर्भात जिल्हा नियोजन अधिकाऱ्यांवर निलंबनाची कारवाई करण्याची मागणी करीत आमदार महोदयांनी पालकमंत्री ना. चंद्रकांतदादा पाटील यांचे लक्ष वेधले.

वर्ष २०२४ -२०२५ च्या अमरावती जिल्हा वार्षिक नियोजनाची बैठक रविवार दिनांक ०४ ऑगस्ट २०२४ रोजी राज्याचे उच्च व तंत्र, वस्त्रोद्योग , संसदीय कार्य मंत्री तथा तथा जिल्ह्याचे पालकमंत्री ना. चंद्रकांतदादा पाटील यांच्या अध्यक्षतेखाली नियोजन भवन येथे पार पडली. या बैठकीमध्ये आ. सौ.सुलभाताई संजय खोडके अमरावती शहरी भागातील विकासाच्या नियोजना संदर्भात मुद्दे उपस्थित करीत जिल्हा नियोजन विभागाकडून निधी वितरणाला घेऊन होणाऱ्या दिरंगाई व कुचराई बाबत तीव्र नाराजी व्यक्त केली. सध्याचे पावसाचे दिवस आहे. व दोन महिन्यांनी विधानसभा निवडणुक आहे. अशा परिस्थितीत जनतेच्या सुविधेसाठी मंजूर झालेली कामे पूर्ण होणे अपेक्षित आहे. यासाठी गेल्या मार्च मध्येच ५० कोटींचा निधी उपलब्ध झाला,मात्र जिल्हा नियोजन अधिकाऱ्यांनी निधी वितरित करण्यास दिरंगाई केल्याने पाच महिन्यात विकास कामांचे नियोजन बारगळले , अशा परिस्थितीत आता निविदा प्रक्रिया कशी करणार व कामे कशी होणार ? असा प्रश्न सुद्धा आ.सौ. सुलभाताई खोडके यांनी उपस्थित करून अध्यक्ष महोदयांना अवगत केले. पाच महिन्यांपासून बँकेत पैसे पडून ठेवले , यामध्ये बँकेचे काही साटेलोटे आहे का ? त्यांनी अमरावती जिल्हा लुटायला काढला का ? अल्पसंख्यांक विभागाचा निधी सुद्धा रोखूनच आहे , पैसेच वितरित झाले नाही तर टेंडर कसे काढणार ? असा सवाल उपस्थित करून या प्रकरणात नामदार चंद्रकांतदादा पाटील यांनी लक्ष घालून जिल्हा नियोजन अधिकाऱ्यावर निलंबनाची कारवाई करण्याची मागणी आमदार महोदयांनी रेटून धरली.

दरम्यान बैठकीमध्ये माझी लाडकी बहीण योजनेकरिता जिल्हा प्रशासनाच्या वतीने लाभार्थी महिलांची स्क्रुटिनी करून निवडक महिलांना पालकमंत्र्यांच्या हस्ते प्रमाणपत्र देण्यात आले , यामध्ये शहरी भागातील एकही महिला नसल्याने आमदार महोदयांनी प्रशासनाच्या दुटप्पी भूमिकेबाबत आपल्या मनातील खदखद बैठकीमध्ये बोलून दाखविली.

आगामी काळात निवडणुका लागणार आहे, त्यामुळे आजची जिल्हा वार्षिक नियोजन आढावा बैठक शेवटची असल्याने मागील काळात झालेल्या डीपीसी बैठकीच्या इतिवृत्तानुसार मागील विषय मार्गी लागणे महत्वाचे होते. त्यामुळे गेल्या बैठकांची अमरावती येथे रुग्णाच्या नातेवाईकांसाठी धर्मशाळा बांधण्यासंदर्भात मंजुरी देण्यात आली असतांना अजूनपर्यंत पैसे वितरित झाले नसल्याने धर्मशाळा बांधण्यात न आल्याने रुग्णांच्या नातेवाईकांची गैरसोय होत आहे, याबाबतच लवकरात लवकर निर्णय घेण्याची मागणी आमदार महोदयांनी केली. तसेच जिल्हा नियोजन समिती मधून अमरावती महापालिका क्षेत्राअंतर्गत असणारा नियतव्ये १२ कोटी रुपये वरून ३४ कोटीवर करण्यात आला आहे. मात्र विकास कामांसाठी निधी कमी पडत असल्याने अमरावती मनपाला डीपीसीतून ५० कोटींचा निधीची तरतूद करण्यात यावी , शहरातील नाल्यांना पूर जात असल्याने संरक्षण भिंत बांधण्यासाठी जिल्हा नियोजनातून निधी उपलब्ध करून देण्यात यावा , शहराच्या मुख्य चौकात बेवारस लोकांनी ठिय्या मांडला असल्याने वाहतुकीस अडथळा होत आहे, त्यांचे पुनर्वसन व त्यांची निवारा केंद्रात सोय करण्याची उपाययोजना करण्यात यावी, अशी मागणी सुद्धा जिल्हा नियोजन समितीच्या कोअर कमेटी विशेष निमंत्रित सदस्य तथा आ. सौ. सुलभाताई खोडके यांनी डीपीसीच्या बैठकीत लावून धरीत सभागृह दणाणून सोडले. या संदर्भात लवकरच उपाययोजना व कार्यवाही करण्यासंदर्भात जिल्हा नियोजन समितीचे अध्यक्ष तथा जिल्ह्याचे पालकमंत्री ना. चंद्रकांत पाटील यांनी आश्वासित केले.

बातमी बद्दल आपला अभिप्राय नोंदवा

EVERY TIME NEWS Live

Santosh Singh Lanjewar/ Chief Editor/ B.A; B. J. (Bachlor of Journalism) MSW (Master of Social work), E T News Channel & " Every Time News Live " News Website Portal/ Facebook Page : ET News Network/ Email : shan.lanjewar@gmail.com/ Cell : +91 738 738 00 22/Experience in Print Media Past 40 years Served : नागपूर पत्रिका # लोकसत्ता # सामना # नवराष्ट्र # निर्मल महाराष्ट्र # लोकमत # लोकमत समाचार # तरुण भारत # देशोन्नती # महासागर # लोकशाही वार्ता & Continue Every Time News Network/ Office : Vidarbha Sahitya Sangh Commercial Complex Jhanshi Rani Square, Sitabuldi, Nagpur

बातमी शेअर करण्यासाठी येथे क्लिक करा
0 1 8 5 2 1

EVERY TIME NEWS Live

Santosh Singh Lanjewar/ Chief Editor/ B.A; B. J. (Bachlor of Journalism) MSW (Master of Social work), E T News Channel & " Every Time News Live " News Website Portal/ Facebook Page : ET News Network/ Email : shan.lanjewar@gmail.com/ Cell : +91 738 738 00 22/Experience in Print Media Past 40 years Served : नागपूर पत्रिका # लोकसत्ता # सामना # नवराष्ट्र # निर्मल महाराष्ट्र # लोकमत # लोकमत समाचार # तरुण भारत # देशोन्नती # महासागर # लोकशाही वार्ता & Continue Every Time News Network/ Office : Vidarbha Sahitya Sangh Commercial Complex Jhanshi Rani Square, Sitabuldi, Nagpur

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
Translate »
बातमी कॉपी करणे हा कायद्याने गुन्हा आहे