ब्रेकिंग
*मुलानेच केला आईचा खून *मृतदेह पोत्यात भरुन जंगलात फेकला
0
1
8
5
2
1
- *मुलानेच केला आईचा खून
- मृतदेह पोत्यात भरुन जंगलात फेकला
- भंडारा/E T News
- लाखांदूर तालुक्यातील दांडेगाव जंगलात एका अज्ञात महिलेचा मृतदेह गुरुवारी सकाळी आढळून आला होता. सदर महिलेची ओळख पटली असून तिच्याच मुलाने तिचा खून करुन मृतदेह पोत्यात भरुन जंगलात फेकून दिल्याचे समोर आले आहे. याप्रकरणी आरोपी मुलाविरुद्ध दिघोरी पोलिस ठाण्यात गुन्हा नोंदविण्यात आला आहे.
- चित्रलेखा उर्फ रेखा अरूण वासनिक (४५) रा. दिघोरी मोठी असे मृत महिलेचे नाव असून सुमित अरूण वासनिक (२५) असे आरोपी मुलाचे नाव आहे.
- माहितीनुसार, चित्रलेखासोबत मुलगा सुमित नेहमीच भांडण करीत होता. ६ मे २०२४ ते २६ सप्टेंबर २०२४ दरम्यान सुमितने दररोजच्या भांडणावरुन आई चित्रलेखाचा खून केला. त्यानंतर पुरावा नष्ट करण्याच्या उद्देशाने तिचा मृतदेह प्लास्टीक पोत्यात भरुन १५ किलोमीटर लांब दांडेगावच्या जंगलात फेकून दिला.
- पोलिसांनी आरोपी सुमित वासनिकविरुद्ध खुनाचा गुन्हा नोंदविला असून तपास उपविभागीय पोलिस अधिकारी मनोज सिडाम करीत आहेत.
0
1
8
5
2
1