Breaking
ब्रेकिंग

कॅशिअरनेच मारला कोटक महिंद्रा बँकेच्या १८ लाखावर डल्ला/बुलेटने मारली धडक ; महिलेचा मृत्यू /चौथ्या माळ्यावरून पडल्याने कामगाराचा मृत्यू

0 1 8 5 2 1

वरिष्ठ पत्रकार तथा मुख्य संपादक.                    Santosh Singh Lanjewar

कॅशिअरनेच मारला कोटक महिंद्रा बँकेच्या १८ लाखावर डल्ला

——————————-

बुलेटने मारली धडक ; महिलेचा मृत्यू,                 

चौथ्या माळ्यावरून पडल्याने कामगाराचा मृत्यू

नागपूर/ E T News 

कुंपनानेच शेत खाण्याचा प्रकार कोटक महिंद्रा बँकेत उघडकीस आलेला आहे. याप्रकरणी कॅशियार्वर गुन्हा दाखल करण्यात आलेला आहे. कॅशिअरने बँकेची १८ लाख २९ हजार रुपयांनी फसवणूक केली आहे.

 तहसील ठाण्यांतर्गत ईतवारी शाखेत हा प्रकार घडला. रोहीत अशोक डोईजड (३३, रा. प्लॉट नंबर ७०, ब्रम्हानगर, नरसाळा) असे आरोपी कॅशिअरचे नाव आहे.

ईतवारी येथे कोटक महिंद्रा बँकेची शाखा आहे. बेलतरोडी येथील हरीहरनगर, मेश्राम ले-आऊट येथे राहणारे विवेक विजयकुमार चौधरी (३३) मॅनेजर पदावर कार्यरत आहेत. बँकेत रोहीत डोईजड हा देखील कॅशिअर म्हणून काम सांभाळायचा. रोहीतने ६ मार्च ते २१ मे २०२४ दरम्यान बँकेतील १८ लाख २९ हजार अपहार करत बँकेची फसवणूक केली. सदर प्रकार हा विवेक चौधरी यांच्या लक्षात आल्यानंतर त्यांनी आरोपी रोहीत डोईजड याला विचारणा केली असता त्याने उपरोक्त अपहार केल्याची कबुली दिली. या प्रकरणी चौधरी यांनी दिलेल्या तक्रारीवरून व अर्ज चौकशीवरून तहसील ठाण्यातील पोलिस उपनिरीक्षक खान ९८२३०९२६२७ यांनी आरोपीविरूध्द कलम ४०९, ४२० भादंवि अन्वये गुन्हा दाखल केला आहे.

—————————

बुलेटने मारली धडक ; महिलेचा मृत्यू

पायदळी रस्ता ओलांडताना एका भरधाव बुलेट चालकाने महिलेला धडक दिली. या अपघातात महिलेचा मृत्यू झाला. वंदना श्रीराम नाईक (४५, रा. अध्यापकनगर, मानेवाडा रिंग रोड, हुडकेश्वर) असे मृतक महिलेचे नाव आहे. हुडकेश्वर ठाण्यांतर्गत हा अपघात झाला.

माहितीनुसार, वंदना नाईक या १५ सप्टेंबरला रात्री १०.३० वाजताच्या सुमारास उदयनगर चौकाकडे जाणा-या मार्गावरून पायदळी रस्ता ओलांडत होत्या. यावेळी, त्यांच्या दिशेने रस्त्यावरून भरधाव बुलेट (एमएच ४९ सीसी ६३९९) आली. चालकाने वंदना नाईक यांना धडक दिली. अपघातात त्या गंभीर जखमी झाल्या. अपघातानंतर आरोपी हा घटनास्थळवरून वाहनासह पळून गेला. जखमी अवस्थेत नाईक यांना स्थानिक खासगी रुग्णालयात दाखल करण्यात आले. येथे डॉक्टरांनी त्यांना तपासून रात्री ८.३० वाजता तपासून तपासुन मृत घोषित केले. याप्रकरणी वंदना नाईक यांचे पती श्रीराम गंगाधर नाईक (६३) यांनी दिलेल्या तक्रारीवरून हुडकेश्वर पोलिसांनी आरोपीविरूद्ध कलम १०६(१) भांदवि सहकलम १३४, १७७ मो.वा.का अन्वये गुन्हा दाखल केला आहे.

——————————

चौथ्या माळ्यावरून पडल्याने कामगाराचा मृत्यू

बांधकाम सुरू असलेल्या इमारतीच्या चौथ्या माळ्यावरून खाली पडल्याने कामगाराचा मृत्यू झाला. शेषराव गणेश साचे (३५, रा. काशीवाठी, ता. जि. गोंदिया, ह.मु., भरतनगर, बस स्टॉपजवळ, अंबाझरी) असे या कामगाराचे नाव आहे. अंबाझरी ठाण्यांतर्गत ही घटना घडली.

अमरावती रोड येथे राजन वरकी यांचया कमर्शियल नवनिर्माणाधीन इमारतीचे काम सुरू आहे. इमारतीच्या चौथ्या माळ्यावर सेटिंÑगची कामे केली जात आहे. येथे मृतक शेषराव साचे हे कामावर होते. सोमवारी १६ सप्टेंबला सकाळी ९.१५ वाजता ते सेंट्रिंगची कामे करत असताना त्यांचा अचानक तोल गेला आणि ते थेट चौथ्या माळ्यावरून खाली कोसळले. त्यांच्या डोक्याला जबर मार लागल्याने ते बेशुध्द झाले. त्यांच्यासोबत काम करणा-या अन्य कामगारांनी त्यांना खासगी रुग्णालयात उपचाराकरिता दाखल केले असता डॉक्टरांनी त्यांना मेयो रुग्णालयात रेफर केले. येथे दाखल केले असता डॉक्टरांनी त्यांना तपासून मृत घोषित केले. याप्रकरणी प्राप्त वैद्यकीय सूचनेवरून अंबाझरी पोलिसांनी अकस्मात मृत्यूची नोंद घेतलेली आहे.

————————————-

बातमी बद्दल आपला अभिप्राय नोंदवा

EVERY TIME NEWS Live

Santosh Singh Lanjewar/ Chief Editor/ B.A; B. J. (Bachlor of Journalism) MSW (Master of Social work), E T News Channel & " Every Time News Live " News Website Portal/ Facebook Page : ET News Network/ Email : shan.lanjewar@gmail.com/ Cell : +91 738 738 00 22/Experience in Print Media Past 40 years Served : नागपूर पत्रिका # लोकसत्ता # सामना # नवराष्ट्र # निर्मल महाराष्ट्र # लोकमत # लोकमत समाचार # तरुण भारत # देशोन्नती # महासागर # लोकशाही वार्ता & Continue Every Time News Network/ Office : Vidarbha Sahitya Sangh Commercial Complex Jhanshi Rani Square, Sitabuldi, Nagpur

बातमी शेअर करण्यासाठी येथे क्लिक करा
0 1 8 5 2 1

EVERY TIME NEWS Live

Santosh Singh Lanjewar/ Chief Editor/ B.A; B. J. (Bachlor of Journalism) MSW (Master of Social work), E T News Channel & " Every Time News Live " News Website Portal/ Facebook Page : ET News Network/ Email : shan.lanjewar@gmail.com/ Cell : +91 738 738 00 22/Experience in Print Media Past 40 years Served : नागपूर पत्रिका # लोकसत्ता # सामना # नवराष्ट्र # निर्मल महाराष्ट्र # लोकमत # लोकमत समाचार # तरुण भारत # देशोन्नती # महासागर # लोकशाही वार्ता & Continue Every Time News Network/ Office : Vidarbha Sahitya Sangh Commercial Complex Jhanshi Rani Square, Sitabuldi, Nagpur

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
Translate »
बातमी कॉपी करणे हा कायद्याने गुन्हा आहे