Breaking
ब्रेकिंग

चंद्रपूर जिल्ह्यातील बल्लारपूर येथे 3 पिस्तुल आणि 18 जिवंत काडतुसे जप्त

0 1 8 7 0 2

चंद्रपूर जिल्ह्यातील बल्लारपूर येथे 3 पिस्तुल आणि 18 जिवंत काडतुसे जप्त

बल्लारपूर पोलिसांनी केली पाच आरोपींना अटक

चंद्रपूर (रंगराव कुळसंगे)

                 बल्लारपूर पोलिसांनी दिनांक 4 डिसेंबर 2024 रोजी साईबाबा वार्ड बल्लारपूर व बामणी येथून 5 आरोपींना 3 पिस्तुल व 18 जिवंत कारतुसांसह अटक केली. यामुळे चंद्रपूर जिल्ह्यात एकच खळबळ उडाली आहे. एवढ्या मोठ्या प्रमाणात शस्त्र मिळाल्याने आणि अलिकडच्या काळात गुन्हेगारीच्या अनेक घटना घडल्याने व गोळीबार झाल्याने चंद्रपूर जिल्ह्यात गुन्हेगारीचे प्रमाण वाढत आहे का, असा प्रश्न निर्माण झाला आहे. मात्र बल्लारपूर पोलिसांनी कर्तबगारी दाखवित वेळीच कारवाई करीत शस्रासह आरोपींना ताब्यात घेतल्याने मोठी संभाव्य घटना टाकल्याचे समजले जात आहे.

              प्राप्त माहितीनुसार बल्लारपूर येथील साईबाबा वॉर्डातील व शेजारच्या बामणी येथील काही युवकांजवळ पिस्तुल व जिवंत काडतुसे असल्याची माहिती बल्लारपूर पोलिसांना मिळाली. ही

माहिती प्राप्त होताच बल्लारपूर पोलिसांचे पथक घटनास्थळी पोहोचले आणि छापा टाकून आरोपी मुकेश उर्फ मुक्कू विश्वनाथ हलदर, वय 28, अमित दिलीप चक्रवर्ती वय 34, जितेंद्रसिंग उर्फ निक्कू गोविंदसिंग ढिल्लोन, वय 29 हे तिन्ही राहणार शिवनगर वार्ड बल्लारपूर आणि संघर्ष उर्फ गोलू बंडू रामटेके वय 27, राहणार संतोषी माता वार्ड बल्लारपूर तसेच पाचवा काश्मीरसिंग महेंद्रसिंग बावरी वय 20, राहणार फुकटनगर, बामणी या पाचही आरोपींनी शिताफीने ताब्यात घेतले. या आरोपींजवळून 03 पिस्तुल आणि 18 जिवंत काडतुसे जप्त करण्यात आली आहेत, यांची किंमत अंदाजे 97 हजार रुपये आहे.

            बल्लारपूर पोलिसांनी कलम कलम 3 – 25 शस्त्रास्त्र कायद्यान्वये गुन्हा दाखल करून आरोपींना अटक केली. ही कारवाई पोलीस अधीक्षक मुमक्का सुदर्शन, अपर पोलीस अधीक्षक रीना जनबंधू, राजुरा उपविभागीय पोलीस अधिकारी दिपक साखरे यांच्या मार्गदर्शनात पोलीस निरीक्षक सुनील गाडे, सहायक पोलिस निरीक्षक अंबादास टोपले, उपनिरीक्षक हुसेन शहा, आनंद परचाके, सुनील कामतकर, रणविजय ठाकूर, संतोष दंडेवार, संतोष पंडित, सत्यवान कोटनाके, कविता जुमनाके, वशिष्ठ रंगारी, शेखर माथनकर, लखन चव्हाण, मिलिंद चव्हाण, भूषण टोंगे व अन्य पोलिस जवानांनी केली.

5/5 - (1 vote)

EVERY TIME NEWS Live

Santosh Singh Lanjewar/ Chief Editor/ B.A; B. J. (Bachlor of Journalism) MSW (Master of Social work), E T News Channel & " Every Time News Live " News Website Portal/ Facebook Page : ET News Network/ Email : shan.lanjewar@gmail.com/ Cell : +91 738 738 00 22/Experience in Print Media Past 40 years Served : नागपूर पत्रिका # लोकसत्ता # सामना # नवराष्ट्र # निर्मल महाराष्ट्र # लोकमत # लोकमत समाचार # तरुण भारत # देशोन्नती # महासागर # लोकशाही वार्ता & Continue Every Time News Network/ Office : Vidarbha Sahitya Sangh Commercial Complex Jhanshi Rani Square, Sitabuldi, Nagpur

बातमी शेअर करण्यासाठी येथे क्लिक करा

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
Translate »
बातमी कॉपी करणे हा कायद्याने गुन्हा आहे
बातमी देण्यासाठी येथे क्लिक करा
22:43