Breaking
ब्रेकिंग

…अखेर आक्रमण युवक संघटनेच्या प्रयत्नाने वृषभ गावंडे या ८ वर्षाच्या मुलाचा सर्जरी चा मार्ग झाला सुकर 

0 1 8 5 2 0

  ...अखेर आक्रमण युवक संघटनेच्या प्रयत्नाने वृषभ गावंडे या ८ वर्षाच्या मुलाचा सर्जरी चा मार्ग झाला सुकर 

नागपूर/E T News

वृषभ अवधूत गावंडे या ८ वर्षाचा मुलगा राहणार अमरावती याचा गंभीर रित्या अपघात झाल्यामुळे त्याच्या हाताला दुखापत होऊन हात फॅक्चर झाला होता. त्याच्या नातेवाईकांनी सरळ त्याला अमरावतीतून नागपूर मेडिकल हॉस्पिटल मध्ये भारती केले होते. परंतु जवळपास दोन हप्ते उलटूनही त्याचा योग्य रीतीने उपचार सुरू झाला नव्हता.त्याच्या हाताला फक्त बँडेज पट्टी बांधून सर्जरी चा वेळ निश्चित मेडिकल मधील डॉक्टरस परिवाराला सांगत नव्हते. त्यातच वृषभ गावंडे ची परिस्थिती आर्थिक हलाखीची असल्यामुळे महात्मा फुले जन आरोग्य योजनांच्या माध्यमातून त्याच्या वडिलांनी सर्जरी करिता आपलिकेशन केले परंतु सर्जरीच्या या दरम्यान मुलाचे राशन कार्ड वर नाव नसल्यामुळे त्यांना दोन-चार दिवस अमरावती ते नागपूर फिरावं लागले

यातच त्यांचा एक हप्ता निघून गेला नंतर त्यांनी अमरावती तहसीलदाराचे एपीडिट्यूड आणल्यानंतर शेवटी राशन कार्ड वर नाव चढले परंतु त्याही नंतर महात्मा फुले जन आरोग्य योजनेच्या अधिकाऱ्याने त्याच्या सर्जरीची तारीख निश्चित सांगितले नाही किंवा अप्रुव्हल दिले नाही.कारण सर्वर डाऊन आहे हे कारण सांगून पुन्हा टाळाटाळ करण्याचे काम सुरू केले, यादरम्यान पुन्हा त्यांचें चार-पाच दिवस उलटले आणि अशातच गेल्या दोन हप्त्यापासून पेशंट व पेशंटच्या रुग्णांची मानसिक स्थिती खराब होत गेली शेवटी निराश हतबल होऊन ते प्रायव्हेट हॉस्पिटलमध्ये जाण्याचा निर्णय घेण्याचा विचार सुरू करीत असताना आक्रमण युवक संघटनेला या प्रकरणाची या समस्येची माहिती मिळाली लगेच मेडिकलचे अधिष्ठान (डीन) डॉ.राज गजभिये व  डॉ.अविनाश जी गावंडे मेडिकल सर्जरी डिपार्टमेंट यांना निवेदन देऊन या संपूर्ण परिस्थितीची माहिती सांगून मेडिकलच्या दररोजच्या होणाऱ्या रुग्णांची गैरसोय व वेळेवर उपचार न मिळाल्यामुळे अनेक पेशंट चागल्या आरोग्यापासून वंचित होत आहेत आणि त्यामुळेच बरेचसे रुग्ण निराश होऊन प्रायव्हेट हॉस्पिटल कडे वळतात आक्रमण संघटनेच्या माध्यमातून वरिष्ठांवर दबाव आणून निवेदनाच्या द्वारे या संपूर्ण परिस्थितीची माहिती मेडिकलच्या प्रशासनाला देण्यात आली.

आक्रमणच्या या निवेदनामुळे मेडिकल प्रशासन जागे होऊन वृषभ गावंडे यांच्या सर्जरीच्या मार्ग मोकळा झाला व संबंधित हाडाचे सर्जन डॉक्टर प्रवीण अग्रवाल यांनी माहिती दिली की पेशंटला ताप असल्यामुळे एक -दोन दिवसांनी त्याला सर्जरी करण्याकरिता लगेच ऑपरेशन थेटर मध्ये ऑपरेशन करण्याकरिता नेण्यात येणार असे आश्वासन मेडिकल प्रशासनातर्फे मिळाले परंतु जर का मेडिकल प्रशासनाने वेळेवर या संपूर्ण समस्येवर लक्ष केंद्रित केले नाही तर आक्रमण संघटना मेडिकलच्या गेटच्या समोर रोज येणाऱ्या हजारो रुग्णांच्या गैरसोय करिता धरणे प्रदर्शन व जन आंदोलन करणार.

आक्रमण युवक संघटनेचे जिल्हाध्यक्ष ओपुल तामगाडगे, अमरावतीचे जिल्हा सचिव लखन सुखदेवे, पेशंटचे वडील अवधूत गावंडे, जिल्हा संघटक प्रमुख विशाल बनसोड, दीक्षा चौरे, धनराज हाडके, रोशन ठवरे,रवींद्र पाटील, शहराध्यक्ष मस्तरी वारसी, सचिन कुंभारे आक्रमण कार्यकर्ता इत्यादी कार्यकर्त्यांच्या उपस्थितीमध्ये निवेदन देण्यात आले.

बातमी बद्दल आपला अभिप्राय नोंदवा

EVERY TIME NEWS Live

Santosh Singh Lanjewar/ Chief Editor/ B.A; B. J. (Bachlor of Journalism) MSW (Master of Social work), E T News Channel & " Every Time News Live " News Website Portal/ Facebook Page : ET News Network/ Email : shan.lanjewar@gmail.com/ Cell : +91 738 738 00 22/Experience in Print Media Past 40 years Served : नागपूर पत्रिका # लोकसत्ता # सामना # नवराष्ट्र # निर्मल महाराष्ट्र # लोकमत # लोकमत समाचार # तरुण भारत # देशोन्नती # महासागर # लोकशाही वार्ता & Continue Every Time News Network/ Office : Vidarbha Sahitya Sangh Commercial Complex Jhanshi Rani Square, Sitabuldi, Nagpur

बातमी शेअर करण्यासाठी येथे क्लिक करा
0 1 8 5 2 0

EVERY TIME NEWS Live

Santosh Singh Lanjewar/ Chief Editor/ B.A; B. J. (Bachlor of Journalism) MSW (Master of Social work), E T News Channel & " Every Time News Live " News Website Portal/ Facebook Page : ET News Network/ Email : shan.lanjewar@gmail.com/ Cell : +91 738 738 00 22/Experience in Print Media Past 40 years Served : नागपूर पत्रिका # लोकसत्ता # सामना # नवराष्ट्र # निर्मल महाराष्ट्र # लोकमत # लोकमत समाचार # तरुण भारत # देशोन्नती # महासागर # लोकशाही वार्ता & Continue Every Time News Network/ Office : Vidarbha Sahitya Sangh Commercial Complex Jhanshi Rani Square, Sitabuldi, Nagpur

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
Translate »
बातमी कॉपी करणे हा कायद्याने गुन्हा आहे