बल्लारपूर येथे काँग्रेस कार्यकर्ता बैठक : निरीक्षक खा. चामेला किरण रेड्डींनी साधला संवाद
बल्लारपूर येथे काँग्रेस कार्यकर्ता बैठक
निरीक्षक खा. चामेला किरण रेड्डींनी साधला संवाद
बल्लारपूर (ता.प्र) :– विधानसभा निवडणूक २०२४ च्या पार्श्वभूमीवर चंद्रपूर जिल्हयातील पूर्व तयारी बाबतचा आढावा घेण्यासाठी खासदार मा. श्री. चामेला किरण रेड्डी, निरीक्षक चंद्रपुर लोकसभा, खासदार मा. श्रीमती प्रतिभाताई धानोरकर, चंद्रपुर लोकसभा मतदार संघ, चंद्रपूर जिल्हा काँग्रेसचे जिल्हाध्यक्ष आमदार मा. श्री. सुभाषभाऊ धोटे, मा. श्री. विनोद दत्तात्रय, समन्वयक चंद्रपुर लोकसभा यांच्या प्रमुख उपस्थितीत गोपाला पॅलेस, बल्लारपूर येथे ब्लॉक अध्यक्ष तालुका काँग्रेस कमिटी राजुरा, कोरपना, गोंडपिपरी, जिवती, चंद्रपुर ग्रामीन / शहर, बल्लारपुर ग्रामीण / शहर, मुल, पोंभूर्णा जिल्हा चंद्रपूर आणि प्रमुख काँग्रेस व सर्व आघाडी संघटनांचे पदाधिकारी, कार्यकर्ते, बुथ प्रतिनिधी यांची बैठक पार पडली. यावेळी निवडणूकीच्या अनुषंगाने अनेक महत्त्वपूर्ण विषयांवर सविस्तर चर्चा करण्यात आली.
यावेळी चंद्रपूर शहर काँग्रेसचे अध्यक्ष रितेश तिवारी, महिला काँ. जिल्हाध्यक्षा सुनंदा धोबे, जिल्हा मध्यवर्ती बँकेचे अध्यक्ष संतोषसिंग रावत, माजी नगराध्यक्ष अरूण धोटे, माजी नगराध्यक्ष घनश्याम मुलचंदाणी, विनोद अहिरकर, विजय नळे, रजनीताई हजारे, चंदाताई वैरागडे, विजयराव बावणे, डॉ. विश्वास झाडे, राजुभाऊ झोडे, डॉ. अभिलाषा गावतुरे, प्रकाश पाटील मारकवार, नंदू नागरकर, भास्कर माकोडे, अब्दुल करीम, शिवा राव, शरीफ भाई यासह अनेक मान्यवर उपस्थित होते.