आदिवासी समाज बांधवांच्या ” Indian Trible Queen and King Fashion show 2025 ” ला उत्स्फूर्त प्रतिसाद

आदिवासी समाज बांधवांच्या ” Indian Trible Queen and King Fashion show 2025 ” ला उत्स्फूर्त प्रतिसाद
नागपूर/विशेष प्रतिनिधी
गोंड राजे बख्त बुलंद शाह आदिवासी बहुउद्देशिय संस्था नागपूर व आदिवासी बांधवांच्या संयुक्त विद्यमाने आदिवासी संस्कृती वारसा, परंपरा, सभ्यता आणि अस्तित्व कायम राहावे यासाठी नागपूर शहरात प्रथमच ” Indian Trible Queen and King Fashion show 2025 ” चे नुकतेच आयोजन करण्यात आले होते. या फॅशन शो ला आदिवासी बांधव तसेच इतर श्रोत्यांकडून उस्फूर्त प्रतिसाद मिळाला.
या फॅशन शो चे आयोजन आदिवासी गोंड राजे बख्त बुलंद शाह यांच्या किल्ल्यावर असलेल्या राज घराण्यातील राणी लॉन मध्ये करण्यात आला.
यावेळी प्रामुख्याने मुख्य आयोजक, गोंड राजे बख्त बुलंद शाह आदिवासी बहुउद्देशिय संस्थेच्या अध्यक्षा संजीवनीताई कुमरे, सहआयोजक श्रद्धा सयाम, नेहा कनाके, रानू मसराम , प्राजक्ता ताराम, विवेक सयाम , राहुल पंधराम तर मुख्य अतिथी म्हणून आदिवासी विकास विभागाचे अप्पर आयुक्त रवींद्र ठाकरे , राजे वीरेंद्र शाह, परिणीता फुके, चेरिल पडोळे, आदिवासी टायगर सेना अध्यक्ष जीवन तोडसाम, कविता मेश्राम, गोंडी सिंगर मेघराज मेश्राम, अजय मसराम, गाडगे बाबा फाउंडेशनचे अध्यक्ष संजय भिलकर, समीर कुमरे, प्रफुल धूर्वे, वनाधिकारी आणि शॉर्ट मूव्ही डायरेक्टर अरविंद मसराम तर पर्यवेक्षक म्हणून सेवानिवृत्त आयएएस अधिकारी डॉ. नीलकंठ कुरसंगे, तिरपुडे कॉलेज असोसिएट प्रोफेसर डॉ. नरेश धूर्वे , डॉ. रायन घोडाम, भाग्यश्री पाल्लेवार आणि इतर समाज सेवक प्रफुल पेंदम , ओफ्रोटचे अध्यक्ष राजेंद्र मरसकोल्हे, कल्पना धुर्वे, अर्चना कुरसंगे, सरोज गेडाम, भारती मरसकोल्हे, कल्याणी कुमरे, प्रवीण मसराम, अनिकेत दंदेवार इत्यादी मंडळी उपस्थित होती.
—————–