ब्रेकिंग
सत्य सनातनी सेनेतर्फे नागपुरात पहिल्यांदा भगवा स्ट्रीट
नागपूर होणार सोन्याची जेजुरी, पंढरीची वारी जेजुरीच्या दारी

0
1
7
5
1
3
नागपूर/ E T News
नागपूर येथील लक्ष्मीनारायण मंदिर सक्करधरा तलाव परिसरात भगवा स्ट्रीट हा कार्यक्रम मोठ्या जल्लोषात राबविण्यात आला. त्यावेळी प्रत्यक्षात खंडोबा महाराजांच्या आगमनाने भंडारा उधळून तो परिसर सोन्याचे जेजुरी म्हणून दुमदुमला. सोबतच बाहुबली हनुमानजी आगमना नंतर हनुमान चालीसा पठण झाले. ढोल ताशाच्या गजरात पंढरीची वारी जेजुरीच्या दारी गेली. या कार्यक्रमाचा पहिला टप्पा असून असेच सांस्कृतिक (देव, देश, धार्मिक) कार्यक्रम सत्य सनातनी सेने द्वारा पुढे घेतले जातील.असे प्रसिद्धी पत्रकाद्वारे पुष्कर जोध यांनी कळविले आहे.
0
1
7
5
1
3