Breaking
देश-विदेशब्रेकिंग

अखेर जो बायडेन यांची अमेरिकेच्या अध्यक्षीय निवडणुकीतून माघार 

0 1 8 5 2 0

प्रा. डॉ. सुधीर अग्रवाल वर्धा

येत्या चार महिन्यात अमेरिकेच्या राष्ट्राध्यक्षपदाची निवडणूक होणार आहे. माजी राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प आणि बायडेन यांच्यामध्ये झालेल्यावादविवादादरम्यानही बायडेन यांना आपली भूमिका ठोसपणे मांडता आली नव्हती. काही दिवसांपूर्वी बायडेन यांना कोरोनाचा संसर्ग झाला होता. या संसर्गामुळे श्वसनाचा त्रासही सुरू झाला होता. गेल्या काही महिन्यात सार्वजनिक कार्यक्रमांमध्ये त्यांना विस्मरण झाल्याचंही दिसलं होतं. याचे अनेक व्हिडिओदेखील समोर आले होते. त्यामुळे बायडेन यांनी माघार घ्यावी यासाठी डेमोक्रॅट्स पक्षातून प्रयत्न केले जात होते. अखेर आता बायडेन यांनीच निवडणुकीतून माघार घेणार असल्याचं जाहीर केलं. सोशल मीडिया अकाऊंटच्या माध्यमातून बायडेन यांनी आपली भूमिका स्पष्ट केली. त्यांनी आपल्या पोस्टमध्ये लिहिलं, ‘अमेरिकेसारख्या बलशाही देशाचं राष्ट्राध्यक्षपद भूषवणं हा सर्वोच्च सन्मानाचा क्षण आहे असं बायडेन यांनी म्हटलं आहे. पुन्हा एकदा राष्ट्राध्यक्षपदी निवडून येण्याची माझी इच्छा आणि तयारी होती. पण देशाचं आणि डेमोक्रॅट्स पक्षाचं हित लक्षात घेऊन मी राष्ट्राध्यक्षपदाच्या निवडणुकीतून बाजूला होण्याचा निर्णय घेतला आहे. राष्ट्राध्यक्ष या नात्याने उर्वरित काळ मी माझे कर्तव्य पार पाडेन, असं बायडेन यांनी म्हटलं आहे.

बायडेन यांच्या उमेदवारीला डेमोक्रॅटिक पक्षातंर्गत विरोध वाढत होता. डोनाल्ड ट्रम्प यांच्यासोबत राष्ट्रपतीपदाच्या निवडणुकीत पिछाडीवर पडल्यानंतर पक्षाचे लोकच बायडेन यांच्यावर माघारीसाठी दबाव टाकत होते. अमेरिकेचे माजी राष्ट्राध्यक्ष बराक ओबामा आणि माजी स्पीकर नॅन्सी पॅलोसी यांनी सुद्धा बायडेन यांना कमी होणाऱ्या जनसमर्थनावर चिंता व्यक्त केलेली. या दोन्ही नेत्यांनी सुद्धा बायडेन यांना माघारीसाठी आवाहन केलं होतं. पक्षांतर्गतही निवडणूक न लढण्यासाठी दबाव वाढत होता. बहुतांश अमेरिकन्स त्यांच्या कामकाजाच्या पद्धतीवर नाराज होते. अर्थव्यवस्थेसह अनेक मुद्यांवर त्यांना टीकेचा सामना करावा लागत होता.

ट्रम्प यांच्यावर झालेल्या हल्ल्यानंतर बायडेन यांची लोकप्रियता कमी झाली. ट्रम्प यांच्यावर प्राणघातक हल्ल्याचा जो प्रयत्न झाला, त्यामुळे ट्रम्प यांच्या जन समर्थनात वाढ झाली आहे. ट्रम्प यांचे समर्थक या घटनेकडे हत्येचा प्रयत्न म्हणून पाहतात. याचा थेट परिणाम नोव्हेंबर महिन्यात होणाऱ्या अमेरिकन राष्ट्राध्यक्षपदाच्या निवडणुकीत दिसून येईल.

ज्यो बायडेन यांचं वाढत वय आणि स्मृती दोष यावर सतत प्रश्चचिन्ह उपस्थित करण्यात येत होतं. काही ठिकाणी बायडेन अडखळल्याचे, चालता चालत पडल्याचे व्हिडिओ व्हायरल झाले. त्यामुळे त्यांच्या आरोग्याबद्दल अनेक शंका निर्माण झाल्या. त्याशिवाय नाटो समिटमध्ये युक्रेनचे राष्ट्रपती जेलेंस्की यांना ते पुतिन म्हणाले. उपराष्ट्राध्यक्ष कमला हॅरिस यांचं नाव विसरले, त्यांना ट्रम्प म्हणून बोलावलं. म्हणून बायडेन यांचा विरोध वाढत चाललेला.

अमेरिकेच्या राष्ट्रपतीपदाच्या निवडणुकीत प्रेसिडेंशियल डिबेट खूप महत्त्वाची असते. रिपब्लिकन उमेदवार डोनाल्ड ट्रम्प आणि ज्यो बायडेन यांच्यामध्ये मागच्या महिन्यात प्रेसिडेंशियल डिबेट झाली. यावेळी बायडेन अनेकदा अडखळताना दिसले. अनेक प्रसंगात ते खूप विचार करुन उत्तर देत होते. त्यामुळे संपूर्ण डिबेटमध्ये ट्रम्प यांचीच हवा दिसून आली. या डिबेटनंतर ट्रम्प यांनी बायडेन यांची खराब प्रकृतीवरुन हल्लाबोल केला. प्रेसिडेंशियल डिबेट मध्ये त्यांची एक प्रकारे हार झाली. त्यामुळे निवडणूक लढवण्यासाठी मिळणाऱ्या निधीमध्ये मोठी घसरण झाली.

बायडेन यांची खराब प्रकृती हे त्यांनी माघार घेण्यामागच एक प्रमुख कारण आहेच. बायडेन यांचं वय आता ८१ आहे. ते अनफिट दिसतात. बायडेन दिवसाला फक्त ६ तास काम करतात, असं सुद्धा काही मीडिया रिपोर्ट्समध्ये म्हटलं आहे. काही दिवसांपूर्वी बायडेनच स्वत: म्हणाले होते. डॉक्टर्सनी अनफिट घोषित केलं, तर ते राष्ट्राध्यक्ष पदाच्या निवडणुकीतून बाहेर होतील.

प्रेसिडेन्शियल डिबेट काय आहे?

प्रेसिडेन्शियल डिबेट म्हणजे राष्ट्राध्यक्षपदासाठीचे उमेदवार असणाऱ्या नेत्यांमधला जाहीर वादविवाद.१९६०मध्ये रिचर्ड निक्सन आणि जॉन एफ. केनेडी यांच्यातलं प्रेसिडेन्शियल डिबेट पहिल्यांदा टीव्हीवरून दाखवण्यात आलं होतं. आणि व्हाईट हाऊसमध्ये दाखल होण्यासाठी केनेडी यांनी याची मदत झाली, असंही म्हटलं गेलं होतं.

१९७६पासूनच्या प्रत्येक राष्ट्राध्यक्षपदासाठीच्या निवडणुकीत दोन्ही पक्षांच्या उमेदवारांमध्ये किमान एक तरी असं डिबेट झालेलं आहे.यावेळच्या निवडणुकीत २ प्रेसिडेन्शियल डिबेट्स होतील. पहिलं CNN चा इव्हेंट असेल, तर दुसरं ABC न्यूजचा. ९० मिनिटांच्या या डिबेटमध्ये २ कमर्शियल ब्रेक्स असतील. यामध्ये कोण कुठल्या बाजूला उभं राहणार, समारोपाचा मुद्दा आधी कोण मांडणार हे नाणं उडवून – टॉस करून ठरवलं जातं.

दोन्ही उमेदवारांना या चर्चेसाठी पेन, नोटपॅड आणि पाण्याची बाटली दिली जाते. याशिवाय इतर कोणतीही गोष्ट – अगदी आधीपासून मुद्दे लिहीलेला कागदही स्टेजवर नेता येत नाही. किंवा ब्रेकदरम्यान या नेत्यांना त्यांच्या कॅम्पेन स्टाफसोबत बोलता येणार नाही. पूर्ण वेळ दोन्ही नेते उभे असतील. आणि या वादविवादा दरम्यान त्यांच्यासमोर प्रेक्षक नसतात.निवडणुकीमधील महत्त्वाच्या मुद्द्यांवरती जो बायडन आणि डोनाल्ड ट्रम्प त्यांची मतं मांडली आणि दुसऱ्याची मतं खोडून काढण्याचा प्रयत्न केला.

९५६१५९४३०६

बातमी बद्दल आपला अभिप्राय नोंदवा

EVERY TIME NEWS Live

Santosh Singh Lanjewar/ Chief Editor/ B.A; B. J. (Bachlor of Journalism) MSW (Master of Social work), E T News Channel & " Every Time News Live " News Website Portal/ Facebook Page : ET News Network/ Email : shan.lanjewar@gmail.com/ Cell : +91 738 738 00 22/Experience in Print Media Past 40 years Served : नागपूर पत्रिका # लोकसत्ता # सामना # नवराष्ट्र # निर्मल महाराष्ट्र # लोकमत # लोकमत समाचार # तरुण भारत # देशोन्नती # महासागर # लोकशाही वार्ता & Continue Every Time News Network/ Office : Vidarbha Sahitya Sangh Commercial Complex Jhanshi Rani Square, Sitabuldi, Nagpur

बातमी शेअर करण्यासाठी येथे क्लिक करा
0 1 8 5 2 0

EVERY TIME NEWS Live

Santosh Singh Lanjewar/ Chief Editor/ B.A; B. J. (Bachlor of Journalism) MSW (Master of Social work), E T News Channel & " Every Time News Live " News Website Portal/ Facebook Page : ET News Network/ Email : shan.lanjewar@gmail.com/ Cell : +91 738 738 00 22/Experience in Print Media Past 40 years Served : नागपूर पत्रिका # लोकसत्ता # सामना # नवराष्ट्र # निर्मल महाराष्ट्र # लोकमत # लोकमत समाचार # तरुण भारत # देशोन्नती # महासागर # लोकशाही वार्ता & Continue Every Time News Network/ Office : Vidarbha Sahitya Sangh Commercial Complex Jhanshi Rani Square, Sitabuldi, Nagpur

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
Translate »
बातमी कॉपी करणे हा कायद्याने गुन्हा आहे