Breaking
ब्रेकिंग

जाती अंत संघर्ष समीतीची तीव्र निदर्शने : घटना शिल्पकाराचा अपमान सहन केल्या जाणार नाही – कॉम. अरुण लाटकर 

0 1 8 5 2 1

जाती अंत संघर्ष समीतीची तीव्र निदर्शने

घटना शिल्पकाराचा अपमान सहन केल्या जाणार नाही – कॉम. अरुण लाटकर 

नागपूर/प्रतिनिधी

संसदेमध्ये संविधानावरील चर्चेत भाषण करतांना अमित शहाने बाबासाहेबांच्या विषयी अपमानास्पद वकत्व्य केले. त्याचा जातीअंत संघर्ष समीतीद्वारे जाहीर निषेध करण्याकरीता त्यांनी राजीनामा द्यावा या मागणीला घेऊन नुकतीच जातीअंत संघर्ष समीती द्वारे नारे निदर्शने रोहित मार्बल्स समोर, इमामवाडा पोलिस स्टेशनच्या बाजुला, आयोजित करण्यात आले होते.

या निदर्शनात मोठ्या संख्येने जनतेने उत्सफुर्तपणे भाग घेऊन,बाबासाहेबांप्रती आपली श्रद्धा व्यक्त केली व अमित शहा व मोदी सरकारचा निषेध करून शहाच्या राजीनाम्याची मागणी करीत गृहमंत्री अमित शहा यांच्यावर धारा 3(1)(v), 3(2)(7), 352, 353 बी एन एस एस, अट्रोसिटी कायदा धारा 3, पोलिस अधिकारी गुन्हा दाखल करण्यात दिरंगाई करीत असल्याबाबत एससी. एसटी. प्रिवेन्शन कायदा धारा 4 अंतर्गत त्वरित गुन्हा नोंदवून अमित शहाला तुरुंगात पाठविण्याची मागणी ॲड. विजय फुलकर व्दारे करण्यात आली. हा संघर्ष आणखी तीव्र करण्याचा इशारा दिला

आंदोलनात अरूण लाटकर, मदन भगत, रामेश्वर चरपे, विठ्ठल जुनघरे, ॲड. विजय फुलकर, प्रमोद कावळे, सुभाष रामटेके, गुरप्रितसिंग, मंगला जुनघरे, अमित हटवार, अभय पिंपळगावकर, चंद्रशेखर मालवीय, दिलीप देशपांडे, अशोक मेश्राम, राजु इंगळे, वैशाली केडीया, अंजली तिरपुडे, कुणाल सावंत, योगेश रणदिवे, वासनिक, प्रितीश गंगशेट्टीवार, सचिन मुळे, मनोहर मुळे, मधुकर खडसे, कालीचरण गायकवाड, भालेराव सह जाती अंत संघर्ष समीती नागपुरचे अनेक पदाधिकारी उपस्थित होते.

     आंदोलनास विठ्ठल जुनघरे यांनी संबोधीत केले व आंदोलन अधिक तीव्र करण्याचा निर्धार व्यक्त केला .

——————–

बातमी बद्दल आपला अभिप्राय नोंदवा

EVERY TIME NEWS Live

Santosh Singh Lanjewar/ Chief Editor/ B.A; B. J. (Bachlor of Journalism) MSW (Master of Social work), E T News Channel & " Every Time News Live " News Website Portal/ Facebook Page : ET News Network/ Email : shan.lanjewar@gmail.com/ Cell : +91 738 738 00 22/Experience in Print Media Past 40 years Served : नागपूर पत्रिका # लोकसत्ता # सामना # नवराष्ट्र # निर्मल महाराष्ट्र # लोकमत # लोकमत समाचार # तरुण भारत # देशोन्नती # महासागर # लोकशाही वार्ता & Continue Every Time News Network/ Office : Vidarbha Sahitya Sangh Commercial Complex Jhanshi Rani Square, Sitabuldi, Nagpur

बातमी शेअर करण्यासाठी येथे क्लिक करा

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
Translate »
बातमी कॉपी करणे हा कायद्याने गुन्हा आहे