वाघिणीच्या हल्ल्यात गुराखी ठार – *वीज पडून एक ठार. *करंट लागून ट्रक चालकाचा मृत्यू
*वाघिणीच्या हल्ल्यात गुराखी ठार. *वीज पडून एक ठार. *करंट लागून ट्रक चालकाचा मृत्यू
भंडारा/E T News
पवनी वनक्षेत्रातील सावरला बिटाला लागून असलेल्या ब्रम्हपुरी वनपरिक्षेत्रातील तोरगाव बिटात गुरे चारण्याकरिता गेलेल्या गुराख्यावर पट्टेदार वाघिणीने हल्ला करून ठार मारल्याची घटना दुपारी घडली असून परिसरात भीतीचे वातावरण निर्माण झाले असून वाघाचा बंदोबस्त करण्याची मागणी जनतेकडून होत आहे.
वाघिणीच्या हल्ल्यात ठार झालेल्या गुराख्याचे नाव कुसन आत्माराम अवसरे वय ५५ वर्षे, रा देऊळगाव, त ब्रम्हपुरी, जिल्हा चंद्रपूर असून सदर गुराखी स्वत:चे मालकीचे जनावरे जंगलालगत असलेल्या व गोसीखुर्द धरणाच्या उजव्या कालव्यालगत असलेल्या शेतात चारायला गेला असता दुपारी १.३० वाजताचे दरम्यान ब्रम्हपुरी वनपरिक्षेत्रातील तोरगाव बिट कक्ष क्र ८०१ मध्ये गुराख्यावर पट्टेदार वाघिणीने व तिचे सोबत असलेल्या तीन शावकाने हल्ला करून ठार केले. व जवळपास २०० मीटर लांब, पवनी वनपरिक्षेत्रातील सावरला बिट, कक्ष ३१२ मध्ये ओढत आणले. गुराख्याला वाघाने ठार केल्याची बातमी गावामध्ये वाºयासारखी पसरताच गावकºयांनी नहरालगत असलेल्या शेताकडे धाव घेतली.
घटनेची माहिती ब्रम्हपुरी वनपरिक्षेत्र अधिकारी सचिन नरड यांना देण्यात आली असता राऊंड आॅफिसर मिलिंग सेमस्कर ब्रम्हपुरी, वनरक्षक कागणे घटनास्थळी पोहचले. मात्र गुराख्याचे मृतदेह पवनी वनपरिक्षेत्रातील सावरला बिटात ओढत नेल्यामुळे पुढील कार्यवाहीकरिता पवनी येथील वनक्षेत्राधिकारी वृशाली नागदेवे यांना माहिती देण्यात आली.
माहिती मिळताच वरिष्ठ अधिकाºयांना माहिती देऊन वनक्षेत्राधिकारी वृशाली नागदेवें आपल्या चमूसह घटनास्थळी दाखल झाल्या व पवनी पोलिसांना माहिती देऊन मृतदेह शवविच्छेदन करण्याकरिता ग्रामीण रुग्णालय पवनी येथे घेऊन आले.
यावेळी भंडारा चे उपवनसंरक्षक राहुल गवई यांचे मार्गदर्शनाखाली सहाय्यक वनसंरक्षक सचिन निलख, संजय मेंढे भंडारा, वनपरिक्षेत्र अधिकारी वन्यजीव लहू ठोकळ, अड्याळ वनपरिक्षेत्र अधिकारी घनश्याम ठोंबरे यांनी भेट दिली. तसेच पंचनामा करून रोख वीस हजार रुपये व दहा लाख रुपयांचा धनादेश मृतकाचे नातेवाईकांना देण्यात आला.
वीज पडून एक ठार
भंडारा : मुसळधार पावसासह अचानक वीज कोसळल्याने एका शेतकºयाचा मृत्यू झाला. ही घटना मोहाडी तालुक्यातील सातोना येथे आज १ सप्टेंबर रोजी घडली. योगेश गजानन हटवार (३६) रा. रोहना खुर्द असे मृताचे नाव आहे. योगेश हा सातोना येथील शेतशिवारात काम करीत होता. दरम्यान दुपारी अचानक वीज कोसळून त्याचा मृत्यू झाला..
……………
करंट लागून ट्रक चालकाचा मृत्यू
भंडारा : ट्रकमधील लोखंडी रॉड काढताना विद्युत तारेला स्पर्श झाल्याने एका ट्रक चालकाचा मृत्यू झाला. ही घटना राष्ट्रीय महामार्गावरील बेला येथे ३१ आॅगस्ट रोजी घडली. बुरहान हुसैन बारभुय्या (३०) रा. रहेना, चोंडीपूर जि. हलीलकांडी आसाम असे मृतकाचे नाव आहे. मृतक बुरहान हा ट्रकमधील दुचाकी वाहन काढण्याकरिता ट्रकवर चढला व ट्रकमधून लोखंडी रॉड काढून रॅम्पच्या खाली येत असताना हातातील लोखंडी रॉड इलेक्ट्रीक वायरला लागून करंट लागला. त्याला उपचारासाठी जिल्हा सामान्य रुग्णालय भंडारा येथे नेले असता वैद्यकीय अधिकारी यांनी तपासून मृत घोषित केले.