Breaking
ब्रेकिंग

माझी लाडकी बहीण संवाद यात्रेला विदर्भात सुरुवात

0 1 8 5 1 6

माझी लाडकी बहीण संवाद यात्रेला विदर्भात सुरुवात

नागपूर/E T News

 मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या आदेशाने, किरण पांडव, पूर्व विदर्भ समन्वयक, पक्ष सचिव डॉ.आमदार मनिषाताई कायंदे, आमदार कृपालजी तुमांने यांच्या मार्गदर्शनात शिवसेना धंतोली कार्यालय येथे मंगळवारी महिला पदाधिकारी संवाद मेळावा आयोजित करण्यात आला.

महिला पदाधिकारी संवाद आयोजक तथा जिल्हाप्रमुख सौ.मनीषा पापडकर, डॉ.आमदार मनीषाताई कायंदे शिवसेना प्रवक्त्या तथा विधानसभा निरीक्षक यांच्या प्रमुख मार्गदर्शनात संपन्न झाला. यावेळी डॉ. मनीषाताई कायंदे यांनी महाराष्ट्र शासनाने राबविलेल्या महिला भगिनी बद्दलच्या विविध योजनांची माहिती दिली व त्या कशा अमलात आणायच्या याबद्दल सुद्धा त्यांनी माहिती देऊन महिला भगिनींना या योजनांचा लाभ घेण्याचे आवाहन केले. केंद्र शासनाच्या व महाराष्ट्र शासनाच्या युवकांबद्दल, वृद्धां बद्दल व महिलांबद्दल असलेल्या योजना यांची माहिती देऊन त्या अमलात कशा पद्धतीने आणायच्या त्याचा लाभ सामान्य जनतेपर्यंत कसा मिळाला पाहिजे याचे सविस्तर विवेचन करून या सर्व योजनांचा शहरातील जनतेने लाभ घ्यावा. अशी विनंती उपस्थित महिला भगिनी यांना केली. मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजना ही नागपूर मध्ये सहा विधानसभेत मोठ्या प्रमाणात राबवण्यात आली जवळपास 4000 फार्म दक्षिण विधानसभेतून महिला भगिनींकडून भरून घेऊन संबंधित विभागाकडे सुपूर्द केले तसेच शिवसेना सदस्य नोंदणी सुद्धा मोठ्या जोमाने राबवल्या जात आहे आज त्याचेच औचित्य साधून महिला पदाधिकारी संवाद कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले. मुख्यमंत्री एकनाथजी शिंदे यांनी महाराष्ट्र शासनाद्वारे ज्या योजना जनतेसाठी सुरू केल्या त्या योजनांची सविस्तर माहिती, जिल्हाप्रमुख सुरज गोजे, सौ.मनीषा पापडकर या महिलांना देत असतात व त्यांना पूर्ण मदत करून त्या योजनांचा लाभ मिळवून देण्यासाठी सतत प्रयत्नशील असतात. यावेळी डॉ. आमदार मनीषाताई कायंदे, जिल्हाप्रमुख सुरज गोजे, जिल्हाप्रमुख मनीषा पापडकर, रामटेक जिल्हाप्रमुख नेहा भोकरे, माजी जिल्हा परिषद सदस्य नंदा लोहबरे, नगराध्यक्ष, विधानसभा संघटिका प्रतिभाताई कुंभलकर, मीनाताई जालेकर, उपजिल्हा संघटिका गायत्री वैद्य, शहर प्रमुख पूनम चाडगे, शहर प्रमुख रूपाली बोकडे उपजिल्हाप्रमुख मंजुषा पाणबुडे, उपजिल्हाप्रमुख मनीषा पराड, प्रभाग प्रमुख मोना शेंडे, सोहा मसराम, सुवर्णा भोंगाडे, कार्यालय प्रमुख प्रफुल मानमोडे शिवसेनेचे समस्त महीला पदाधिकारी, नागपूर शहरातील सहा विधानसभेतील महिला उपस्थित होत्या.

बातमी बद्दल आपला अभिप्राय नोंदवा

EVERY TIME NEWS Live

Santosh Singh Lanjewar/ Chief Editor/ B.A; B. J. (Bachlor of Journalism) MSW (Master of Social work), E T News Channel & " Every Time News Live " News Website Portal/ Facebook Page : ET News Network/ Email : shan.lanjewar@gmail.com/ Cell : +91 738 738 00 22/Experience in Print Media Past 40 years Served : नागपूर पत्रिका # लोकसत्ता # सामना # नवराष्ट्र # निर्मल महाराष्ट्र # लोकमत # लोकमत समाचार # तरुण भारत # देशोन्नती # महासागर # लोकशाही वार्ता & Continue Every Time News Network/ Office : Vidarbha Sahitya Sangh Commercial Complex Jhanshi Rani Square, Sitabuldi, Nagpur

बातमी शेअर करण्यासाठी येथे क्लिक करा

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
Translate »
बातमी कॉपी करणे हा कायद्याने गुन्हा आहे