राणीगाव जि. प.शाळेत सामाजिक संस्थेतर्फे शैक्षणिक साहित्य वाटप
राणीगाव जि. प.शाळेत सामाजिक संस्थेतर्फे शैक्षणिक साहित्य वाटप
राणीगाव/धारणी E T News
स्थानिक जिल्हा परिषद पूर्व माध्यमिक मराठी शाळा राणीगाव पंचायत समिती धारणी येथे शाळेतील 258 विद्यार्थांना नागपूर येथील विविध सामाजिक संस्थेमार्फत विविध शैक्षणिक साहित्य वाटप दि.26 सप्टेंबर 2024 रोजी करण्यात आले.
राणीगाव शाळेचे माजी मुख्याध्यापक विजय जी. धमाले यांच्या प्रयत्नातून नागपूर येथील सामाजिक बांधिलकी जपणाऱ्या सामाजिक संस्थेतर्फे शाळेतील सर्व विद्यार्थ्यांना स्कूल बॅग, नोटबुक, पाणी बॉटल, कंपासपेटी,चित्रकला वह्या संस्थेच्या पदाधिकाऱ्यांमार्फत वाटप करण्यात आल्या.
कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी सौ. शितल पाटील संस्थापक, महिमा बहुउद्देशीय संस्था नागपूर तर प्रमुख अतिथी बंडू आंबटकर संयोजक, ग्रामसेवा लोकअभियान,सौ रंजीता तराळे,सौ बबिता धूर्वे,राहुल महाजन,सौ समिधा इंगळे,सौ सुषमा कळमकर,सौ मंजू तिवारी, कू.कांचन साहू सामाजिक कार्यकर्त्या उपस्थित होत्या.कार्यक्रमाचे प्रास्ताविक विजय धमाले यांनी तर संचालन प्रमोद भगत यांनी केले.कार्यक्रमात विविध शैक्षणिक उपक्रम राबवल्याबद्दल शिक्षिका मनीषा विंचूरकर यांचा सत्कार करण्यात आला.मान्यवरांच्या हस्ते मुलांना साहित्य वाटप करण्यात आले.पहिल्यांदा मोठ्या प्रमाणात साहित्य वाटप केल्याबद्दल पालकवर्गाने आनंद व आभार व्यक्त केला. कार्यक्रमाच्या यशस्वीतेसाठी शाळेतील सर्व शिक्षकांनी परिश्रम घेतले.