
घुईखेडनगरीत अवतरले पंढरपुर
आषाढी एकादशीनिमित्त घुईखेडात दर्शनासाठी भाविकांची मांदियाळी
गावकऱ्यांनी केले फराळ, फळे व चहाचे वाटप
चांदूर रेल्वे/E T News
चांदूर रेल्वे तालुक्यातील घुईखेड येथील श्री. संत बेंडोजी महाराजांची संजिवनी समाधी संपूर्ण महाराष्ट्रात प्रख्यात असून येथे आषाढी एकादशीनिमित्य बुधवारी (ता. १७) हजारो भाविकांनी मोठ्या श्रध्देने दर्शन घेतले.
देवयानी आषाढी एकादशी ही एका प्रकारची चांदूर रेल्वे तालुक्यातील भावीक भक्तांकरीता अलौकीकच ठरत आहे. शेकडो वर्षांपासुन चालत आलेली ही परंपरा आजही कायम आहे. हा पालखीचा क्षण पाहण्यासाठी व दैवतांचे दर्शन घेण्यासाठी गावातील प्रथेनुसार विशेषत: नवविवाहीत मुली तसेच बाहेरगावी कामानिमित्य राहणारे घुईखेडवासी या दिवशी गावात परत आले होते. श्री. संत बेंडोजी महाराजांची पालखी एकादशीच्या दिवशी सायंकाळी ५ वाजता मंदिराच्या बाहेर प्रवेश करून नागपुर- औरंगाबाद एक्सप्रेस हायवेवरून जाऊन चंद्रभागा नदीच्या पात्रामध्ये परंपरेनुसार संस्थानचे विश्वस्त प्रविण घुईखेडकर यांच्याहस्ते महाआरती करण्यात आली. घुईखेड गावाच्या प्रदक्षिणा करून परत मंदिरामध्ये पालखीचे आगमन झाले. यादरम्यान सार्वजनिक गणेश मंडळ, राजे शिवाजी मंडळ, भवानी महिला बचत गट, अवधुत महाराज मंदिर व मुरलीधर मंदिरातर्फे सर्व भक्तांना फराळ, फळ, चहा व पाण्याचे वाटप केले. परीसरात महाराजांची मिरवणुक काढण्यात आली होती. यामध्ये वारकरी संप्रदाय मंडळींनी मृदुंगांच्या तालावर पावली तसेच फुगडी केली. यानंतर शेवटी ६.३० वाजता बेंडोजी महाराजांच्या आरतीला सुरूवात होऊन या अलौकीक सोहळ्याची समाप्ती झाली. यादरम्यान माजी आमदार वीरेंद्र जगताप, जिल्हा बँकेचे उपाध्यक्ष अभिजीत ढेपे, भाजपा नेते रावसाहेब रोठे आदींनी भेटी दिल्या.
यावेळी विश्वेश्वर गावंडे, पांडुरंग भोयर, तुळशिराम वैद्य, प्रथमेश गिरी, किशोर येवले, कुणाल सिंगलवार, प्रफुल घड्डीनकर, अभिजीत काकडे, रूपेश भोयर, गोपाळ काळे, प्रतिक येवले, प्रतिक काकडे, प्रकाश मुळे, संजय चनेकार, किशोर मेहर, कैलास सावनकर, दादाराव क्षीरसागर, नंदकिशोर काकडे, मुकुंद काकडे, लहानु मेश्राम, नामदेव मेश्राम, गोविंद शेंडे, लक्ष्मण मेश्राम, अजय मेश्राम, पवन अंबुलकर, प्रविण मेश्राम, अनिल वानखडे, अमोल बेंद्रे, बाबू काकडे, अशोक आडे, सुदाम मेश्राम, लक्ष्मण तिवाडे, राजु तिवाडे, सुनिल इंगोले यांच्यासह हजारो भाविक उपस्थित होते. या संपूर्ण कार्यक्रमात तळेगाव दशासरचे ठाणेदार रामेश्वर धोंडगे यांच्या नेतृत्वात बीट जमादार विजय बघेल यांनी चोख पोलीस बंदोबस्त ठेवला होता.