नवनित विद्यालयात राणी अवंतीबाई जयंती दिन
नवनित विद्यालयात राणी अवंतीबाई जयंती दिन
भंडारा/E T News
मोतीस्मृती ज्ञानजागृत बहुउद्देशिय शिक्षण संस्था पेट्रोलपंप (ठाणा) ता. जि. भंडारा व्दारा संचालित नवनित माध्यमिक व उच्च माध्यमिक विद्यालय खमारी (बुज.) ता. मोहाडी जि. भंडारा या शाळेत स्वातंत्र्यदिन साजरा केल्यानंतर दि. १६ ऑगस्ट २०२४ ला विरांगना राणी अवंतीबाई यांची १९३ वी जयंती मोठ्या उत्साहात साजरी करण्यात आली.
या कार्यक्रमाचे अध्यक्ष शाळेचे मुख्याध्यापक नरेंद्र गणविर यांच्या हस्ते सर्वप्रथम राणी अवंतीबाई यांच्या प्रतिमेचे पूजन, दीप प्रज्वलन, पुष्पहार अर्पण करून अभिवादन करण्यात आले.
राणी अवंतीबाई यांचा जन्म १६ ऑगस्ट १८३१ मध्ये झाला. त्यांचा विवाह रामगढचे राजकुमार विक्रमादित्य यांच्या सोबत झाला. पतीच्या निधनामुळे व मुले लहान असल्यामुळे रामगढचा कारभार पाहण्याची जबाबदारी त्यांच्याकडे आली. त्यावेळेस इंग्रजाची सत्ता होती. इंग्रज रामगढला आपल्या ताब्यात घेण्याचा प्रयत्न करत होते. त्यामुळे राणी अवंतीबाईने इंग्रजा सोबत युद्ध केले. इंग्रजांना युद्धात पराभव पत्करावा लागला. तेव्हा पासून १८५७ च्या क्रांतीची सुरुवात झाली. इंग्रजांनी या पराभवाचे सुड घेण्यासाठी प्रचंड सैन्यासह रामगढला वेढा दिला. तेव्हा परिस्थिती लक्षात घेऊन इंग्रजांची गुलामगिरी पत्करण्यापेक्षा स्वत: च्या तलवारीने छातीत प्रहार करून मातृभूमीच्या रक्षणासाठी आपल्या प्राणांचे बलिदान दिले. राणी अवंतीबाईचे कार्य शौर्य, बलिदान यासाठी सदैव स्मरणात राहील. त्या एक लोधी राजपूत राणी-शासक आणि स्वातंत्र्य सेनानी होत्या.
त्यांना जयंती दिनानिमित्त शाळेतील शिक्षक, शिक्षकेत्तर कर्मचारी तसेच विद्यार्थ्यांनी विनम्र अभिवादन केले. याप्रसंगी संस्थेचे सचिव हिरालाल गजभिये, मुख्याध्यापक नरेंद्र गणवीर, सुनिल नागदिवे, सुमिता गजभिये, निर्मला रंगारी, प्रा. दिनदयाल दमाहे, प्रा. अरुण कांबळे, प्रा. नाना गजभिये, अशोक गजभिये, अनिरुद्ध गजभिये उपस्थित होते. कार्यक्रमाचे संचालन सुमिता गजभिये यांनी केले.