१६ वर्षापासून घरासमोरील रस्त्याचे प्रतीक्षेत ; ठाणा पेट्रोल पंप ग्रामपंचायत प्रशासनाचे दुर्लक्ष
१६ वर्षापासून घरासमोरील रस्त्याचे प्रतीक्षेत ; ठाणा पेट्रोल पंप ग्रामपंचायत प्रशासनाचे दुर्लक्ष
जवाहरनगर/E T News
ठाणा पेट्रोल पंप येथील विवेकानंद कॉलोनी वसाहत परिसरातील मागील १६. वर्षापासून.घर बांधून वास्तव्य करणाऱ्या नागरिकांकडून ग्राम पंचायत प्रशासन विविध रूपाने टॅक्स वसूल करीत आहेत.
मात्र या नागरिकांच्या मूलभूत समस्या सोडविल्या जात नसल्याने,ग्रामपंचायत प्रशासनाविरोधात स्थानिक नागरिकात रोष निर्माण होत आहे
ठाणा पेट्रोल पंप येथील विवेकानंद कॉलोनी मध्ये मागील १६ वर्षापासून घर बांधून वास्तव्य करणारे मोहम्मद असपाक हनिप शेख यांचे घर आहे.त्यांचे घराकडे जाणारा मुख्य रस्ता तात्पुरत्या स्वरूपात असल्याने, पावसाळ्यात स्वतः चे.जाण्यासाठी पक्का रस्ता नसल्याने, घरी जाण्यासाठी चिखलातून वाट मोकळी करावी लागते तसेच या रस्त्यावर विद्युत पोलची सुविधा नसून रात्रीला अंधारातून यें जा करावी लागते,सध्या.पावसाचे दिवस असल्याने या परिसरात जल चर प्राण्याचे वावर मोठ्या प्रमाणात असतात.या बाबीचा धोका लक्षात घेता.यांघराकडे जाणाऱ्या रस्त्याचे पक्के बांधकाम करावे तसेच रस्त्याचे बाजूला विद्युत पोलची उभारणी करून विद्युत लाईट लावण्यात यावे.ही मागणी या वसाहत परिसरातील नागरिकांनी ग्राम पंचायत प्रशासन,ग्राम पंचायत सदस्य,सरपंच यांचेकडे वारंवार करून सुद्धा दुर्लक्ष केले जात असल्याचा आरोप येथील वास्तव्य करणारे नागरिकांनी केला आहे.करिता या मूलभूत समस्येकडे स्थानिक ग्राम पंचायत प्रशासनाने गांभीर्याने दखल घेऊन ही समस्या निकाली काढण्यात यावे अशी मागणी येथील नागरिकांनी केली आहे.
…………