Breaking
ब्रेकिंग

नितीन  गडकरींनी डॉ. पंजाबराव देशमुख यांना भारतरत्न देण्यासाठी घेतला पुढाकार

0 1 8 5 2 1

अमरावती/E T News

कृषी क्षेत्रात आणि शिक्षण क्षेत्रात अभूतपूर्व कामगिरी करणाऱ्या डॉ. पंजाबराव उर्फ भाऊसाहेब देशमुख यांना भारतरत्न ही उपाधी मिळण्यासाठी मी पूर्ण प्रयत्न करणार आहे. ते माझे कर्तव्यच आहे.आपण फक्त एक प्रस्ताव तयार करून माझ्या दिल्लीच्या बंगल्यावर या. आपण सर्व शक्तीनिशी डॉ.पंजाबराव देशमुख यांना भारतरत्न मिळण्यासाठी प्रामाणिक प्रयत्न करू असे उद्गार केंद्रीयमंत्री नितीन गडकरींनी नागपूर येथे काढले.

शिक्षण महर्षी व कृषी महर्षी डॉ.पंजाबराव देशमुख यांना भारतरत्न पुरस्कार यासाठी पुढाकार घेणारे दिल्लीच्या अखिल भारतीय कुर्मी महासभेचे केंद्रीय सदस्य व सुप्रीम कोर्टाचे सीनियर ॲड.के के.चौधरी व डॉ.पंजाबराव देशमुख आयएएस अकादमीचे संचालक प्रा.डॉ.नरेशचंद्र काठोळे यांनी केंद्रीयमंत्री नितीन गडकरींची भेट निवासस्थानी घेतली असता, त्यांनी हे आश्वासन दिले. याप्रसंगी नितीन गडकरीचे विश्वासू सहकारी सुधीर दिवे तसेच मराठा सेवा संघाचे पदाधिकारी बाळासाहेब ठेंग हे उपस्थित होते. डॉ पंजाबराव देशमुख यांनी केवळ महाराष्ट्रासाठी नाहीच तर संपूर्ण देशात कृषी क्षेत्रात व शिक्षण क्षेत्रात भरीव काम केलेले आहे. ते भारत देशाचे कृषी राज्यमंत्री असताना त्यांनी केलेले कार्य आजही चर्चित आहे. विपरीत परिस्थिती असताना त्यांनी ह्या सर्व बाबी केलेल्या आहेत. 1932 व्या वर्षी शिक्षणाची गंगा विदर्भात आणण्यासाठी त्यांनी श्री शिवाजी शिक्षण संस्थेची स्थापना केलेली आहे. आजच्या घडीला या संस्थेचे जाळे सर्वत्र पसरलेले आहेत. अशा या महापुरुषाला भारतरत्न ही उपाधी देण्यात यावी यासाठी ॲड.के.के.चौधरीनी दिल्लीच्या सुप्रीम कोर्टाच्या सीनियर वकीलांने पुढाकार घेतला असून अमरावतीला येऊन सर्व संबंधिताची भेट घेऊन नितीन गडकरी यांच्या कार्यालयात जाऊन त्यांना याची माहिती दिली. केंद्रीयमंत्री नितीन गडकरी यांनी डॉ. पंजाबराव देशमुख यांना भारतरत्न ही उपाधी देण्यास हिरवी झेंडी दाखवली असून प्रस्ताव दाखल करण्यास सांगणे ही महत्त्वपूर्ण बाब घडून आलेली आहे. केंद्रीयमंत्री नितीन गडकरी यांनी पुढाकार घेतल्यामुळे डॉ. पंजाबराव देशमुख यांना भारतरत्न उपाधी मिळण्याचा मार्ग सुकर झालेला आहे. त्यांनी घेतलेल्या या सकारात्मक निर्णयाबद्दल उच्च स्तरातून त्यांचे अभिनंदन करण्यात येत आहे.

5/5 - (1 vote)

EVERY TIME NEWS Live

Santosh Singh Lanjewar/ Chief Editor/ B.A; B. J. (Bachlor of Journalism) MSW (Master of Social work), E T News Channel & " Every Time News Live " News Website Portal/ Facebook Page : ET News Network/ Email : shan.lanjewar@gmail.com/ Cell : +91 738 738 00 22/Experience in Print Media Past 40 years Served : नागपूर पत्रिका # लोकसत्ता # सामना # नवराष्ट्र # निर्मल महाराष्ट्र # लोकमत # लोकमत समाचार # तरुण भारत # देशोन्नती # महासागर # लोकशाही वार्ता & Continue Every Time News Network/ Office : Vidarbha Sahitya Sangh Commercial Complex Jhanshi Rani Square, Sitabuldi, Nagpur

बातमी शेअर करण्यासाठी येथे क्लिक करा

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
Translate »
बातमी कॉपी करणे हा कायद्याने गुन्हा आहे