Breaking
ब्रेकिंग

अंधश्रद्धेचा कळस “पैशाचा पाऊस अन् नग्न पूजा “महाराष्ट्र अंनिस तर्फे तीव्र निषेध : अ. भा. अंधश्रद्धा निर्मूलन समितीचे महासचिव हरीश देशमुख यांनीही केला निषेध

0 1 8 5 1 3

अंधश्रद्धेचा कळस “पैशाचा पाऊस अन् नग्न पूजा “महाराष्ट्र अंनिस तर्फे तीव्र निषेध 

अ. भा. अंधश्रद्धा निर्मूलन समितीचे महासचिव हरीश देशमुख यांनीही केला निषेध

नागपूर/विशेष प्रतिनिधी

 नुकतेच पैशाच्या पाऊस पडण्याच्या हेतूने तीन अल्पवयीन मुलींची नग्न पूजा करण्याची घटना घडली हे अत्यंत दुर्दैव असून या घटनेचा महाराष्ट्र अंधश्रद्धा निर्मूलन समिती तर्फे या घटनेचा निषेध करण्यात आला.

या घटनेची सखोल व योग्य चौकशी करून त्या तीन अल्पमुलींना तात्काळ संरक्षण व सहकार्य मिळवून देण्याबरोबरचे निवेदन निवासी उपजिल्हाधिकारी तथा जिल्हा दंडाधिकारी अनुप खांडे यांना शहिद डॉ. नरेंद्र दाभोलकर प्रणित महाराष्ट्र अंधश्रद्धा निर्मूलन समिती नागपूर जिल्ह्याच्या वतीने जिल्हा कार्याध्यक्ष गौरव आळणे तथा कोराडी शाखा अध्यक्ष ताराचंद पखीडे यांनी जिल्हाधिकारी कार्यालयाला भेट घेऊन शासनास निवेदन देण्यात आले.

 पुरोगामी महाराष्ट्रातील उपराजधानी असलेल्या नागपूर शहरात अंधश्रद्धेमुळे “पैशाचा पाऊस पाडण्याच्या नावाखाली मध्यरात्री नग्न पूजा, तीन अल्पवयीन मुलीवर अत्याचार” घडल्याची घटना अत्यंत गृहस्पद आहे. त्याचा गुन्हा मानकापूर पोलीस स्टेशन नागपूर येथे येथे दाखल झाला असून त्याचा तपास तेथील पोलीस अधिकारी करीत आहेत. २१ व्या शतकात अंधश्रद्धेमुळे घडलेली घटना ही अत्यंत निंदनीय, दुर्दैवी आहे. त्यामुळे या घटनेचा शहिद डॉ. नरेंद्र दाभोलकर प्रणित महाराष्ट्र अंधश्रद्धा निर्मूलन समितीच्या वतीने तीव्र निषेध करण्यात येत आहे. करिता शासनास नम्रपणे निवेदन देण्यात आले निवेदनामध्ये (१) अन्यायग्रस्त, शोषित असलेल्या तीन नाबालिक मुलींना शासनाने तत्काळ संरक्षण देऊन योग्य सहकार्य करावे. (२)अशा घटना यापूर्वी घडून आणल्या का याबाबत कसून चौकशी करण्याचे आदेश पोलिसांना द्यावे. (३)समाजात अंधश्रद्धेमुळे अश्या घटनाची पुनरावृत्ती होऊ नये यासाठी जादूटोणाविरोधी कायदा प्रसार आणि प्रसार अमलबजावणी कार्यक्रमांतर्गत जनजागृती कार्यक्रम घेण्याचे आदेश पोलीस विभाग, समाज कल्याण विभाग, शिक्षण विभाग, बालकल्याण विभाग, यांना तात्काळ देण्यात यावे. अशी शहीद डॉ. नरेंद्र दाभोलकर प्रणित महाराष्ट्र अंधश्रद्धा निर्मूलन समिती जिल्हा कार्यकारणी ची मागणी केली आहे. या घटनेचा राज्य सरचिटणीस संजय शेंडे , जिल्हा अध्यक्ष जगजीत सिंग, जिल्हा उपाध्यक्ष मधुकर धंदरे, अशोक खोरगडे, सेवकराम राऊत, विनोद उलीपवार, मनीष अडागळे, डॉ. कविता मते, संजय बलमे, विजय मोकाशी, मालती वराडे, अशोक पाटील, शरद वानखेडे, रवींद्र राऊत आदी जिल्हा पदाधिकाऱ्यांनी निषेध नोंदविला.

अखिल भारतीय अंधश्रद्धा निर्मूलन समितीचे महासचिव हरीश देशमुख यांनी केला निषेध

 स्वत:मधे अलौकिक शक्ति असल्याचा दावा करुन बुवाबाजी करणारा कदिलबाबा उर्फ अब्दुल कादिर मदने बाबा वर जादूटोना विरोधी कायदा अनुसार कार्यवाही आवश्यक असल्याची मागणी मानकापुर पोलिस निरीक्षक हरीश काळसेकर यांच्याशी सम्पर्क साधुन अखिल भारतीय अंधश्रद्धा निर्मूलन समितीचे महासचिव हरीश देशमुख यांनी केली .मानकपुर पोलिस सतर्कते बद्दल या कर्यवाही साठी अभिनदंनही केले.

बातमी बद्दल आपला अभिप्राय नोंदवा

EVERY TIME NEWS Live

Santosh Singh Lanjewar/ Chief Editor/ B.A; B. J. (Bachlor of Journalism) MSW (Master of Social work), E T News Channel & " Every Time News Live " News Website Portal/ Facebook Page : ET News Network/ Email : shan.lanjewar@gmail.com/ Cell : +91 738 738 00 22/Experience in Print Media Past 40 years Served : नागपूर पत्रिका # लोकसत्ता # सामना # नवराष्ट्र # निर्मल महाराष्ट्र # लोकमत # लोकमत समाचार # तरुण भारत # देशोन्नती # महासागर # लोकशाही वार्ता & Continue Every Time News Network/ Office : Vidarbha Sahitya Sangh Commercial Complex Jhanshi Rani Square, Sitabuldi, Nagpur

बातमी शेअर करण्यासाठी येथे क्लिक करा
0 1 8 5 1 3

EVERY TIME NEWS Live

Santosh Singh Lanjewar/ Chief Editor/ B.A; B. J. (Bachlor of Journalism) MSW (Master of Social work), E T News Channel & " Every Time News Live " News Website Portal/ Facebook Page : ET News Network/ Email : shan.lanjewar@gmail.com/ Cell : +91 738 738 00 22/Experience in Print Media Past 40 years Served : नागपूर पत्रिका # लोकसत्ता # सामना # नवराष्ट्र # निर्मल महाराष्ट्र # लोकमत # लोकमत समाचार # तरुण भारत # देशोन्नती # महासागर # लोकशाही वार्ता & Continue Every Time News Network/ Office : Vidarbha Sahitya Sangh Commercial Complex Jhanshi Rani Square, Sitabuldi, Nagpur

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
Translate »
बातमी कॉपी करणे हा कायद्याने गुन्हा आहे